'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 02:57 PM2024-05-29T14:57:52+5:302024-05-29T15:04:42+5:30

Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा पार पडत आहे. अतिशय आलिशान अशा क्रूझवर या सोहळ्याची सुरुवात झालीये.

Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा पार पडत आहे. ज्या क्रूझवर हे प्री-वेडिंग सोहळा पार पडत आहे, त्याचं नाव सेलिब्रिटी एसेंट असं आहे.

ही अतिशय लक्झरी क्रूझ शिप आहे. या क्रूझची निर्मिती फ्रेंच जहाजबांधणी कंपनी चांटियर्स डी आय'अटलांटिक सेलिब्रिटीन (Chantiers de I'Atlantique Celebrity) केली आहे. जवळपास ९०० मिलियन डॉलर्स म्हणजेच ७००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून ही सेलिब्रिटी एसेंट तयार करण्यात आली आहे. ही क्रूझ ५ स्टार सुविधा असलेलं एक फ्लोटिंग रिसॉर्ट आहे. एखाद्या आलिशान राजवाड्यापेक्षा कमी ती नाही. यात अनेक सुविधा आहेत.

अनंत अंबानी राधिका मर्चंट सेकंड प्री-वेडिंगच्या या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्यात पाहुण्यांना इटली ते दक्षिण फ्रान्स असा शानदार प्रवास पाहायला मिळणार आहे. हा संपूर्ण प्रवास सुमारे ४३८० किलोमीटरचा असेल. या क्रूझची खासियत आणि उपलब्ध सोयीसुविधांबद्दल जाणून घेऊ.

या क्रूझवर एकापेक्षा एक सुविधा उपलब्ध आहेत. क्रूझवर जास्तीत जास्त ३९५० प्रवासी प्रवास करू शकतात. ३२७ मीटर लांब आणि ३९ मीटर रुंद अशा या क्रूझवर १७ डेक आहेत.

यात सनसेट बार आणि पूल डेक देखील आहे. यात एक रिसॉर्ट डेक, एक लॅप पूल, २ हॉट टब पूल आणि एक वॉकिंग जॉगिंग ट्रॅक देखील आहे. क्रूझच्या पेंटाहाऊस सूटमध्ये बेडरूम, ड्रेसिंग रूम, लिव्हिंग एरिया आणि डायनिंग एरिया देखील आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा सोहळा २९ मे २०२४ पासून सुरू होईल आणि १ जूनपर्यंत चालेल. चार दिवस चालणारा हा भव्य सोहळा क्रूझवर होणार आहे. ही क्रूझ इटली आणि फ्रान्स दरम्यान प्रवास करेल.पाहुण्यांच्या यादीत ८०० जणांचा समावेश आहे. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी आणि बिझनेस टायकून आदींचा समावेश असेल.