मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 11:49 IST2025-08-14T11:44:46+5:302025-08-14T11:49:50+5:30

Arjun Tendulkar net worth: महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. या निमित्ताने अर्जुनची संपत्ती चर्चेत आली आहे.

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. २५ वर्षीय अर्जुनने त्याची बालमैत्रीण सानिया चांडोक सोबत गुपचूप साखरपुडा केला आहे.

या कार्यक्रमाला दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. यामुळे तेंडुलकर कुटुंबामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. या निमित्ताने अर्जुल तेंडुलकरची संपत्ती किती असा प्रश्न सर्च होत आहे.

अर्जुन हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. वडिलांप्रमाणेच त्यालाही लहानपणापासून क्रिकेटची आवड आहे. अर्जुन गोव्याकडून रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० यांसारख्या स्पर्धांमध्ये खेळतो.

तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य आहे. २०२१ मध्ये त्याला २० लाख रुपयांच्या बेस प्राइसवर पहिल्यांदा संधी मिळाली. २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला ३० लाख रुपयांना पुन्हा खरेदी केले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन तेंडुलकरची एकूण संपत्ती सुमारे २२ कोटी रुपये आहे. त्याची कमाई मुख्यतः क्रिकेटमधून होते. गेल्या पाच वर्षांत अर्जुनने आयपीएलमधून सुमारे १.४० कोटी रुपये कमावले आहेत. त्याच्या एकूण वार्षिक उत्पन्नापैकी ७५-८०% हिस्सा आयपीएलमधून येतो.

रणजी आणि इतर स्पर्धांमधून तो वर्षाला अंदाजे १० लाख रुपये कमावतो, जे त्याच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या सुमारे २५% आहे.

तेंडुलकर कुटुंबाचा ६,००० स्क्वेअर फुटांचा बंगला मुंबईतील एका पॉश परिसरात आहे. २००७ मध्ये सचिनने हा बंगला ३९ कोटींना खरेदी केला होता. आज त्याची किंमत जवळपास १०० कोटी रुपये आहे.

सचिनने लंडनमध्येही लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडजवळ एक अपार्टमेंट घेतले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत तेंडुलकर कुटुंब अनेकदा येथे जाते. या घरात अर्जुन वडिलांसोबत सरावही करतो. या साखरपुड्याच्या बातमीने अर्जुन आणि सानियाच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.