साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 14:15 IST2025-09-14T13:55:07+5:302025-09-14T14:15:51+5:30

Weekly Horoscope Pitru Paksha 2025: १४ सप्टेंबर २०२५ ते २० सप्टेंबर २०२५ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या सप्ताहात शुक्र, बुध आणि रवी राशीपालट करत आहेत. ग्रहस्थिती अशी - हर्षल वृषभ राशीत आहे. गुरू मिथुन राशीत आहे. रविवारी शुक्र कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करीत आहे. तेथे त्याची युती केतुशी होईल. बुध सिंह राशीत असून, सोमवारी तो कन्या राशीत प्रवेश करेल. रवि सिंह राशीत असून, मंगळवारी तो कन्या राशीत जाईल. मंगळ तूळ राशीत, तर प्लूटो मकर राशीत आहे. राहु कुंभ राशीत आहे. शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.

Pitru Paksha 2025 Weekly Horoscope: चंद्राचे भ्रमण वृषभ, मिथुन, कर्क आणि सिंह राशींमधून राहील. रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद कृष्ण अष्टमी (दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री ३:०७ पर्यंत) आहे. पितृ पंधरवड्यातील अष्टमी तिथीचे श्राद्ध, तसेच मध्याष्टमी श्राद्ध आहे. सोमवारी अविधवा नवमी आहे. पितृपक्षातील इंदिरा एकादशी बुधवार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी आहे.

१८ सप्टेंबर २०२५ रोजी संन्यासिजनांचा महालय आहे. शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी पितृपक्षातील प्रदोष आणि याच दिवशी मासिक शिवरात्रि आहे. शनिवारी उत्तर रात्रौ सर्वपित्री अमावास्या प्रारंभ होत आहे. पितृ पंधरवड्यातील या आठवड्यातील ग्रहमान पाहता कोणत्या राशींसाठी आगामी सप्ताह कसा असू शकेल? जाणून घेऊया...

मेष: हा आठवडा चांगला आहे. ह्या आठवड्यात आपणास पैशांची चिंता करण्याची गरज नसली तरी वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. दिखाऊपणा करण्यात अत्यधिक पैसा खर्च करण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना भरपूर मेहनत केल्यासच चांगली यश प्राप्ती होऊ शकेल. ते एखाद्या नवीन कामात प्रगती करू शकतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामात घाई करतील, जी त्यांच्यासाठी समस्या निर्माण करण्याची संभावना आहे. विद्यार्थी अभ्यास ठीक करतील. ह्या दरम्यान ते इतर प्रवृत्तीत सहभागी होणार नाहीत. अध्ययनास प्राधान्य देतील. वाहन सावध राहून चालवावे लागेल. ह्या आठवड्यात कोणालाही वचन देऊ नका.

वृषभ: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. हा आठवडा आर्थिक बाबतीत खुश करणारा आहे. कर्ज घेण्यासाठी अर्ज केला तर ते सहजपणे मिळू शकेल. एखाद्यास वचन दिले असल्यास ते वेळेवर पूर्ण करू शकाल. आर्थिक गुंतवणूक करण्याच्या बाबतीत सावध राहावे लागेल. व्यापारात मेहनत करून अपेक्षित परिणाम मिळण्यात अडचणी येतील. कोणत्याही वादापासून दूर राहावे लागेल, अन्यथा त्याचा परिणाम कारकिर्दीवर होऊन कारकिर्दीत समस्या निर्माण होतील. विद्यार्थ्यांचे मन विचलित होईल. इतर प्रवृत्तीत ते जास्त वेळ घालवतील, ज्यामुळे अभ्यासासाठी त्यांना वेळ कमी मिळेल. कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नये.

मिथुन: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. आर्थिक बाबींसाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. चुकीच्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक केल्याने संकटात सापडू शकता. मोठे नुकसान होऊ शकते. कारकीर्द उसळी घेत असल्याचे दिसून येईल. एखादी नवीन नोकरी लागू शकते. व्यापारात एखादा नवीन प्रकल्प हाती लागू शकतो. असे असले तरी सभोवतालच्या लोकांपासून सावध राहावे लागेल. विद्यार्थी इतर प्रवृत्तीत गुंतल्याने अभ्यासास कमी वेळ देतील. परंतु त्यांनी जर वेळेचा सदुपयोग केला तर एखाद्या चांगल्या नोकरीसाठी यश प्राप्त करू शकतील.

