साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 07:07 IST2025-09-22T07:07:07+5:302025-09-22T07:07:07+5:30

Weekly Horoscope: नवरात्रोत्सवाची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल? जाणून घ्या…

Weekly Horoscope: कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- हर्षल वृषभ राशीत, गुरू मिथुन राशीत, शुक्र आणि केतु सिंह राशीत, बुध, रवि कन्या राशीत, मंगळ तूळ राशीत, प्लूटो मकर राशीत, राहु कुंभ राशीत, तर शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.

चंद्राचे भ्रमण सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक या राशींमधून राहील. सोमवारपासून नवरात्र सुरू होत आहे. २५ सप्टेंबर रोजी विनायक चतुर्थी आहे. २६ सप्टेंबर रोजी ललिता पंचमी आहे. २७ सप्टेंबर रोजी सूर्याचा हस्त नक्षत्रात प्रवेश होणार आहे.

एकंदरीत ग्रहमान पाहता, नवरात्रोत्सवाची सुरुवात कोणत्या राशींसाठी कशी असेल? नवदुर्गांची कृपा कोणत्या राशींवर राहू शकेल? कुटुंब, शिक्षण, व्यवसाय, व्यापार, नोकरी, आर्थिक आघाडी यासंदर्भात आगामी काळ कसा ठरू शकेल? जाणून घ्या...

मेष: काही समस्या असल्याने सतर्क राहावे लागेल. विचारपूर्वक पैसा खर्च करावा लागेल. घराच्या सजावटीसाठी पैसा खर्च कराल. चांगली आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करावा लागेल. कारकीर्द उसळी घेत असल्याचे जाणवेल. महिलांशी संबंधित वस्तूंचा व्यवसाय करणे हितावह ठरेल. नोकरी करणाऱ्यांनी कोणत्याही कामात घाई करू नये. जबाबदाऱ्या सहजतेने पार पाडाव्या. विद्यार्थ्यांना ज्ञान वाढविण्याची संधी मिळेल. त्यांना गुरुजनांचे सहकार्य मिळेल. त्यांनी एखादे नवीन काम करणे हितावह होईल. दिनचर्येत सुधारणा करावी लागेल. आहाराकडे दुर्लक्ष करू नये.

वृषभ: आर्थिक नियोजन करून वाटचाल करावी लागेल. बेफिकीर राहिल्यास हातून चुका होण्याची संभावना आहे. घाईघाईत कोणतीही आर्थिक गुंतवणूक करू नये. कारकीर्दीत खुशखबर मिळू शकते. स्थगित कामे पूर्ण होतील. नोकरी विचारपूर्वक बदलणे हितावह होईल. पदोन्नती संभवते. एखाद्या गोष्टीने अति उत्साहित झाल्यास विद्यार्थ्यांसाठी नुकसानदायी ठरेल. त्यांनी परीक्षेच्या तयारीवर लक्ष देणे गरजेचे आहे. ते बेफिकीर राहिल्यास समस्या वाढू शकतात.

मिथुन: आर्थिक बाबीत सावध राहावे लागेल. कोणाच्या सांगण्यावरून कोणत्याही योजनेत आर्थिक गुंतवणूक करू नये. शेअर्स बाजारात गुंतवणूक करणे हिताचे होईल. आर्थिक बाबीत एखाद्याशी वचनबद्ध होऊ शकता. कारकिर्दीसाठी काळ चांगला आहे. एखाद्या व्यवसायाची सुरवात करू शकता. काही नवीन लोकांशी भेटीगाठी वाढवण्यात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांना इतरांवर अवलंबून राहिल्याने नुकसान सोसावे लागेल. तेव्हा इतरांवर विसंबून राहू नका. सल्ला वरिष्ठांच्या पसंतीस उतरेल. विद्यार्थी विषय बदलू शकतात. मित्रांच्या सहवासात हिंडण्या-फिरण्या ऐवजी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे हितावह होईल. कोणाच्या सांगण्यावरून नवीन अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ नये.

