हनुमान जयंती: ८ राशींना मनासारखा काळ, मिळकत वाढेल; नवी डील फायदेशीर, वर्क फ्रॉम होमचा लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 02:51 PM2024-04-21T14:51:35+5:302024-04-21T15:02:25+5:30

Weekly Horoscope: २१ एप्रिल २०२४ ते २७ एप्रिल २०२४ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहात मंगळ आणि शुक्र यांचा राशीपालट आहे. ग्रहस्थिती अशी रवी, गुरु हर्षल मेष राशीत आहेत, केतू कन्या राशीत, तर प्लूटो मकर राशीत आहे. मंगळ आणि शनी कुंभ राशीत असून, २३ एप्रिल रोजी मंगळ मीन राशीत प्रवेश करेल. तेथे त्याची युती बुध, शुक्र, राहु आणि नेपच्यून यांच्याशी होईल. २४ एप्रिल रोजी शुक्र मीन राशीतून मेष राशीत जाईल.

चंद्राचे भ्रमण कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीतून राहील. २१ एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती आहे. २३ एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे. २७ एप्रिल रोजी संकष्टी चतुर्थी आहे. मराठी नववर्षातील ही पहिलीच संकष्ट चतुर्थी असणार आहे. चैत्रातील या संकष्ट चतुर्थीचे महत्त्व विशेष असल्याचे सांगितले जाते.

चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती, संकष्ट चतुर्थी यासह नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह तसेच शुक्र ग्रह यांचे राशीपरिवर्तन यांमुळे आगामी काळ वैशिष्ट्यपूर्ण मानला जात आहे. मंगळ आणि शुक्राचा शुभ प्रभाव कोणत्या राशींवर पडू शकेल? जीवनातील विविध आघाड्यांवर हा कालावधी कसा ठरू शकेल? जाणून घेऊया...

मेष: प्रेमिकेची ओळख कुटुंबियांना करून द्याल. वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. रोजच्या प्राप्तीत वाढ होईल. सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नवीन कंत्राट मिळतील. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. मुलांच्या शिक्षणासाठी परिचितांशी बोलणी कराल. घरी पूजा-पाठाचे आयोजन होईल. भावंडांच्या उच्च शिक्षणासाठी मित्रांशी बोलणी कराल. समाज कल्याणासाठी जे कार्य करीत आहेत त्यांच्या मान-सन्मानात वृद्धी होईल. कुटुंबाची काही जवाबदारी सोपविण्यात येईल, जी निश्चितच पार पाडू शकाल. त्याचा खूप फायदा होईल. कुटुंबियांच्या हृदयात आदर उंचावेल. नवीन खरेदी करू शकता.

वृषभ: प्रेमीजन सुखद क्षण व्यतीत करतील. दांपत्य जीवनात सुख-शांती नांदेल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांसह एखाद्या तीर्थयात्रेस जाण्याचे आयोजन कराल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. घराच्या दुरुस्तीसाठी व सजावटीसाठी पैसा खर्च कराल. मुलांचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या मदतीने आपण आपली आर्थिक बाजू भक्कम करू शकाल. एखादे नवीन काम करण्याचा बेत आखाल. निष्काळजीपणा करू नका. विद्यार्थी मन लावून अभ्यास करत असल्याचे दिसेल. नवीन वाहनाचे सौख्य लाभेल. इच्छा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येईल.

मिथुन: आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यापारी आपल्या व्यवसायास पुढे नेण्यात यशस्वी होतील. नवीन कंत्राट मिळतील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून चांगली बातमी मिळेल. वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांचे मन विचलित झाल्याने त्यांचे मन अभ्यासात लागणार नाही. जुन्या आर्थिक गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जे घरातून काम करतात त्यांना चांगला लाभ होण्याची संभावना आहे. मित्रांसह एखादा नवीन व्यवसाय सुरु करू शकता. विद्यार्थी एखाद्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन त्यात यशस्वी होतील. क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडविण्याच्या दिशेने ते वाटचाल करू शकतात. नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी मिळेल.

कर्क: नोकरी करणाऱ्यांना कार्यक्षेत्रात चढ-उतार होत असल्याचे जाणवेल. व्यापाऱ्यांना व्यवसायात नवीन कंत्राट मिळाल्याने व्यवसाय वृद्धी करण्यात यश प्राप्त होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल. जे विद्यार्थी स्पर्धेची तयारी करत आहेत त्यांना यश प्राप्त होईल. ऋतुमानातील बदलामुळे प्रकृतीत चढ-उतार होताना दिसू शकेल. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जोवनात चढ - उतार होत असल्याचे जाणवेल. रोजच्या प्राप्ती वाढ होईल. जमिनीत गुंतवणूक करू शकता. माता-पित्यांचा सहवास व सहकार्य लाभेल. राजकारणात यश प्राप्त होईल. नेते मंडळींची भेट संभवते. नवीन वाहनाचे सौख प्राप्त होऊ शकेल. पैतृक संपत्तीतून धन लाभ संभवतो. कोणतीही आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी, अन्यथा नुकसान होऊ शकते. आवश्यकता भासल्यास एखाद्याचा सल्ला घ्यावा.

सिंह: वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवास येतील. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. जे भागीदारीत व्यवसाय करत आहेत त्यांना चांगला लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. विषय बदलावयाचे असतील तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे. कुटुंबाच्या प्रगतीसाठी वैवाहिक जोडीदारासह कार्य करत असल्याचे दिसून येईल. वडिलधाऱ्यांकडून आपल्यावर कुटुंबाची एखादी जवाबदारी सोपविण्यात येईल, जी आपण निश्चितच पूर्ण करू शकाल.

