साप्ताहिक राशीभविष्य: मोहाच्या जाळ्यात अडकू नका; 'या' पाच राशींसाठी सोमवारचा दिवस शुभदायी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 08:57 IST2025-06-15T08:35:16+5:302025-06-15T08:57:46+5:30

Weekly Horoscope: १५ जून २०२५ ते २१ जून २०२५ हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

दि. १५ ते २१ जून २०२५ सप्ताहाच्या प्रारंभी रविवारी रवी मिथुन राशीत जाईल. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- शुक्र मेष राशीत, हर्षल वृषभ राशीत, गुरू, बुध आणि रवी मिथुन राशीत, मंगळ आणि केतू सिंह राशीत, प्लूटो मकर राशीत, राहू कुंभराशीत, तर शनी आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण मकर, कुंभ, मीन आणि मेष या राशींमधून राहील. या सप्ताहात शनिवारी योगिनी (स्मार्त) एकादशी आहे.

उन्नती होईल : नोकरी व्यवसायात उन्नतीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील, घरातील कामांसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल. वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घ्या. त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, मंगळवार, बुधवारी एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होऊ शकतो. मात्र, व्यवहारात सावधपणे वागण्याची गरज आहे. गुरुवार, शुक्रवार कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. प्रवासात सतर्क राहा. कुणालाही जामीन राहणे शक्यतो टाळा. काही कारणाने अचानक खर्च करावा लागेल. टीप- रविवार, सोमवार, शनिवार चांगले दिवस.

लाभ होतील : हा सप्ताह लाभदायक ठरणारा असेल. मात्र, स्वस्थ बसणे होणार नाही. सतत कशात ना कशात व्यस्त राहाल. काहींना मौजमजा करण्याच्या निमित्ताने पर्यटन घडेल, तर काहींना कामानिमित्त प्रवास करावा लागेल. नोकरीत नियमानुसार कामे करा. काहींना नवीन जबाबदारी मिळेल. मंगळवार, बुधवारी कार्यालयात कुरबुरी होणार नाहीत, याची काळजी घ्या. घरी पाहुणे मंडळी येतील. गुरुवार, शुक्रवारी फायदे होतील. आर्थिक उलाढाली जपून करा. शनिवारी चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. टीप- रविवार, सोमवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

उत्तरार्ध चांगला जाईल : पूर्वार्धापेक्षा तुम्हाला उत्तरार्ध चांगला जाईल. व्यवसायात सुरुवातीला दगदग होईल. फार घाईघाईत कामे करू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. आत्मविश्वासाच्या बळावर आपण मोठी जबाबदारी अंगावर घ्याल. थोडा त्रास सहन करून सरतेशेवटी यश मिळवाल. सामाजिक कार्य करताना मनावर संयम बाळगण्याची गरज आहे. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. शनिवारी लाभस्थानातील चंद्र, शुक्र युतीची अद्भुत फळे मिळतील. टीप- गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील: सप्ताहाच्या शेवटच्या टप्प्यात कर्क तुमच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. सुरुवातीला मोठ्या उत्साहाने एखादे काम हाती घ्याल. मात्र, मंगळवार, बुधवार तुम्हाला काही अडचणी येतील. संयम बाळगण्याची गरज आहे. गुरुवारपासून परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. समाजात तुमचा मान वाढेल. एखादी चांगली बातमी कळेल. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. शनिवारी नोकरीत पगारवाढ, पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. टीप- रविवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

संमिश्र ग्रहमान राहील या सप्ताहात आपल्याला संमिश्र सिंह ग्रहमानाचा अनुभव येईल. पूर्वार्धात काही कटू अनुभव येतील. मात्र, सप्ताहाचा शेवट सुखद घटनांनी होईल. व्यवसायात भरभराट होईल. कामानिमित्त दगदग, धावपळ करावी लागेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. आहाराचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. गुरुवार, शुक्रवार महत्त्वाच्या कामात काही अडचणी येतील. अचानक धनलाभ होईल. वाहन जपून चालवा. शनिवारी तुमचे महत्त्व वाढेल. टीप- मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस.

