RBI: २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबरच का दिली?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 12:45 PM2023-05-23T12:45:12+5:302023-05-23T12:58:45+5:30

आरबीआयने काही दिवसापूर्वी २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला.

2000 Rupees Exchange: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांच्या नोटा पाठिमागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

२००० रुपयांच्या नोटा बदलण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर देण्यात आली आहे. आरबीआयने आपल्या सर्कुलरमध्ये यावर स्पष्टीकरण दिले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सोमवारी पहिल्यांदाच २००० रुपयांच्या नोटा बदलण्याबाबत आपले विधान केले आहे. ते कायदेशीर निविदाच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गव्हर्नर म्हणाले की, आरबीआयचा २००० रुपयांची नोट जारी करण्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. ते म्हणाले की, बाजारात इतर मूल्यांच्या पुरेशा नोटा उपलब्ध आहेत, त्या बदलण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

नोटा जमा करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबरचा का देण्यात आली. या मागचे कारण शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे. यामगचे कारण म्हणजे लोकांना ४ महिन्याचा वेळ मिळावा अस त्यांनी म्हटले आहे.

कारण या काळात नोटा सहज बदलता येतात. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की नोटा बदलून घेण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी खूप जास्त आहे. कोणत्याही त्रासाशिवाय आणि घाई न करता नोटा बदलल्या जाऊ शकतात.

२००० रुपयांची नोट २०१६ मध्ये नोटाबंदीदरम्यान जारी करण्यात आली होती आणि २०१८-१९ मध्ये तिची छपाई थांबवण्यात आली होती.