साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 07:07 IST2025-10-27T07:07:07+5:302025-10-27T07:07:07+5:30
Weekly Horoscope: २६ ऑक्टोबर २०२५ ते ०१ नोव्हेंबर २०२५ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: ग्रहस्थिती अशी की, हर्षल वृषभ राशीत, गुरू कर्क राशीत, केतु सिंह राशीत, तर शुक्र कन्या राशीत आहे. रवी आणि मंगळ तूळ राशीत असून, सोमवारी मंगळ वृश्चिक राशीत जाईल. तेथे त्याची युती बुधाशी होईल. प्लूटो मकर राशीत, तर राहु कुंभ राशीत आहे. शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.

चंद्राचे भ्रमण वृश्चिक, धनू, मकर आणि कुंभ या राशींमधून राहील. गुरुवारी शंकर महाराज प्रकट दिन आहे. याच दिवशी गोपाष्टमी आहे. शनिवारी प्रबोधिनी (स्मार्त) एकादशी आहे. शुक्रवारी पहाटे ६:४८ पासून पंचक सुरू होत आहे. शनिवारी पूर्ण काळ पंचक आहे.

मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करत असल्याने रुचक राजयोग जुळून येत आहे. एकंदरीत ग्रहस्थिती पाहता ऑक्टोबर महिन्याची सांगता कोणत्या राशींसाठी कशी असेल, तुमच्या राशीवर ग्रहमानाचा कसा प्रभाव असेल, ते जाणून घेऊया...

मेष: हा काळ काहीसा त्रासदायी आहे. वैवाहिक जीवन सुखद होईल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने खुश राहाल. ज्या काही समस्या होत्या त्या सहजपणे दूर होतील. तेव्हा टेन्शन घेऊ नका. एखाद्या प्रॉपर्टीत आर्थिक गुंतवणूक करणे हिताचे होईल. व्यापाऱ्यांनी मेहनत वाढवली तरच त्यांची ध्येयपूर्ती होऊ शकेल. मात्र त्यांनी अति आत्मविश्वास बाळगू नये. नोकरी करणाऱ्यांना चांगला लाभ होण्याची संभावना आहे. त्यांच्या योजनांना गती ते खुश होतील. विद्यार्थी मन लावून अध्ययन करतील. त्यांना जर एखादा ऑनलाईन अभ्यासक्रम करावयाचा असेल तर त्यासाठी ते अर्ज करू शकतात. परीक्षेच्या तयारीत ज्ञान मिळविण्यात ते गर्क असल्याचे दिसून येईल, त्याचा त्यांना लाभ होण्याची संभावना आहे. कोणत्याही प्रकारचा वाद टाळावा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना खुशखबर मिळू शकते.

वृषभ: हा कालावधी सामान्य फलदायी आहे. रागामुळे वैवाहिक जीवनात भांडण होण्याची संभावना आहे. तेव्हा सावध राहावे. आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल. खर्चात वाढ होईल. महागड्या वस्तूंची खरेदी तसेच हौसमौज करण्याच्या वस्तूंची खरेदी ह्यात भरपूर पैसा खर्च कराल. त्यामुळे आर्थिक स्थिती त्रास देऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना कामात काही बदल करावा लागेल. ते दुसऱ्या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. एखादा प्रकल्प होता स्थगित होऊ शकतो. निष्कारण खर्चाचा हिशोब ठेवावा लागेल. एखादा प्रवास करण्याची संधी मिळेल. सध्याची नोकरी सोडणे हिताचे होईल. व्यावसायिकांना एखादा नवीन प्रकल्प करण्याची ऑफर मिळू शकते. त्यांचा एखादा प्रकल्प जर स्थगित झाला असेल तर तो पुन्हा कार्यान्वित होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल असला तरी एखाद्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल. ते आपले ज्ञान वाढविण्यात यशस्वी होतील. त्यांच्या अध्ययनातील समस्या सोडविण्यासाठी त्यांना वरिष्ठांशी बोलावे लागेल.

मिथुन: हा काळ मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जीवन सुखद होईल. खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. प्राप्तीच्या स्रोतांवर लक्ष द्यावे. कोणालाही पैसे उसने देऊ नये. जर कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते सहजपणे मिळू शकेल. व्यापाऱ्यांसाठी चांगला कालावधी आहे. त्यांना मेहनत जास्त करावी लागेल. काही नवीन लोक त्यांच्या व्यवसायाची वृद्धी करण्यात मदतीस आल्याने ते खुश होतील. नोकरी करणाऱ्यांनी कामांवर लक्ष द्यावे. त्यांनी वरिष्ठांच्या बोलण्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. ते एखाद्या नवीन कामाची योजना बनवू शकतील. विद्यार्थ्यांना मेहनतीवर विश्वास ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. एखाद्या संशोधनास अनुकूल काळ आहे. ज्ञानवृद्धीची कोणतीही संधी आपण वाया दवडू नये. अभ्यासाच्या बरोबरीने एखाद्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळू शकते.

