शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना 'या' आठवड्यात मिळणार डबल बोनस; जाणून घ्या, किती पगार वाढेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 5:22 PM

1 / 8
नवी दिल्ली : महागाई भत्ता, महागाई दिलासा, घरभाडे भत्ता वाढवल्यानंतर केंद्र सरकार या आठवड्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट देणार आहे. दरम्यान, कोरोना संकट काळात सरकारने कर्मचाऱ्यांना दीड वर्षासाठी महागाई भत्त्याची (Dearness allowance) थकबाकी दिली नाही.
2 / 8
अशा परिस्थितीत सप्टेंबर 2021 दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात डबल बोनस मिळू शकतो. सरकारने लाखो कर्मचाऱ्यांचा डीए 28 टक्के केला आहे. यासोबतच घरभाडे भत्ता (HRA) यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
3 / 8
केंद्र सरकारने आदेश जारी करताना म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनाच्या आधारावर घरभाडे भत्ता आणि डीए वाढवण्यात यावा. नियमानुसार, डीए 25 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास एचआरए वाढवावा लागेल. त्यामुळे केंद्र सरकारने एचआरए वाढवून 27 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.
4 / 8
खर्च विभागाकडून 7 जुलै 2017 रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले होते की, ज्यावेळी डीए 25 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तेव्हा एचआरए मध्येही सुधारणा केली जाईल. अशा परिस्थितीत 1 जुलै 2021 पासून डीए 28 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, त्यानंतर एचआरए वाढवणे देखील आवश्यक आहे.
5 / 8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना शहराच्या कॅटेगरीनुसार 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के एचआरए देण्यात येत आहे. 1 जुलै 2021 पासून डीएसह ही दरवाढ देखील लागू करण्यात आली आहे. एचआरएची कॅटेगरी X, Y आणि Z क्लास शहरांनुसार आहे.
6 / 8
म्हणजेच X क्लासमधील केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता 5400 रुपयांपेक्षा जास्त महिन्याला एचआरए मिळेल. यानंतर, Y क्लासमधील कर्मचाऱ्यांना दरमहा 3600 रुपये आणि Z क्लास असलेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा 1800 रुपये अधिक घरभाडे भत्ता मिळेल.
7 / 8
सातव्या वेतन आयोगानुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे किमान बेसिक वेतन 18,000 रुपये आहे. सध्या खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन 15000 रुपयांपासून सुरू होते. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जून 2021 पर्यंत 17 टक्के दराने 18,000 रुपयांच्या बेसिक पगारावर 3060 रुपये महागाई भत्ता मिळत होता.
8 / 8
जुलै 2021 पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्त्यानुसार दरमहा 5040 रुपये मिळतील. या आधारावर, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन 1980 रुपयांनी वाढले.
टॅग्स :Employeeकर्मचारीMONEYपैसा