Airtel चा प्रिमिअम प्लॅन, ५०० जीबी डेटासह मोफत कॉलिंग आणि बरंच काही

By जयदीप दाभोळकर | Published: January 12, 2021 11:28 AM2021-01-12T11:28:37+5:302021-01-12T11:38:52+5:30

दूरसंचार क्षेत्रात सुरू असलेल्या स्पर्धेचा फायदा अनेकदा ग्राहकांना मिळताना दिसतो. रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडियासारख्या कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवेनवे प्लॅन्स बाजारात आणताना दिसत आहेत.

जिओच्या पोस्टपेड प्लॅन्सना टक्कर देण्यासाठी एअरटेलनंदेखील ३९९ रूपयांपासून १,५९९ रूपयांपर्यंतचे पोस्टपेड प्लॅन्स आणले आहेत.

१,५९९ रूपयांचा पोस्टपेड प्लॅड एअरटेलचा सर्वात प्रिमिअम पोस्टपेड प्लॅन्सपैकी एक आहे. यामध्ये दर महिन्याला अनलिमिटेड डेटाचा (५०० जीबी हायस्पीड) फायदा मिळतो.

याव्यतिरिक्त या प्लॅनसोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देण्यात येते. तसंच यासोबत इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन्सवर १० टक्क्यांची सूट आणि अन्य फायदेही देण्यात येतात.

परंतु हा फॅमिली पोस्टपेट प्लॅन जसं की ७४९ रूपये किंवा ९९९ रूपयांसारखा नाही. जाणून घेऊया १,५९९ रूपयांच्या या प्रिमिअम प्लॅनबद्दल.

एअरटेलच्या १,५९९ रूपयांच्या पोस्टपेड प्लॅनसह देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि २०० जीबी पर्यंत रोलओव्हरसह ५०० जीबी हायस्पीड डेटा देण्यात येतो.

याव्यतिरिक्त हा डेटा संपल्यानंतर ग्राहकाला २ पैसे प्रति जीबी चार्ज करण्यात येतात. याव्यतिरिक्त ग्राहकांना २०० आयएसडी मिनिटांसह इंटरनॅशनल रोमिंग प्लॅनवरही १० टक्क्यांची सूट देण्यात येते.

एअरटेलचे इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन्स ४९९ रूपयांपासून सुरू होतात.

यासह कंपनी एका वर्षासाठी अॅमेझॉन प्राईम मेंबरशीप, हँडसेट प्रोटेक्शन, शॉ अॅकॅडमी लाईफटाईम अॅक्सेस, एअरटेल एक्स्ट्रिम अॅप मेंबरशीप, विंक म्युझीक मेंबरशीप आणि अन्य काही बेनिफिट्स दिले जातात.

एअरटेलच्या या प्लॅनसह ओटीटी प्लॅटफॉर्म जसं नेटफ्लिक्स, डिस्ने हॉटस्टार सारख्या अॅप्सचं सबस्क्रिप्शन देण्यात येत नाही. ज्या ग्राहकांचा डेटा युसेज अधिक असेल त्यांच्यासाठी हा प्लॅन उत्तम आहे.