शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aadhaar Card: ५ वर्षांपेक्षा कमी आहे मुलाचं वय; आधार कार्डासाठी नाही द्यावी लागणार 'ही' माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 8:34 AM

1 / 11
सध्या आधार कार्ड हे महत्त्वाचं दस्तऐवज बनलं आहे. कोणत्याही सरकारी कामासाठी किंवा अन्य महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे.
2 / 11
जर तुम्ही मुलांचं आधार कार्ड तयार करण्याचा विचार करतस असाल तर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI नं ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.
3 / 11
जर मुलांचं वय ५ वर्षांपेक्षा कमी असेल तर त्यांचे फिंगर प्रिन्ट आणि आय स्कॅन केलं जाणार नाही. ५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्याच मुसांचटं बायोमॅट्रिक स्कॅन अनिवार्य असेल, असं UIDAI कडून सांगण्यात आलं आहे.
4 / 11
पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बायोमॅट्रिक अनिवार्य नसलं तरी त्यांचं वय कमी असल्यानं त्यांच्या आईवडिलांचे फिंगर स्कॅन केले जातात.
5 / 11
जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डात कोणताही बदल करायचा असेल तर तुम्ही तो सहजरित्या घरबसल्या करू शकता. आता कोणत्याही व्यक्तीला त्याचा मोबाईल क्रमांकही सहजरित्या बदलता येणार आहे.
6 / 11
यामुळे कोणत्याही आधार कार्ड केंद्रावर जाण्याच्या व्यापापासून सुटका मिळणार आहे. तसंच यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही.
7 / 11
यापूर्वी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासाठी तुमच्या नजीकच्या आदार सेवा केंद्रात जावं लागत होतं. यादरम्यान, काही जणांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.
8 / 11
आता ही सेवा अधिक सुलभ करण्यात आली असून तुम्ही पोस्टमॅनद्वारेही आपल्या आधार कार्डावरील मोबाईल क्रमांक अपडेट करू शकता. याचाच अर्थ हे तुमचं काम घरबसल्या होणार आहे.
9 / 11
या नव्या सुविधेचा लाभ ६५० इंडियन पोस्ट पेमेंट बँक, १.४६ लाख पोस्टमॅन आणि ग्रामीण पोस्ट सेवेद्वारे घेता येणार आहे. सध्या IPPB च मोबाईल अपडेटची सेवा देत होतं.
10 / 11
नुकतंच आधार कार्डासाठी असलेली संस्था UIDAI नं आधारशी निगडीत निरनिराळ्या सेवांसाठीच्या शुल्कात बदल केले आहेत. नवं आधार कार्ड तयार करण्याची सुविधा आजही मोफत दिली जात आहे.
11 / 11
परंतु जर तुम्हाला तुमचा अॅड्रेस बदलायचा आहे, तर यासाठी तुम्हाला ५० रूपयांचं शुल्क द्यावं लागेल. तसंच जर तुम्हाला बायोमॅट्रिकमध्ये काही बदल करायचे असतील तर त्यासाठी शुल्क द्यावं लागेल. यासाठी आता तुम्हाला १०० रूपये मोजावे लागतील.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्डIndiaभारतonlineऑनलाइन