कर्क: सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतील.आर्थिक बाबींमुळे आपण खुश व्हाल. चांगला नफा झाल्याने आर्थिक समस्या दूर होतील. प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. गरजा सहजतेने पूर्ण कराल. व्यापारी एखाद्या कामासाठी भागीदारी करू शकतील. व्यापारासाठी काही नवीन मशीनरी इत्यादींची खरेदी करतील जी त्यांच्यासाठी चांगली असेल. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. कामगिरीने वरिष्ठ प्रभावित होतील. जर नोकरीत बदल करावयाचा असेल तर तसे करू शकता. हा बदल हिताचा असेल. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात काही समस्या असल्यास त्या दूर होतील. त्यांना एखाद्या आवडत्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल. कामाप्रति रुची जागरूक होईल. अध्ययनात अध्यापक मदत करतील.

सिंह: आर्थिक बाबतीत विचारपूर्वक वाटचाल करावी लागेल. कामानिमित्त भरपूर प्रवास करावे लागू शकतात. काही खरेदी करू शकता. आवडत्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी पैसा खर्च कराल. खर्चात वाढ झाल्याने त्रासून जाल. व्यापार करणाऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. त्यांना बाहेरच्या लोकांचे सहकार्य मिळेल, जे व्यवसायास एक नवीन दिशा देईल. नोकरी करणाऱ्यांच्या कामात काही समस्या येण्याच्या संभाव्यतेमुळे त्यांना मेहनत चालूच ठेवावी लागेल. जर काही गोंधळ झाला तर वरिष्ठांशी अवश्य चर्चा करावी. विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित झाल्यामुळे त्यांची अभ्यासातील एकाग्रता कमी होईल. एखाद्या स्पर्धेची तयारी करण्याची योजना आपण आखू शकता. काही कौटुंबिक समस्या तणाव घेऊन येऊ शकतात.

कन्या: चांगला काळ आहे. कोणावरही आर्थिक बाबतीत भरवसा करू नये. धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. प्राप्तीत वाढ होईल. परंतु खर्च कमी होणार नाहीत. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी पैसा खर्च कराल. व्यापाऱ्यांचे नुकसान होण्याची संभावना असल्याने त्यांनी विचारपूर्वक पैशांचा विनियोग करावा. व्यवसायात एखादी कमतरता असल्याचे वाटत असेल तर ती दूर करण्याचा प्रयत्न करावा. घाईघाईने कोणतेही काम करू नये. नोकरी करणाऱ्यांना एखादी खुशखबर मिळेल. कामानिमित्त प्रवास करावे लागतील. सहकाऱ्यांची वागणूक चांगलीच असेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. चांगल्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकेल. त्यांनी दिलेल्या एखाद्या परीक्षेचा निकाल लागू शकतो. सभोवतालच्या व्यक्तींचे सहकार्य मिळू शकेल.

तूळ: खर्च करण्याची सवय त्रास देईल. खर्चातील वाढ समस्या निर्माण करेल.घेतलेला एखादा निर्णय योग्य नसेल. आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. व्यापारातील एखादा प्रकल्प पुन्हा सुरू होऊ शकतो. एखादे काम भागीदारीत करणे हितावह होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांचे वरिष्ठ महत्व देतील. ते पगारवाढ करू शकतात. कामे निष्ठापूर्वक करावीत. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात व्यस्त राहतील. त्यांची परीक्षा जवळ येत असल्याने एखादा प्रकल्प अपूर्ण राहिला असेल तर तो पूर्ण करण्याच्या प्रयत्नात ते राहतील. अध्ययनात मनमानी करू नये. कुटुंबीय जो अभ्यासक्रम करण्याचा सल्ला देतील तो करण्याचा प्रयत्न जरूर करावा. ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करावा लागेल. दिनचर्येत सुधारणा करण्याचा प्रयत्न आपणास करावा लागेल. प्राणायाम, व्यायाम, सकाळचे फिरणे इत्यादींवर लक्ष द्यावे लागेल.

वृश्चिक: प्रगती करणारा काळ आहे. कोणत्याही प्रकारे आर्थिक देवाण-घेवाण करू नये. खिशात हात विचारपूर्वक घालावा. मुलांच्या मागण्या पूर्ण करण्यात अडचणी येतील. व्यापार करणाऱ्या व्यक्ती काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात व्यस्त राहतील. ते आर्थिक स्थितीची योजना आखतील. काही नवीन लोक कामात सहकार्य करतील. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. वरिष्ठ आपणास एखादा पुरस्कार देण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे मित्र त्यांचे लक्ष विचलित करतील. ते विविध ठिकाणी फिरावयास जातील. तसेच ते इतर प्रवृत्तीत व्यस्त राहतील. त्यामुळे अभ्यासावरील त्यांचे लक्ष कमी होईल. अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. अति आत्मविश्वासात राहाल.

