साप्ताहिक राशीभविष्य: व्यवसायात भरभराट होईल, नोकरीत फायदा, अनेक अपेक्षा पूर्ण होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 01:40 PM2023-10-15T13:40:37+5:302023-10-15T13:53:52+5:30

Weekly Horoscope: १७ ऑक्टोबरपर्यंत रवी कन्येत तर त्यानंतर तूळ राशीत. जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

घटस्थापनेने सुरुवात होत असलेल्या या सप्ताहात रवी आणि बुध यांचा राशीपालट आहे, ग्रहस्थिती अशी- गुरू, राहू आणि हर्षल मेषेत शुक्र सिंहेत, १७ ऑक्टोबरपर्यंत रवी कन्येत तर त्यानंतर तूळ राशीत. १८ ऑक्टोबरपर्यंत बुध कन्येत व त्यानंतर तुळेत, मंगळ आणि केतू तूळ राशीत असून, त्यांच्याशी रवी व बुध यांची युती होईल.

प्लूटो मकरेत शनी कुनैत तर नेपच्यून मीन राशीत आहे चढावे भ्रमण तूळ, वृश्चिक, धनु आणि मकर राशीतून राहील. रविवारी घटस्थापना होईल. बुधवारी विनायकी चतुर्थी गुरुवारी ललिता पंचमी आहे. रविवार दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी आश्विन शुक्ल प्रतिपदा (दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री ००:३३ पर्यंत आहे. सायंकाळी ६.१२ पर्यंत चित्रा तर त्यानंतर स्वाती नक्षत्र राहील. रास तूळ आहे. आज दिवस चांगला आहे. देवीचे नवरात्र सुरू होत आहे. राहू काळ सायंकाळी ४:३० ते ६.

मेष- लाभ होतील, या सकारात्मक बदल जाणवतील. विविध प्रकारचे लाभ होतील. सहकारी, मित्र, नातेवाइकांच्या वर्तुळात तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. तुमच्यासमोरील अनेक अडचणी दूर होतील. मनावरील ताण निघून जाईल. मात्र, वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा, स्वतःची काळजी घ्या. फार दगदग होईल अशी कामे करू नका. काहींना पर्यटनाचा आनंद लुटता येईल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. कलाकार मंडळींना पुरस्कार जाहीर होतील, टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

वृषभ- व्यवसायात भरभराट होईल: व्यवसाय करणाऱ्यांना हा काळ चांगला आहे. मालाची विक्री चांगली होईल. मात्र, कायद्याची बंधने पाळणे आवश्यक आहे. नाहीतर तुमच्या विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत मिळेल. कामाच्या नादात तब्येतीची हेळसांड करू नका. हाती पैसा खेळता राहील. मात्र, कुणावरही चटकन विश्वास ठेवून नको तिथे गुंतवणूक कराल तर अडचणीत याल. जीवनसाथीचा सल्ला उपयुक्त ठरेल. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. वाहन जपून चालवा. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

मिथुन- तुमचे महत्व वाढेल: कार्यक्षेत्रात सतत व्यस्त राहाल. तुमचे महत्त्व वाढेल. तुमच्या बोलण्याला महत्त्व दिले जाईल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. मालाची विक्री चांगली होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मुलांची काळजी घ्या. त्यांच्याशी संवाद साधा. आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या मनातील काही योजना लोकांना आवडतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मात्र, त्यात तुम्हाला दगदग होईल. काही लोक तुम्हाला चुकीचा सल्ला देतील. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

कर्क- घरी पाहुणे येतील : सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्याला काम- धंद्याच्या निमित्ताने बरीच दगदग करावी लागेल. मात्र, त्यात तुमचा चांगला फायदा होईल. त्यामुळे कामाचे काही वाटणार नाही. मात्र, आपण तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. मुलांची प्रगती होईल. हाती पैसा आल्यामुळे मौजमजा करण्यासाठी खर्च करण्यासाठी आपण मागे-पुढे पाहणार नाही. नोकरीत बदलीची शक्यता आहे. घरी पाहुणे मंडळी येतील. महिलांची लगबग राहील. टीप- रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

सिंह- अनुकूल परिस्थिती राहील आपल्या अनेक अपेक्षा पूर्ण होतील, आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. थोरामोठ्यांचे सहकार्य मिळेल. वसुलीची कामे होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. भेटीगाठी होतील. त्यातून नवीन संधी मिळतील. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुम्हाला नवनवीन प्रयोग करून पाहता येतील, मनावरील ताण निघून जाईल. भावंडांशी गैरसमज होऊ शकतात. मुलांना चांगल्या संधी मिळतील. आपल्यासमोरील अनेक अडचणी दूर होतील. टीप- बुधवार, गुरुवार, शनिवार चांगले दिवस.

