Airtel युझर्सची चांदी, मोफत मिळतोय 5GB डेटा; करावं लागेल केवळ 'इतकंच'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 10:17 AM2022-09-23T10:17:36+5:302022-09-23T10:39:32+5:30

Airtel Free 5GB Data: कंपनी आपल्या ग्राहकांना जबरदस्त ऑफर देत आहे. याअंतर्गत ग्राहकांना 5GB मोफत डेटा देण्यात येत आहे.

Airtel Free 5GB Data: भारती एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर लवकरच 5G सेवा सुरू करणार आहे. युजर्ससाठी ही खुशखबर काही कमी नाही. एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी काही उत्तम प्लॅन्स आणि ऑफर्सही देत आहे.

दरम्यान, आता एअरटेलने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना 5 जीबी डेटा पूर्णपणे मोफत देण्याची घोषणा केली आहे. एअरटेल अॅपद्वारे या ऑफरचा लाभ घेता येईल. चला तर मग जाणून घेऊया एअरटेलच्या 5 GB फ्री ऑफरचा फायदा कसा घ्यायचा.

एअरटेलच्या नवीन ग्राहकांसाठी ही ऑफर उपलब्ध आहे. या ग्राहकांना 5 GB मोफत डेटा दिला जाईल. यासाठी तुम्हाला एअरटेलचे नवीन कनेक्शन घ्यावे लागेल. यानंतर, तुम्हाला तुमच्या फोनवर Airtel Thanks अॅप डाउनलोड करून इंस्टॉल करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या नवीन एअरटेल नंबरसह नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला अॅपमध्ये दिलेल्या My Coupons सेक्शनमध्ये एक कूपन दिसेल जे मोफत 5 GB डेटाचे असेल.

यामध्ये 5 कुपन्स असतील. प्रत्येक कूपन 1 GB डेटाचे असेल. तुम्ही Airtel Thanks अॅपवर लॉग इन करताच हा लाभ दिला जाईल. या डेटा व्हाउचरचा लाभ 90 दिवसांसाठी वैध असेल.

एअरटेलच्या गोष्ट झाली एअरटेलच्या फ्री डेटाची. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे पैसेही कमवू शकता. एअरटेल ग्राहक प्रत्येक यशस्वी रेफरलवर 100 रुपये कमवू शकतील. एअरटेल थँक्स अॅपमध्ये, ग्राहक त्यांच्या कोणत्याही मित्रांना एअरटेल प्रीपेड सिमसाठी रेफरल पाठवू शकतात. जर त्या व्यक्तीने लिंक वापरून एअरटेलचे नवीन सिम खरेदी केले तर दोन्ही ग्राहकांना 100 रुपयांचे डिस्काउंट कुपन दिले जाईल.

टॅग्स :एअरटेलAirtel