धनु: प्रगती करणारा काळ आहे. खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. एखाद्या प्रॉपर्टीच्या बाबतीत वयस्करांचा सल्ला घेऊन त्यात गुंतवणूक करणे हितावह होईल. शेअर्स बाजाराशी संबंधित लोकांना चांगला लाभ होऊ शकतो. कारकिर्दीत चढ-उतार येतील. व्यापाऱ्यांनी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन योजना राबवाव्यात. घाई-गडबडीत घेतलेला एखादा निर्णय नुकसान करू शकतो. नोकरी करणाऱ्यांना दुसऱ्या ठिकाणाहून नोकरीचे बोलावणे येऊ शकते, परंतु सध्याच्या नोकरीत त्यांची पदोन्नती होण्याची संभावना आहे. विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत काहीसे त्रासून जातील. कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ नये. कामगिरी निकृष्ट होईल. फिरावयास जाणार असाल तर सामानाची सुरक्षा तपासून घ्यावी.

मकर: मध्यम फलदायी काळ आहे. पैसे बुडाले असल्याने ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्या पैसे परत मिळाल्याने आता दूर होतील. आर्थिक बाबीची काळजी करू नये. परंतु कोणालाही पैशासाठी वचन देऊ नये. व्यापारी सुधारणा करण्यात व्यस्त राहतील. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना समस्यांवर लक्ष देण्याची गरज आहे. एखाद्या कामाकडे दुर्लक्ष करणे समस्या निर्माण करू शकतात. नोकरी बदलण्याचा विचार सुद्धा करू शकता. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. जर काही टेन्शन असले तर ते दूर करतील. ते एखाद्या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. ज्ञान वाढविण्याची संधी हातून जाऊ देणार नाहीत.

कुंभ: सामान्य फलदायी काळ आहे. पैशांची काळजी करण्याची आवश्यकता नाही. बुडालेले पैसे मिळाल्याने आर्थिक स्थिती बळकट होईल. असे असले तरी प्राप्तीत वाढ करण्याचा प्रयत्न कराल. त्याच्या जोडीने भविष्याची योजना आखाल. व्यापारी सतर्क राहून कामे करतील. त्यांना नवीन लोकांशी ओळख करण्याची संधी मिळेल, जी त्यांच्या व्यवसायास पोषक ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामानिमित्त थोडे प्रवास करावे लागू शकतात. जर एखादी जवाबदारी सोपविण्यात आली तर ती पूर्ण करा. वरिष्ठांविषयी कोणत्याही सहकाऱ्याशी काही बोलू नका. विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत सतर्क राहतील. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल. ते एखाद्या नोकरीसाठी तयारी करू शकतात, ज्याची परीक्षा देण्यासाठी त्यांना जास्त मेहनत करावी लागेल. ते आपल्या वरिष्ठांची मदत घेतील. दिनचर्येत सुधारणा करावी. कामाच्या बरोबरीने स्वतःसाठी थोडा वेळ काढावा.

मीन: चांगला काळ आहे. आर्थिक प्राप्ती तर होईलच, परंतु त्याच्या जोडीने खर्च होतील. आर्थिक बाबतीत काही अंशी यशस्वी करावा. एखाद्या सरकारी योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करावा. कोणाशीही भागीदारीत व्यवसाय करू नये. कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता कामे केल्यास व्यापाऱ्यांसाठी समस्या निर्माण होऊ शकतात. एखादा सहकारी दगा देऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ झाल्याने ते प्रसन्न होतील. एखाद्या नवीन नोकरीची प्राप्ती होऊ शकते. कार्यक्षेत्री कोणालाही मनातील विचार सांगू नका. विद्यार्थी अध्ययनास प्राधान्य देतील. ते वेळ वाया जाऊ देणार नाहीत. त्यांची एकाग्रता उंचावलेली असेल. त्यांना एखाद्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकतो.