साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना अत्यंत चांगला काळ, सकारात्मक अनुकूलता; शुभ चांगलेच होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 13:53 IST2025-03-16T13:42:55+5:302025-03-16T13:53:41+5:30

Weekly Horoscope: १६ मार्च २०२५ ते २२ मार्च २०२५ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या सप्ताहात १८ मार्च रोजी हर्षल मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करीत आहे. तेथे त्याची युती गुरूशी होईल. मंगळ मिथुन राशीत, केतु कन्या राशीत, प्लूटो मकर राशीत, तर शनि कुंभ राशीत आहेत. रवी, बुध, शुक्र, राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.

चंद्राचे भ्रमण कन्या, तूळ, वृश्चिक आणि धनू राशीतून राहील. रविवारी संत तुकाराम महाराज बीज आहे. सोमवारी संकष्टी चतुर्थी आहे. गुरुवारी नाथषष्ठी आहे. सूर्याचा मीन राशीत झालेला प्रवेश अनेकार्थाने महत्त्वाचा ठरणारा असून, विविध राजयोग, शुभ योग जुळून येत आहेत.

एकंदरीत ग्रहस्थिती पाहता कोणत्या राशींना आगामी आठवड्याचा काळ चांगला, सकारात्मक, अनुकूल ठरू शकेल? ते जाणून घेऊया...

मेष: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कौशल्यतेचा व क्षमतेचा चांगला लाभ मिळेल. आठवड्याच्या सुरवातीस खर्चात थोडी वाढ होत असल्याचे दिसू शकते. परंतु त्याने घाबरून जाण्याची गरज नाही. हळूहळू परिस्थितीत बदल होऊन नवीन कामे करू शकाल. कौटुंबिक वातावरण अनुकूल असेल. कुटुंबियांच्या सहकार्याने व्यापारात चांगला फायदा होऊ शकतो. स्वतःवर विश्वास ठेवलात तर आत्मविश्वास सुद्धा उंचावेल. त्याच्या जोडीने आव्हानांना सामोरे जाऊन उन्नती करू शकाल. ऊर्जेत वाढ होईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृषभ: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन तणावमुक्त होईल. सासुरवाडीकडील एखाद्या सोहळ्यास हजेरी लावण्यास जाऊ शकता. नोकरीत आपली पदोन्नती संभवते. पगारवाढ झाल्याने अत्यंत खुश व्हाल. मन हर्षित होईल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा सामान्य फलदायी आहे. त्यांनी आठवड्याच्या सुरवातीस कोणतेही मोठे काम हाती घेऊ नये. कारण त्यात समस्या निर्माण होण्याची संभावना आहे. त्यांच्यासाठी आठवड्याचे मधले दिवस अनुकूल आहेत. नशिबाच्या जोरावर ते आपली कामे पूर्ण करू शकतील. प्राप्तीत वाढ होईल. तसेच प्राप्तीचे एखादे चांगले स्रोत मिळू शकते.

मिथुन: हा आठवडा चांगला आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा अत्यंत चांगला आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आठवड्याच्या सुरवातीस कुटुंबावर पूर्ण लक्ष देऊन कामात समतोल साधण्याचा प्रयत्न कराल. त्यात बहुतांश वेळ खर्च झाला तरी समाधान लाभेल. नोकरी करणाऱ्यांना कामात चांगले परिणाम मिळतील. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांच्या व्यापारात जलद गतीने वाढ होईल. एखादी संपत्ती खरेदी करण्याची संधी मिळेल. वायफळ खर्च होत आहेत त्यावर नियंत्रण ठेवावे. अन्यथा आर्थिक स्थितीवर त्याचा भार वाढू शकतो. विद्यार्थ्यांना अध्ययनात चांगले परिणाम मिळतील.

कर्क: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. वैवाहिक जीवन काही आव्हानांसह पुढे जाईल. वैवाहिक जोडीदाराशी कोणताही वाद घालू नये. अन्यथा नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. मेहनतीचे फळ मिळेल. व्यापाऱ्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कराशी संबंधित समस्या भेडसावू शकतात. आठवड्याच्या सुरवातीस खर्चात जलद गतीने वाढ होईल. परंतु प्राप्ती चांगली झाल्याने जास्त चिंता करावी लागणार नाही. आठवड्याचे मधले दिवस अपेक्षेनुसार चांगले जातील. मनोबल वाढेल. खुश व्हाल व इतरांना खुश करण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील.

सिंह: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. नात्यात सामंजस्य वाढेल. त्यामुळे नाते अधिक दृढ होईल. वैवाहिक जीवन सुखद होईल. नात्यातील प्रेम वृद्धिंगत होईल. प्रेमीजनांना सुखद बातमी मिळेल. नोकरी करणाऱ्यांच्या कामात प्रगती होईल. व्यापारी त्यांच्या व्यवसायात यशस्वी होतील. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात कामाशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अत्यंत चांगला आहे. त्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याच्या सुरवातीस काही मानसिक चिंता असतील ज्या आठवड्याच्या मध्यापर्यंत दूर होऊ शकतील. नशिबाची साथ मिळेल.

कन्या: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. असे असले तरी स्फुर्तीमुळे कामात यशस्वी होऊ शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. नात्यात अत्यंत क्रियाशील राहून जोडीदारास खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या इमानदारीसाठी ओळखले जातील. व्यापाऱ्यांना दूरवरच्या ठिकाणाशी किंवा राज्याशी संबंधित काम करण्याचा लाभ होईल. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात काही अडथळे येऊ शकतात. परंतु त्यांना त्यांच्या तीव्र बुद्धिमत्तेचा अभ्यासात लाभ होईल.

तूळ: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. प्रेमीजनांना नात्यातील ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. ह्या आठवड्यात प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळेल. वरिष्ठ त्यांच्यावर खुश होतील. त्यांची कामगिरी उठून दिसेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. मात्र, कायद्याच्या कचाट्यात सापडणार नाही ह्याची काळजी त्यांनी घ्यावी. शासनाविरुद्ध कोणतेही काम करू नये. विद्यार्थी अभ्यास जोमाने करून चांगले परिणाम मिळवू शकतील. मानसिकदृष्ट्या खुश व मजबूत असल्याने प्रत्येक काम मन लावून यशस्वीपणे कराल.

वृश्चिक: हा आठवडा उत्तम आहे. प्रेमीजनांचे जीवन सुखद होईल. प्रेमिकेशी भरपूर वार्तालाप केल्याने ते आनंदित होतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेमाने ओथंबून जाईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामावरील निष्ठेचा लाभ मिळेल. व्यापारवृद्धीसाठी व्यापारी काही नवीन योजना घेऊन येऊ शकतात. आठवड्याच्या सुरवातीस प्राप्तीत वाढ होईल. मात्र, आठवड्याच्या मध्यास ती कमी होऊन खर्चात वाढ होईल. आठवडा अखेरीस मात्र सर्वकाही सुरळीत होईल. मानसिकदृष्ट्या मजबूत व्हाल. परिस्थितीचे आकलन करून काम करण्यास प्राधान्य द्याल. चांगला फायदा होईल. विद्यार्थ्यांना अध्ययनात काही अडथळे येण्याची संभावना असल्याने त्यांना सामोरे जाण्यास तयार राहावे लागेल. जोमाने अभ्यास केल्यास ते चांगले परिणाम मिळवू शकतील.

धनु: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी मात्र आठवडा काहीसा प्रतिकूल असू शकतो. त्यांच्या संबंधात दुरावा येण्याची संभावना असल्याने दुरावा निर्माण होणार नाही ह्याची काळजी त्यांनी घ्यावी. विवाहित व्यक्ती आठवड्याच्या सुरवातीस वैवाहिक जीवन सुखद करण्याचा प्रयत्न करतील. जोडीदारासमोर मन मोकळे करतील. तसेच त्यांना एखादी भेटवस्तू देऊन खुश करतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा सामान्य आहे. एखादी घटना अचानकपणे घडल्याने कामाचा आनंद घेऊ शकाल. व्यापाऱ्यांच्या हाती एखादे मोठे काम आल्याने त्यांचा व्यापार जलद गतीने प्रगती करेल, जो लाभदायी ठरेल. आठवड्याचे मधले दिवस विशेष अनुकूल नसल्याने कोणत्याही प्रकारे मोठी आर्थिक गुंतवणूक करू नये. तसेच कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नये. आठवड्याच्या अखेरीस आपणास नशिबाची साथ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. ते मन लावून अध्ययन करतील. त्यांची मेहनत फलद्रुप होईल.

मकर: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा चढ - उतारांचा आहे. प्रेमिकेचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल. प्रत्येक वेळी तीनेच आपले म्हणणे ऐकावे असा आग्रह धरू नये. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. कुटुंबातील लहानग्यांचे प्रेम मिळेल. नोकरी करणाऱ्यांना कामात चांगले परिणाम मिळतील. मेहनत लोकांच्या नजरेत भरेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. त्यांच्या कौशल्याचा त्यांना फायदा होईल. खर्चात वाढ होईल. विद्यार्थ्यांना अध्ययनात प्रगती साधण्यासाठी अभ्यास जास्त जोमाने करावा लागेल.

कुंभ: हा आठवडा चांगला आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. नात्यातील प्रेम वृद्धिंगत होईल. विवाहितांना सुखी वैवाहिक जीवनासाठी वयोवृद्धांचे आशीर्वाद मिळाल्याने त्यांच्या जीवनातील समस्या दूर होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामे दृढपणे करतील. ते भरपूर मेहनत करतील. व्यापाऱ्यांसाठी आठवडा उन्नतीदायक आहे. त्यांच्या प्राप्तीत वाढ झाल्याने ते व्यापाराच्या बाबतीत आशावादी होतील. ते योग्य निर्णय घेतील. त्यांनी उचललेल्या पाऊलांची प्रशंसा होईल. नशिबाची साथ मिळाल्याने कामात यश प्राप्ती होईल. विद्यार्थ्यांना अध्ययनात सुखद परिणाम मिळतील. खर्चात कपात होईल.

मीन: ह्या आठवड्यात चांगले परिणाम मिळतील. विवाहित व्यक्तींचे वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराच्या सहकार्याने ते त्यांच्यावरील सर्व जवाबदाऱ्या पूर्ण करू शकतील. कौटुंबिक जीवनात शांतता नांदेल. कामात कुटुंबीय मदत करतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. तेव्हा काळजी घ्यावी. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अत्यंत चांगला आहे. त्यांच्या योजना यशस्वी झाल्याने त्यांना चांगला लाभ होईल. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या अनुकूल आहे. नशीब प्रबळ असल्यामुळे कामात यश प्राप्ती होऊ शकेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या तीव्र बुद्धिमत्तेचा लाभ मिळेल. आठवड्याच्या अखेरीस आपला मानसिक ताण कमी होऊन पूर्ण स्फुर्तीने सर्व कामे करू लागाल.