कर्क: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. ह्या आठवड्यात बुडालेले पैसे परत मिळण्याची संभावना असल्याने आर्थिक बाबींची काळजी करावी लागणार नाही. एखाद्या योजनेत आर्थिक गुंतवणूक केलीत तर ती लाभदायी होईल. दीर्घ काळासाठी एखादी प्रॉपर्टी खरेदी केलीत तर हितावह होईल. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करावा लागेल, जे हिताचे होईल. काही लोकांचे सहकार्य मिळेल. ह्या आठवड्यात एखादा पुरस्कार मिळण्याची संभावना आहे. सध्याची नोकरी चालू ठेवणे आपल्या हिताचे होईल. कामगिरी वरिष्ठांच्या पसंतीस उतरेल. विद्यार्थी एखाद्या तणावामुळे त्रस्त होतील. त्यांच्या अध्ययनात समस्या येत राहिल्याने एखाद्या नोकरीसाठी तयारी करण्यात त्यांचा गोंधळ उडेल. कौटुंबिक समस्यांच्या बाबतीत सावध राहावे लागेल.

सिंह: हा आठवडा समस्याग्रस्त आहे. ह्या आठवड्यात आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करावा लागेल. हे करताना अत्याधिक पैसा खर्च करू नये. पैशाबाबतीत कोणाशीही वचनबद्ध होऊ नये. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांशी दगा-फटका होण्याची संभावना असल्याने त्यांना सावध राहावे लागेल. त्यांची एखादी योजना स्थगित होऊ शकते. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना चांगला लाभ होईल. त्यांना काही प्रवास करावे लागू शकतात. त्यांचे कनिष्ठ कामात मदत करतील. विद्यार्थ्यांना मित्रांच्या सहवासात इतर प्रवृत्ती करण्याचे सोडून आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. असे केल्यानेच त्यांना इच्छित परिणाम मिळू शकतील. ते आपले ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करतील. ह्या आठवड्यात कामास प्राधान्य दिल्याने कौटुंबिक समस्या वाढण्याची संभावना आहे.

कन्या: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात अनपेक्षित खर्च करावे लागल्याने काहीसे त्रासून जाल. एखादी आर्थिक गुंतवणूक करावयाची असल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे हितावह ठरेल. कोणत्याही कामाने त्रासून जाण्याची गरज नाही. कारकिर्दीच्या दृष्टीने आठवडा मिश्र फलदायी आहे. चांगल्या यश प्राप्तीसाठी जास्त मेहनत करावी लागेल. एखादी नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते. एखादा नवीन प्रकल्प मिळू शकतो. विद्यार्थी अध्ययनात येणाऱ्या समस्या वरिष्ठ व अध्यापकांशी चर्चा करून सहजपणे सोडवून ध्येय गाठू शकतील. ह्या आठवड्यात दिनचर्येवर लक्ष ठेवावे लागेल. सकाळी चालायला जाण्याकडे व योगासन इत्यादी करण्याकडे लक्ष द्यावे लागेल.

तूळ: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. ह्या आठवड्यात आर्थिक स्थिती मजबूत असल्याने जास्त टेन्शन घ्यावे लागणार नाही. सढळहस्ते खर्च करू शकाल. ह्या दरम्यान एखादी प्रॉपर्टी घेऊन त्यात सुधारणा करू शकता. एखाद्याकडून पैसे घेतले असल्यास त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न कराल. व्यापारी एखाद्या नवीन योजनेवर काम करू शकतात. हे करून ते खुश होतील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कामामुळे त्रासून जातील. त्यामुळे ते नोकरी बदलण्याचा विचार करू शकतील. परंतु त्यांनी सध्याची नोकरी बदलू नये, अन्यथा पश्चातापाची वेळ येईल. विद्यार्थ्यांना मेहनतीवर विश्वास ठेवावा लागेल. ते ह्या दरम्यान नोकरीशी संबंधित एखादा अभ्यासक्रम करू शकतात.