कन्या- तुमच्या मनात आत्मविश्वास राहील. त्या जोरावर आपण काही समस्या सोडवाल, आर्थिक व्यवहार जपून करा. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. थोरामोठ्यांचा मान राखा. मनात कुणाबद्दल काही अढी असेल तर ती काढून टाका. मोकळ्या मनाने लोकांशी संवाद साधा. काहीना प्रवास घडून येतील, व्यवसायात सतत कार्यरत राहाल. कुणी तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. टीप- बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

तूळ - सताहाची सुरुवात थोड़ी चाचपडत होईल. आपल्या समोर अनेक अडचणी असतील. मात्र, आपण कौशल्याने परिस्थिती नियंत्रणात आणाल, आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मात्र काही लोक गोड बोलून तुम्हाला अनावश्यक खर्चाला भरीस पाडतील, त्या दृष्टीने थोडे संयमाने वागण्याची गरज आहे, जवळच्या प्रवासाचा योग येईल. काहीना भेटवस्तू मिळतील. जवळच्या लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. जीवनसाथीचे हट्ट पुरवावे लागतील. टीप- बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

वृश्चिक- फार अचाट साहस करण्याचा प्रयत्न करण्याच्या फंदात पडू नका. प्रारंभी कामाचा बराच ताण राहील. मात्र, अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रवासात सतर्क राहा. तुमची गोपनीय माहिती इतरांना सांगू नका. फाजील आत्मविश्वास दाखवू नका. मागितल्याशिवाय इतरांना सल्ला देऊ नका. सप्ताहाच्या उत्तरार्धात दगदग कमी होईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण वाढेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. जीवनसाथीचा सल्ला उपयुक्त ठरेल, टीप- बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगला दिवस.

धनू- विविध प्रकारचे लाभ तुमचे महत्त्व वाबेल या सप्ताहात आपल्याला होतील. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. प्रवासाचे बेत ठरतील. काही किरकोळ स्वरुपाच्या अडचणी आल्या तरी आपण त्यातून सहज मार्ग काढाल, आर्थिक व्यवहार जपून करा. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. तुमच्या बोलण्याला महत्व दिले जाईल. व्यवसायात तुमचे अंदाज बरोबर ठरतील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

मकर- स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. चांगल्या बातम्या कानावर पडतील. मात्र वेळापत्रकानुसार कामकाज करणे आवश्यक आहे. त्यामुळे परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. नोकरीत कामाचा ताण राहील. नवनवीन कामे उपस्थित होतील. त्यात तुमचा बराच वेळ जाईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. तेवढ्याच प्रमाणात खर्चही होईल. मित्र, मैत्रिणींच्या भेटी होतील. त्यांचे चांगले सहकार्य मिळेल. अती धाडस करू नका. टीप- रविवार, सोमवार, बुधवार चांगले दिवस.

कुंभ- सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्याला संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल, काही किरकोळ स्वरुपाच्या अडचणी असतील. तुमच्या कामात लोक चुका काढतील. मात्र, तुमच्या चोख काम करण्याच्या स्वभावामुळे लोक तोंडावर पडतील. सरतेशेवटी तुमच्या बाजुने परिस्थिती राहील, अडचणी दूर होतील. विविध प्रकारचे फायदे होतील. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. नोकरीत नवीन संधी मिळेल. टीप बुधवार,गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

मीन- लोकांना ओळखा: सप्ताहाच्या पूर्वाधति महत्त्वाची कामे करणे टाळली तर बरे होईल. संयमाची परीक्षा पाहिली जाईल. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. रहदारीचे नियम पाळा. लोकांना तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ देऊ नका. कोण जवळचे आणि कोण दूरचे हे ओळखले पाहिजे. आर्थिक उलाढाली जपून करा, शांत चित्ताने कामे करा. सप्ताहाच्या उत्तरार्धात तुमच्या अडचणी दूर होतील. टीप- बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.