मोहात अडकू नका : नोकरीत तुमचे पारडे जड राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. मात्र, कामे आटोक्यात आणण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे लागेल. मुलांवर अपेक्षांचे ओझे वाढवू नका. मंगळवार, बुधवार आरोग्याची काळजी घ्या. तसेच तुमच्या योजना गुप्त ठेवा. गुरुवार, शुक्रवार प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. मोहाच्या जाळ्यात अडकले जाणार नाही, याची काळजी घ्या. शनिवारी अचानक धनलाभ होऊ शकतो. टीप- रविवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस

आरोग्याची काळजी घ्या : काही कटू तर काही गोड अनुभव येतील. नोकरीत तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. नवीन संथी मिळेल. मात्र, स्वतःला सिद्ध करण्यासाठी बरेच झटावे लागेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. लोक तुमच्या कामात चुका काढण्याचा प्रयत्न करतील. सरतेशेवटी तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. गुरुवार, शुक्रवार षष्ठ स्थानातील शनी, नेपच्यून, चंद्र युतीमुळे आरोग्याची काळजी घ्या. बेफिकीर वृत्ती नको. शनिवारी मन प्रसन्न राहील. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. टीप- रविवार, सोमवार, शनिवार चांगले दिवस.

मुलांशी संवाद ठेवा : कार्यक्षेत्रात तुमच्यावर मोठी जबाबदारी राहील. लोकांशी संवाद साधून मुत्सद्दीपणाने वागून आपली कामे करून घेतली पाहिजेत. सप्ताहाच्या सुरुवातीला धावपळ करावी लागू शकते. नोकरीतील बदलांकडे सकारात्मक पद्धतीने बघा. घरात वाद टाळा. मुलांना चांगल्या संधी मिळतील. त्यांच्याशी संवाद साधा. त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी वेळ द्या. जीवनसाथीची काळजी घ्या. आपल्या क्रोधाला आवर घातला पाहिजे. विविध प्रकारचे लाभ होतील. टीप- रविवार, सोमवार, गुरुवार चांगले दिवस.

लाभदायक ग्रहमान : धनस्थानापासून ते पंचम स्थानापर्यंत होणारे चंद्राचे भ्रमण लाभदायक ठरेल. सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल. एखादा महत्त्वाचा प्रकल्प हाती घ्याल आणि तो यशस्वीपणे राबवाल, आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मंगळवार, बुधवारी व्यवसायात कामाचा ताण राहील. तसेच मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. कुणी तुम्हाला चुकीचा सल्ला देईल. गुरुवार, शुक्रवार घरासंबंधीच्या कामात व्यस्त राहाल. नोकरीत नवीन संथी मिळेल. शनिवारी शुभवार्ता कळेल. टीप- रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

मुलांची प्रगती होईल : ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने कुंभराहील. मात्र, सुरुवातीला तुमच्या समोर काही अडचणी असतील. थोडा संयम बाळगण्याची गरज राहील. रविवार, सोमवार आपण घाईघाईत कामे करू नका, तसेच कायद्याची बंधने पाळा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. गुरुवार, शुक्रवारी महत्त्वाची कामे हाती घेण्यात उत्साह राहील. शनिवारी व्यवसायात भरभराट होईल. हाती पैसा खेळता राहील. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. टीप- गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

कटू-गोड अनुभव येतील : काही कटू तर काही गोड अनुभव येतील. लाभ स्थानातील चंद्रामुळे रविवार, सोमवार अनुकूल फळे मिळतील. महत्त्वाची कामे सोप्या पद्धतीने होतील. आर्थिक आवक चांगली राहील. मंगळवार, बुधवारी आपण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नियमानुसार कामे करा. गुरुवार, शुक्रवार तुमच्या समोरील अडचणी दूर होतील. नोकरीत प्रगती होईल. शनिवारी धनस्थानातून होणाऱ्या चंद्र शुक्र युतीची शुभ फळे मिळतील. टीप- रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.