वृश्चिक: हा आठवडा काही टेन्शन घेऊन येत आहे. मनोरंजन करण्याच्या साधनांवर पैसे खर्च करू शकता. वाढीव खर्चांवर नियंत्रण ठेवून भविष्याची तरतूद करून ठेवावी लागेल. ह्या आठवड्यात व्यापारात कोणतीही मोठी जोखीम घेऊ नये. एखादा सहकारी विरुद्ध एखादे षड्यंत्र रचण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांनी अंतर्गत राजकारणापासून दूर राहावे. अन्यथा त्यांना समस्यांना सामोरे जावे लागेल. वरिष्ठांशी नाते दृढ करावे लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यशस्वी होण्यासाठी इतर प्रवृतींपासून दूर राहावे लागेल. अभ्यासास जास्तीत जास्त वेळ द्यावा. एखादे नवीन संशोधन करण्याची योजना आखू शकता.

धनु: ह्या आठवड्यात विचारपूर्वक कामे करावी लागतील. ह्या आठवड्यात खर्चांमुळे त्रासून जाल. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ नये. एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्यापूर्वी कुटुंबातील वयस्करांचा सल्ला जरूर घ्यावा. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जुन्या योजना उत्तम असतील. नोकरीत पदोन्नती झाल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करावी लागू शकते. मन प्रसन्न होईल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांनी निष्कारण ताण घेऊ नये. अशा वेळी त्यांनी बाहेर फिरण्या ऐवजी अभ्यासासाठी वेळ काढावा, अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.

मकर: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपण जर पैशांचा सदुपयोग केलात तर ते हितावह होईल. स्वतःसाठी काही नवीन कपडे, मोबाईल, दागिने इत्यादींची खरेदी करू शकता. ह्या व्यतिरिक्त कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष द्याल. असे असले तरी काही पैसा गुंतवणूक करण्यासाठी ठेवावा लागेल. ह्या आठवड्यात व्यवसायात चांगला लाभ होईल. परंतु इतरांवर विश्वास ठेवल्यास नुकसान होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना ह्या आठवड्यात कामावर लक्ष द्यावे लागेल. वरिष्ठ जबाबदारीत वाढ करू शकतात. विद्यार्थी मेहनत करण्यात मागे राहणार नाहीत. एखाद्या स्पर्धेत जर ते सहभागी झाले तर त्यात ते यशस्वी होऊ शकतील. ते मित्रांपासून काही काळासाठी दूर राहतील.

कुंभ: हा आठवडा खुश करणारा आहे. ह्या आठवड्यात कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आजारपणावर पैसे खर्च करावे लागू शकतात. ह्या व्यतिरिक्त एखाद्याच्या विवाहासाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. लॉटरी इत्यादीत गुंतवणूक केल्याने मोठा लाभ होईल. ह्या आठवड्यात कारकिर्दीत सावध राहावे लागेल. कोणावर विसंबून कामे करू नये. ह्या आठवड्यात एखाद्या ठिकाणाहून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. व्यापारात नवीन काही करण्याचा प्रयत्न कराल. ह्या आठवड्यात विद्यार्थी मित्रांसह हिंडण्या-फिरण्यात व इतर प्रवृत्ती करण्यात व्यस्त राहिल्याने अभ्यासाकडे त्यांचे लक्ष लागणार नाही. त्याचा त्यांना त्रास होईल. त्यामुळे त्यांची कामे खोळंबतील.

मीन: हा आठवडा जोशपूर्ण आहे. ह्या आठवड्यात काही अनपेक्षित खर्च करावे लागल्याने आर्थिक चिंता सतावतील. एखाद्या जुन्या योजनेतून फायदा झाला तरी खर्च जास्तच होईल. तेव्हा सावध राहावे. व्यापाऱ्यांनी ह्या आठवड्यात भागीदारी व्यवसायाची सुरवात करू नये. भागीदारामुळे नुकसान होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांनी गोंधळात पडू नये. कामे दुसऱ्यावर विसंबून करू नये. ह्या आठवड्यात विद्यार्थी आळसावलेले असतील. कामे उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे नोकरीसाठी तयारी करण्यात त्यांना अडचणी येतील.