1.5GBPS स्पीडसह अनेक सुविधा; 19 सप्टेंबर रोजी सुरू होणार Jio AirFiber सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 06:10 PM2023-09-18T18:10:25+5:302023-09-18T18:32:16+5:30

Jio Airfiber: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने रिलायन्स जिओची वायरलेस इंटरनेट सेवा Jio AirFiber सुरू होत आहे.

Jio Airfiber: सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओची वायरलेस इंटरनेट सेवा Jio AirFiber 19 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. या एअरफायबरमध्ये अनेक सुविधा मिळणार आहेत, ज्यामुळे युजर्सना एक वेगळाच अनुभव मिळेल. हे डिव्हाईस 1.5 Gbps पर्यंतचा वेग, हाय-डेफिनिशन व्हिडिओ स्ट्रीमिंग, गेमिंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सारख्या सेवा देईल.

या नवीन AiFiber लॉन्चशी संबंधित माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी यावर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) दिली होती. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर Jio AirFiber लॉन्च होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Jio Fiber ची स्पीड 1 Gbps पर्यंत आहे, तर Jio AirFiber 1.5 Gbps पर्यंत स्पीड देईल. अलीकडेच, रिलायन्स जिओने घोषणा केली होती की, त्यांनी 22 लायसेंस्ड सर्विस एशिया (LSA) पैकी प्रत्येकामध्ये 5G नेटवर्क लॉन्च पूर्ण केले आहे. कंपनीने गेल्या वर्षी घेतलेल्या स्पेक्ट्रमसाठी सर्व स्पेक्ट्रम बँडमध्ये शेड्यूलपूर्वी हे प्रक्षेपण पूर्ण केले आहे.

Jio AirFiber हे एक वायरलेस अॅक्सेस डिव्हाइस आहे, जे कंपनीच्या 5G नेटवर्कवर चालेल. यावर युजर्सना 1Gbps च्या वेगाने सुपरफास्ट डेटा मिळेल. हे डिव्हाइस वाय-फाय 6 वर काम करेल. याशिवाय यात WAN, LAN, USB आणि पॉवर पोर्ट सारखे पोर्ट असतील. याशिवाय, जिओ एअर फायबरच्या फीचर्सशी संबंधित कोणतीही माहिती मिळालेली नाही.

कंपनीने अद्याप या डिव्हाइसची किंमत जाहीर केलेली नाही. लॉन्चच्या तारखेलाच किंमत उघड होईल. पण रिपोर्टनुसार याची किंमत 6000 रुपये असू शकते.

चेअरमन मुकेश अंबानी यांनी रिलायन्स एजीएममध्ये सांगितले की, Jio AirFiber साठी कंपनीने दररोज 150,000 कनेक्शन्सपर्यंत विस्तार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी टीम सतत काम करत आहे. जिओ एअरफायबरच्या येण्याने युजर 5G हाय-स्पीड इंटरनेट वापरू शकतात.

कंपनीचे म्हणणे आहे की Jio AirFiber साठी ऑप्टिकल फायबर घालण्याची गरज नाही. जिओ फायबरची ऑप्टिकल फायबर पायाभूत सुविधा देशभरात 1.5 दशलक्ष किलोमीटर पसरलेली आहे. आता एअरफायबरच्या येण्याने अधिकाधिक फायबर नेटवर्क वाढतील.

जिओ एअर फायबरची Airtel Xtreme Fiber शी थेट स्पर्धा आहे. Airtel Xtreme Fiber चा मासिक बेसिक प्लान Rs 799 आहे. यामध्ये 100mbps च्या स्पीडने डेटा दिला जातो. तुम्हाला 6 महिन्यांसाठी त्याचे सबस्क्रिप्शन घ्यायचे असेल तर तुम्हाला 4,435 रुपये द्यावे लागतील. तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिटसाठी 2500 रुपये आगाऊ भरावे लागतील.