अबब! ७ लाख नोकऱ्यांसाठी २२ कोटी अर्ज; लोकसभेत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 01:49 PM2022-07-28T13:49:59+5:302022-07-28T13:55:35+5:30

गेल्या आठ वर्षांत ७ लाख २२ हजार युवकांना नोकऱ्या दिल्याची कबुली केंद्र सरकारने लोकसभेत लेखी उत्तरात दिली आहे. या आठ वर्षांत २२ कोटींपेक्षा अधिक अर्ज नोकरीसाठी आले होते. केंद्रीय पीएमओ, कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात आकडेवारी दिली आहे. केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

गेल्या आठ वर्षांत ७ लाख २२ हजार युवकांना नोकऱ्या दिल्याची कबुली केंद्र सरकारने लोकसभेत लेखी उत्तरात दिली आहे. या आठ वर्षांत २२ कोटींपेक्षा अधिक अर्ज नोकरीसाठी आले होते. केंद्रीय पीएमओ, कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात आकडेवारी दिली आहे.

देशात रोजगार देण्याची अधिक शक्यता निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगून डॉ. सिंग म्हणाले, केंद्रीय कार्यालयांमध्ये नोकऱ्या उपलब्ध करण्यास विविध पावले उचलली आहेत.

सरकार काय म्हणते? २०२१-२२ या वर्षात केंद्र सरकारने प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हज (पीएलआय) योजना सुरू केली आहे. या योजनेतून पुढील ५ वर्षांत ६० लाख रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

वर्षनोकऱ्यातरुणांनी केलेले अर्ज २०१४-१५१ लाख ३० हजार२ कोटी ३२ लाख २०१५-१६१ लाख ११ हजार२ कोटी ९५ लाख

२०१७-१८७६ हजार १४७३ कोटी ९५ लाख २०१८-१९३८ हजार १००५ कोटी ९ लाख

२०१९-२०१ लाख ४७ हजार१ कोटी ७८ लाख २०२०-२१७८ हजार ५५५१ कोटी ८० लाख २०२१-२२३८ हजार ८५०१ कोटी ८७ लाख

सरकारचे प्रयत्न काय? प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत १० लाख रुपये कर्ज प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी आत्मनिर्भर रोजगार योजना

किती जणांना संधी? २०१८-१९ मध्ये तब्बल ५ कोटी ९ लाख तरुण उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातील ३८ हजार तरुणांना नोकरीची संधी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या अनेक विभागांमध्ये १ मार्च २०२२ पर्यंत तब्बल ९ लाख ७९ हजार पदे रिक्त असल्याची माहिती मंत्री डॉ. सिंग यांनी दिली.