कन्या: विशेष प्राप्ती होणार नाही. खर्च वाढतील. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कुवतीनुसार प्रगती होत असल्याचे दिसेल. जे समाज कल्याणासाठी कार्य करत आहेत, त्यांना अधिक कार्य करण्याची संधी मिळेल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्ती होईल. वडिलधाऱ्यांचा वरदहस्त राहील. मित्रांच्या मदतीने आपणास प्राप्तीचे काही स्रोत प्राप्त होतील. व्यस्त कार्यक्रमातून थोडा वेळ काढून आपण मित्रांशी व कुटुंबियांशी फोनवर संवाद साधाल. मित्रांना भेटावयास व त्यांच्यासह फिरावयास जाऊ शकता. घरात पूजा-पाठाचे आयोजन होईल. कुटुंबियांसह एखाद्या पार्टीत सहभागी व्हाल. दिनचर्येत सकाळचे फिरणे, योगासन इत्यादींचा समावेश करणे हितावह ठरेल. एखादे जुने वाहन विकण्याचा प्रयत्न करू शकता.

तूळ: दाम्पत्य जीवनात सुख-शांती नांदेल. जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचे आयोजन कराल. आर्थिक स्थिती नाजूक राहील. प्राप्ती ठीक राहील. खर्चात खूप मोठी वाढ होऊ शकते. शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. व्यापाराच्या निमित्ताने प्रवास करण्याची संधी मिळेल. हे प्रवास आपल्यासाठी लाभदायी होतील. नवीन कंत्राट मिळाल्याने व्यवसायात वाढ व आर्थिक लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. विद्यार्थी मन लावून अभ्यास करत असल्याचे दिसून येईल. स्पर्धेत यश प्राप्ती संभवते. आपणास मनःशांती मिळेल.

वृश्चिक: वैवाहिक जीवनात थोडा तणाव जाणवेल. प्रेमिकेची ओळख कुटुंबियांशी करून देऊ शकता. प्राप्ती ठीक राहील, परंतु खर्च मात्र वाढतील. अंदाजपत्र बनविणे हितावह होईल. व्यापाऱ्यांना मोठा लाभ होईल. सरकारी क्षेत्राकडून फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे मन विचलित झाल्यामुळे लक्ष अभ्यासाकडे असणार नाही. राजकारणात यश संभवते. कुटुंबाच्या कल्याणासाठी एखादा मोठा निर्णय घ्याल. निर्णय कठोर व कठीण असू शकतो. परंतु तो कुटुंबाच्या हिताचा असल्याने तो घ्यावाच लागेल.

धनु: कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल. प्रेमिकेची ओळख कुटुंबियांना करून देऊ शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील. कामाच्या ठिकाणी आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकता. खर्चात वाढ होईल. सरकारी क्षेत्राकडून लाभ होऊ शकतो. पूर्वी आर्थिक गुंतवणूक केली असेल तर त्याचा पूर्ण लाभ होईल. माता-पित्यांसह एखाद्या धार्मिक ठिकाणी फिरावयास जाल. सासुरवाडीकडून एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. विवाहेच्छुकांना मनपसंत जोडीदार मिळाल्याने त्यांची मनोकामना पूर्ण होईल. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील.

मकर: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जीवनात सुखद क्षण व्यतीत करतील. जोडीदारास एखादे नवीन कार्य सुरु करून देऊ शकतात. प्राप्तीत वाढ होऊ शकेल. व्यापारात नवीन कंत्राट मिळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाच्या ठिकाणी त्यांना देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. काही विशिष्ट व्यक्तींच्या मदतीने व्यापारात पुढे जाण्यात यशस्वी व्हाल. प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर ज्ञान प्राप्त कराल. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीचे सहकार्य मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेले विद्यार्थी एखाद्या दूरस्थ शिकवणी केंद्रात सहभागी होतील. अध्ययनात कोणतेही विघ्न येणार नाही. लाभ येणाऱ्या काळात होईल.

कुंभ: कौटुंबिक जीवनात सुख-शांतता नांदेल. एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळेल. बहिणीच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील. मंगल कार्याचे आयोजन होईल. राजकारणात यश प्राप्त होईल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन वाहनाचे सौख्य लाभेल. घर सजावटीसाठी पैसा खर्च कराल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. व्यापारानिमित्त प्रवास करू शकता. हे प्रवास लाभदायी होतील. थकबाकी मिळवून देण्यात मदतरूप होऊ शकेल अशा एखाद्या खास व्यक्तीची भेट होईल. त्या व्यक्तीचा सहवास खूप मोठा लाभ मिळवून देईल. पैतृक संपत्तीतून धनलाभ संभवतो.

मीन: विवाहेच्छुकांना मनपसंत जोडीदार मिळेल. वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. रोजची प्राप्ती उत्तम होईल. खर्च जास्त होतील. थोडा धन संचय कराल. भविष्यात कोणतीही आर्थिक समस्या जाणवणार नाही. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी काळ फायद्याचा आहे. पदोन्नती संभवते. विद्यार्थ्यांसाठी काळ मिश्र फलदायी आहे. कौटुंबिक कलहाचा विपरीत परिणाम अभ्यासावर होऊ शकतो. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी मेहनत वाढवावी लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे. ज्या व्यक्ती आयात-निर्यात व्यवसायाशी संबंधित आहेत, त्यांना चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. व्यवसायाची भरभराट होईल. प्राप्तीत वाढ होईल.