कर्क: मिश्र फलदायी कालावधी आहे. वैवाहिक जीवनात काही गोंधळ उडेल. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने भांडण वाढून नात्यात कटुता येण्याची संभावना आहे. पैशांची काळजी करावी लागणार नाही. योजनांवर लक्ष द्यावे. एखाद्या गुंतवणुकीची योजना आखू शकता. कोणतीही महत्त्वाची माहिती कोणास देऊ नये. तसेच कोणालाही पैशांचे वचन देऊ नये. व्यापाऱ्यांना मेहनत जास्त करावी लागेल. नवीन ओळखी करून घेण्यात यशस्वी व्हाल. कोणाकडे आर्थिक मदत मागितली तर ती सहजपणे मिळू शकेल. नोकरीच्या ठिकाणी विरोधकांपासून थोडे सावध राहावे लागेल. काही गुप्त शत्रू त्रास देतील. विद्यार्थ्यांनी एखादा अभ्यासक्रम सोडून दिला असल्यास ते त्यात पुन्हा प्रवेश घेऊ शकतात. त्यांना परीक्षेसाठी खूप मेहनत करावी लागेल. कोणत्याही कामात घाई करू नये. निष्काळजीपणामुळे काही समस्या वाढण्याची संभावना आहे.

सिंह: गोंधळ उडवणारा काळ आहे. कामातील निष्काळजीपणामुळे कामाचे टेन्शन राहील. काही खर्च डोकेदुखी होतील. काही खर्च मनाविरोधात होण्याची संभावना आहे. वडील किंवा इतर कोणास समस्या असल्याने त्रासून जाल. आर्थिक गुंतवणूक करण्याची योजना आखू शकाल. व्यावसायिकांना एखादा नवीन प्रकल्प मिळाल्याने ते त्यात व्यस्त राहतील. त्यांना कामे एकजुटीने करावी लागतील. नोकरी बदलण्याचा विचार करू नये. सध्याच्या नोकरीतच टिकून राहावे. विद्यार्थी मित्रांसह मौजमजा करण्यावर लक्ष देत राहिल्यास अभ्यास पूर्ण न झाल्याने अपेक्षित यश प्राप्ती होऊ शकणार नाही. ज्ञानवृद्धी करावी लागेल. समाज माध्यमांपासून स्वतःला काही काळासाठी दूर ठेवावे लागेल.

कन्या: जीवनात काही गैरसमज पसरू शकतील. कोणत्याही कामात गडबड होणार नाही ह्याची काळजी घ्यावी, अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरीच्या ठिकाणी विचारपूर्वक कामे करावी लागतील. व्यापारात दिलेले प्रस्ताव सहकाऱ्यांकडून स्वीकारले जाण्याची संभावना आहे. त्यामुळे खुश व्हाल. विद्यार्थी अभ्यासास प्राधान्य देतील. ते एकाग्रतेने अभ्यास करून यशस्वी होतील. एखाद्या शासकीय नोकरीसाठी परीक्षा देण्याची संधी मिळू शकते, जी हिताची असेल. कामाच्या आधिक्यामुळे चिडचिड होईल. कामात व्यस्त राहिल्याने स्वतःकडे लक्ष राहणार नाही.

तूळ: हा काळ सामान्य फलदायी आहे. खर्चाच्या बरोबरीने बचतीसाठी योजना आखावी लागेल. दीर्घकालीन आर्थिक गुंतवणूक करावी ह्याचा अंदाज येऊ शकेल. प्रॉपर्टीसाठी पैसा खर्च कराल. दीर्घकाळानंतर एखाद्या मित्राशी भेट होईल. व्यावसायिकांनी अति आत्मविश्वास बाळगू नये. कामांचा वेग थोडा कमी राहिला तरी चांगला लाभ होण्याची संभावना आहे. तेव्हा जास्त आर्थिक गुंतवणूक करणे हितावह होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी काम इतरांवर सोपवू नये, अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जी जबाबदारी सोपविण्यात येईल ती वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थी आपले लक्ष्यांक गाठू शकतील. एखाद्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्र व कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवू शकाल.

वृश्चिक: सकारात्मक फळे देणारा कालावधी आहे. जोडीदाराच्या भावनांचा सन्मान करावा लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. एखाद्या प्रॉपर्टीत आर्थिक गुंतवणूक करण्याची योजना आखाल. घराबरोबर स्वतःसाठी भरपूर पैसा खर्च कराल. परंतु जोडीने बचतीसाठी योजना आखाल. व्यावसायिकांना एखादी मोठी ऑर्डर मिळण्याची संभावना आहे. चांगला लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना मनाजोगे काम मिळण्या व्यतिरिक्त पदोन्नती मिळेल. प्राप्तीत वाढ होईल. विद्यार्थी अभ्यासात काहीसे भ्रमित झाल्याने त्रासून जातील. परीक्षा देण्यास ते नाखूष होतील. विषय बदलावयाचे असतील तर अध्यापकांचा सल्ला त्यांनी जरूर घ्यावा. कोणतेही काम घाईघाईत करू नये. कामाच्या आधिक्यामुळे थकवा, अशक्तपणा इत्यादी जाणवेल.

धनु: हा काळ काहीसा नाजूक आहे. खर्चाचा हिशोब ठेवावा लागेल. शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर्स बाजाराचा कल समजून घ्यावा लागेल. एखादी योजना आखूनच आर्थिक गुंतवणूक करणे हितावह ठरेल. व्यापारात अत्यंत विचारपूर्वक वाटचाल करावी लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामगिरीने वरिष्ठांना खुश करण्याचा प्रयत्न करतील. पदोन्नतीसह एखादे बक्षीस मिळू शकेल. विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी झाल्याने अभ्यासात ते मागे राहतील. तसेच ते इतर प्रवृत्तीत गुंतून जातील. त्यामुळे अध्ययनात त्यांना समस्यांना सामोरे जावे लागेल. एखाद्या स्पर्धेची तयारी करण्यास अनुकूल असल्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

मकर: चांगला कालावधी आहे. खर्चांवर नियंत्रण ठेवावे. कोणतेही काम घाईत करू नये. कोणतीही आर्थिक देवाण - घेवाण लेखी स्वरूपात करावी. व्यापारात कोणतेही काम विचारपूर्वकच करावे लागेल. एखाद्या सौद्यामुळे समस्यांना सामोरे जावे लागू शकते. दिखाऊपणाच्या नादी लागू नये. कोणतेही जोखीम असलेले काम आपण करू नये. नोकरी करणाऱ्या व्यक्ती जबाबदाऱ्या पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करतील. कामावर पूर्ण लक्ष राहील. मेहनतीने विद्यार्थी कोणत्याही परीक्षेत यशस्वी होऊ शकतील. मात्र वेळ वाया दवडू नये. अन्यथा त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. ज्ञान वाढविण्याची संधी मिळाल्यास त्यांनी ती सोडू नये. दिनचर्येत योग्य तो बदल करावा.

कुंभ: चांगला काळ आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा सल्ला घेऊ नये. ते चुकीचा सल्ला देण्याची संभावना आहे. एखादे नवीन काम करण्याची इच्छा जागरूक होऊ शकते. व्यापारी यशस्वी होतील. व्यवसायास परदेशात प्रसिद्धी मिळेल. काही नवीन लोक व्यवसायात ज्ञानाची भर घालतील. एखादा मोठा प्रकल्प मिळाल्याने खुश व्हाल. नोकरीच्या ठिकाणी सावध राहावे लागेल. कोणालाही महत्त्वाची माहिती देऊ नये. कदाचित ते गुप्त शत्रू असू शकतात. एखाद्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनतीवर विश्वास ठेवावा. इतरत्र वेळ घालविण्याऐवजी परीक्षेची तयारी करावी.

मीन: हा कालावधी मध्यम फलदायी आहे. वैवाहिक जीवनात दोघे एकमेकांना पूर्ण सहकार्य करतील. आर्थिक बाबतीत थोडे सावध राहावे लागेल. काही लहान-सहान समस्या वाढतच जातील. वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवावे. एखाद्या कायदेशीर बाबीत जास्त पैसे खर्च करावे लागतील. व्यापाऱ्यांनी जर एखाद्याकडे मदत मागितली तर ती त्यांना सहजपणे मिळू शकेल. बाजारातील परिस्थिती विचारपूर्वक समजून घ्यावी लागेल. नोकरी बदलण्याच्या विचारात असणाऱ्या व्यक्तींनी सध्या थांबणे उचित होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात कितीही समस्या आल्या तरी न घाबरता ते सामोरे जाऊ शकतील. जर ते एखाद्या सरकारी नोकरीसाठी परीक्षा देण्याची तयारी करत असतील तर त्यात ते यशस्वी होऊ शकतील.

















