LIC ची जबरदस्त स्कीम…फक्त एकदा करा गुंतवणूक, वृद्धापकाळात पेन्शनचं ‘नो टेन्शन’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 09:39 AM2023-08-11T09:39:34+5:302023-08-11T09:51:48+5:30

भारतीय आयुर्विमा महामंडळाचे रिटायरमेंट प्लॅन विशेषतः लोकप्रिय आहेत.

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीकडे (LIC) प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी अनेक योजना आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे रिटायरमेंट प्लॅन विशेषतः लोकप्रिय आहेत.

एलआयसीच्या अशा स्कीम्समध्ये गुंतवणूक केल्यास वृद्धापकाळातील पेन्शनचा ताण संपणार आहे. अशीच एक योजना म्हणजे एलआयसी जीवन शांती 'एलआयसी न्यू जीवन शांती' (LIC New Jeevan Shanti) स्कीम. ही स्कीम तुम्हाला निवृत्तीनंतर पैशांची कमतरता भासू देणार नाही. या योजनेत एकदाच गुंतवणूक करावी लागेल.

न्यू जीवन शांती (LIC) योजना देखील एलआयसीच्या पेन्शन योजनांमध्ये समाविष्ट आहे. ही योजना तुम्हाला निवृत्तीनंतर आजीवन पेन्शनची हमी देते. एलआयसीची न्यू जीवन शांती योजना ही एक एन्युटी स्कीम आहे आणि ती घेताना तुमची पेन्शन देखील निश्चित केली जाऊ शकते. त्यानंतर तुम्हाला दरमहा इतके पेन्शन मिळत राहील. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर, एक ते पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो, त्यानंतर तुम्हाला दरमहा निश्चित पेन्शन मिळू लागते.

एलआयसी न्यू जीवन शांती योजनेत गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान गुंतवणूक १.५ लाख रुपये निश्चित केली गेली आहे. या योजनेंतर्गत वयोमर्यादा ३० वर्षे ते ७९ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

एलआयसी न्यू जीवन शांती योजनेत गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान गुंतवणूक १.५ लाख रुपये निश्चित केली गेली आहे. या योजनेंतर्गत वयोमर्यादा ३० वर्षे ते ७९ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

या वयोगटातील कोणीही हा प्लॅन खरेदी करू शकतो. हा प्लॅन दोन पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. पहिला पर्याय म्हणजे डेफर्ड एन्युटी फॉर सिंगल लाईफ (Deferred Annuity for Single Life) आणि दुसरी स्कीम म्हणजे डेफर्ड एन्युटी फॉर जॉईंट लाईफ (Deferred Annuity for Joint Life) आहे.

हा प्लॅन खरेदी करून मिळालेल्या अॅन्युइटीबद्दल सांगायचं झालं तर पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहते. परंतु पॉलिसीधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास आणि त्याच्याकडे डेफर्ड एन्युटी फॉर सिंगल लाईफ असल्यास, त्या व्यक्तीनं दिलेल्या नॉमिनीला पैसे दिले जातात.

दुसरीकडे, जॉईंट लाईफ डिफर्ड अॅन्युइटी घेतली असेल आणि एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याला पेन्शनची सुविधा दिली जाते. दुसरीकडे, दोन्ही व्यक्तींच्या मृत्यूनंतर, सर्व पैसे नॉमिनीला दिले जातात.

एलआयसीची ही पेन्शन योजना खरेदी केल्यानंतर तुम्ही कधीही सरेंडर करू शकता. याशिवाय, तुम्ही एक वेळच्या गुंतवणुकीनंतर इच्छित अंतरानं पेन्शन मिळवण्याचा पर्याय देखील निवडू शकता. म्हणजेच, तुम्ही तुमचे पेन्शन दरमहा घेऊ शकता, तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही तीन महिने किंवा सहा महिन्यांचा पर्यायही निवडू शकता किंवा तुम्हाला वार्षिक एकरकमी पेन्शन देखील मिळू शकते.

एलआयसीच्या या सिंगल प्रीमियम योजनेंतर्गत, तुम्ही किमान १.५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास, तुमचे पेन्शन १००० रुपये निश्चित होईल. दुसरीकडे, सिंगल लाइफसाठी डिफर्ड अॅन्युइटीच्या बाबतीत तुम्ही एकवेळची गुंतवणूक १० लाखांपर्यंत वाढवल्यास, तुमचे मासिक पेन्शन ११,१९२ रुपये निश्चित केले जाईल, जे आयुष्यभर उपलब्ध राहील. एकूणच, ही पॉलिसी निवृत्ती योजना म्हणून घेणे फायदेशीर ठरू शकते.