Gautam Adani :अदानींप्रमाणेच गोत्यात आले होते अंबानी; पण धीरूभाईंचा एक सिक्सर दलालांना धडा शिकवून गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 12:10 PM2023-02-09T12:10:25+5:302023-02-09T13:14:52+5:30

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहाविरोधात घोटाळ्याचे आरोप केले, या आरोपामुळे अदानी समुह मोठ्या आर्थिक संकटात सापडला.

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहाविरोधात घोटाळ्याचे आरोप केले, या आरोपामुळे अदानी समुह मोठ्या आर्थिक संकटात सापडला. अदानी समुहाच्या शेअरमध्ये घसरण झाली. यामुळे उद्योगपती गौतम अदानी श्रीमंतीच्या यादीत बाहेर पडले. याअगोदर अदानी श्रीमंतीच्या यादीत चौथ्या नंबरवर होते, हिंडेनबर्ग रिसर्चमुळे अदानी समुहाचा तोटा झाला.

अदानी समुहाविरोधात हा रिसर्च कारस्थान असल्याचे बोलले जात आहे. याअगोदरही शेअर बाजारमध्ये रिलायन्स समुहा संदर्भात मोठा गोंधळ निर्माण झाला होता, यामुळे उद्योगपती धीरुभाई अंबानी आर्थिक अडचणीत सापडले होते.

उद्योगपती धीरूभाई अंबानी यांनी या प्रकरणात मोठी पाऊलं उचलत हे प्रकरण हाताळले होते. आजही धीरूभाई अंबानींच्या त्या धाडसाचा उल्लेख केला जातो. या प्रकरणामुळे त्यावेळी शेअर मार्केट तीन दिवस बंद ठेवण्यात आले होते.

अदानींसारखे प्रकरण 1982 मध्ये धीरूभाई अंबानींसोबत घडले होते. त्यावेळी धीरूभाईंनी शेअर बाजारातील काही बड्या दलालांना धाडसाने सांगितले होते की, त्यांच्या कंपनी रिलायन्सविरोधात कारस्थान करणे किती धोकादायक आहे. धीरूभाईंच्या या धाडसामुळे 18 मार्च 1982 रोजी मुंबई शेअर बाजारात खळबळ उडाली होती.

1977 मध्ये धीरूभाई अंबानी यांनी आपली कंपनी रिलायन्सला शेअर बाजारात लिस्ट करण्याचा निर्णय घेतला. यावेळी रिलायन्सने 10 रुपये प्रति शेअर दराने सुमारे 28 लाख इक्विटी शेअर्स जारी केले. शेअरची विक्री इनिशियल पब्लिक ऑफरिंगने सुरू होते. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत रिलायन्स कंपनीच्या शेअरची किंमत 5 पटीने वाढून 50 रुपये झाली. त्यानंतर 1980 मध्ये शेअरची किंमत 104 रुपये आणि 1982 मध्ये 18 पटीने वाढून 186 रुपये झाली, अशातच अदानी ग्रुपचे शेअर्स वधारले.त्यानंतर धीरूभाईंनी डिबेंचर्सच्या माध्यमातून पैसे उभे करण्याचे नियोजन सुरू केले. डिबेंचर हा कंपन्यांसाठी कर्जाद्वारे भांडवल उभारण्याचा एक मार्ग आहे.

दरम्यान, त्यावेळी कोलकात्यातील शेअर बाजारातील काही दलालांनी रिलायन्सचे शेअर्स पाडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एकाच वेळी शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात आली. कोणताही मोठा गुंतवणूकदार रिलायन्सचे घसरलेले शेअर्स खरेदी करणार नाही अशी ब्रोकर्सना आशा होती आणि त्यावेळी कंपनीला स्वतःचे शेअर्स खरेदी करता येणार नाहीत असाही नियम होता. सर्व दलालांनी मिळून अंबानींविरोधात कारस्थान रचले होते.

रिलायन्सच्या शेअरची किंमत खाली आणण्यासाठी दलाल 'शॉर्ट सेलिंग' करत होते. ब्रोकरेजकडून घेतलेले शेअर्स बाजारातून कमी किमतीत विकत घेऊन ते परत करायचे आणि भरघोस नफा कमावायचा, अशी ब्रोकर्सांचे नियोजना होते अर्ध्या तासात ब्रोकर्सनी शॉर्ट सेलिंगद्वारे सुमारे साडेतीन लाख शेअर्स विकले. एकाच वेळी इतके शेअर्स विकल्यामुळे रिलायन्सच्या एका शेअरची किंमत 131 वरून 121 रुपयांवर आली. कोलकात्यातील दलालांना रिलायन्सच्या शेअरची किंमत कमी करून नफा कमवायचा होता. 'शॉर्ट सेलिंग'. हिंडेनबर्ग या कंपनीने ज्या कंपनीने अदानी समुह प्रकरणातही 'शॉर्ट सेलिंग' करून पैसे कमवते.

धीरूभाई अंबानींना दलालांचे राजकारण समजताच त्यांनी आपल्या काही दलालांना रिलायन्स टेक्सटाईल इंडस्ट्रीजचे शेअर्स विकत घेण्यासाठी तयार केले. त्यानंतर खरा खेळ सुरू झाला, एकीकडे कोलकात्यात बसलेले दलाल मुंबई शेअर बाजारात रिलायन्सचे शेअर्स विकत होते, तर दुसरीकडे अंबानीचे संचालक खरेदी करत होते, त्यामुळे शेअरचा भाव घसरण्याऐवजी वाढत होत आणि मग शेअरचा भाव वाढला. वाढून 125 रुपये झाला.

रिलायन्स टेक्सटाईल इंडस्ट्रीजचे एकूण 11 लाख शेअर्स विकले आणि त्यापैकी फक्त 8 लाख 57 हजार शेअर्स अंबानींच्या दलालांनी विकत घेतले. कोलकात्यातील दलालच यात अडकले, त्यानंतर पुढच्या शुक्रवारी अंबानींच्या ब्रोकर्संनी कोलकात्यातील ब्रोकर्सकडून शेअर्स घेतले.

फ्युचर्स ट्रेडिंगमुळे ब्रोकर्सकडे शेअर्स नव्हते. ज्यांनी 131 रुपयांना शेअर्स विकले त्यांचा तोटा झाला. कारण तोपर्यंत खऱ्या शेअरची किंमत वाढली होती, यावेळी त्यांनी वेळ मागितला असता तर दलालांना प्रति शेअर 50 रुपये द्यावे लागले असते. पण धीरूभाईंच्या दलालांनी कोलकात्याच्या ऑपरेटर्सना वेळ देण्यास नकार दिला. त्यानंतर ब्रोकर्सना मोठा धक्का बसला आणि त्यांना रिलायन्स टेक्सटाईल इंडस्ट्रीजचे शेअर्स चढ्या भावाने खरेदी करून विकावे लागले. यावेळी तीन दिवस शेअर बाजार बंद ठेवावा लागला होता. धीरूभाई अंबानींच्या या पावलामुळे किरकोळ गुंतवणूकदारांचा कंपनीवर विश्वास वाढला.