साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभच लाभ, व्यापारात मोठी डील; धनलाभ योग, रामलला शुभ करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 11:25 AM2024-04-14T11:25:05+5:302024-04-14T11:36:22+5:30

Weekly Horoscope: १४ एप्रिल ते २० एप्रिलचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी रवी. गुरू आणि हर्षल मेषेत, केतू कन्येत, प्लूटो मकरेत, मंगळ आणि शनी कुंभेत, तर बुध, शुक्र, राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीतून राहील.

१६ रोजी दुर्गाष्टमी आहे. १७ रोजी रामनवमी आहे. १९ रोजी कामदा एकादशी आहे. मराठी नववर्ष सुरू झाले असून, या आठवड्यात येणारी श्रीरामनवमी यंदा विशेष असणार आहे. अयोध्येत श्रीराम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर येणारी ही पहिली रामनवमी असून, प्रचंड प्रमाणात साजरी केली जाणार आहे.

एकूणच आठवडा आणि ग्रहस्थिती पाहता, कोणत्या राशीवर ग्रहांचा कसा प्रभाव असेल? आर्थिक आघाडी, कुटुंब, करिअर, व्यवसाय, शिक्षण, प्रेम संबंध, वैवाहिक जीवन अशा आघाड्यांवर रामनवमीचा आठवडा कसा जाऊ शकेल? जाणून घ्या...

मेष: कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याची संधी मिळेल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. घरात मंगल कार्याचे आयोजन होईल. नोकरी करणाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यापारात यश प्राप्ती होईल. धनलाभ संभवतो. खर्चात वाढ होईल, परंतु प्राप्ती वाढेल. एखादे नवीन वाहन खरेदी करू शकता. विद्यार्थी मन लावून अध्ययन करतील. बाहेर जाण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. कोणालाही उसने पैसे देऊ नका.

वृषभ: हा आठवडा चांगला आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद राहतील. मातेचे सानिध्य व सहकार्य लाभेल. प्रेमिकेशी नवीन नाते जोडू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यापारात यश प्राप्ती होईल. सरकारी क्षेत्राकडून लाभ होण्याची संभावना आहे. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. कामगिरी दाखविण्याची संधी मिळेल. घरात पूजा-पाठाचे आयोजन होईल. आयात-निर्यातीशी संबंधित कार्यात गुंतलेले आहेत, त्यांना चांगली बातमी मिळेल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्याने खूप फायदा होईल.

मिथुन: हा आठवडा आर्थिक दृष्ट्या उत्तम आहे. नवीन कंत्राट मिळाल्याने व्यवसायास पुढे घऊन जाण्यात यशस्वी व्हाल. सर्व प्रकारचे खर्च करण्याची तयारी असेल. घराची दुरुस्ती व सजावटीसाठी भरपूर पैसा खर्च कराल. मंगल कार्याचे आयोजन होईल. सर्वजण एकत्रितपणे खरेदी करण्यासाठी जाल. नोकरी करणाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. वरिष्ठांशी बोलताना तोलून मापून बोलणे हितावह होईल. सामाजिक कार्य करण्याची संधी मिळेल. एखाद्या सामाजिक संस्थेत सहभागी होऊ शकता. वैवाहिक जीवनात सुख-शांतता नांदेल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात कुटुंबियांसह सहभागी व्हाल.

कर्क: विवाहितांच्या वैवाहिक जीवनात चढ-उतार होताना दिसतील. अहंकारामुळे असे काही बोलाल की, त्याने जोडीदार दुखावला जाऊ शकतो. कुटुंबियांसह एखादी तीर्थयात्रा करण्याचे आयोजन कराल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रत्येक दिवसाच्या प्राप्तीत वाढ होईल. एखादी आर्थिक गुंतवणूक करू शकता. व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभ प्राप्ती होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या नोकरीत खुश असल्याचे दिसून येईल. स्पर्धेत यश संभवते. घरात पूजा-पाठाचे आयोजन होईल. मातेचे सानिध्य लाभेल. त्यांचे प्रेम मिळेल. भावनेच्या आहारी न जाता विचारपूर्वक कामे केल्यास फायदा होईल.

सिंह: स्वतःवर विश्वास ठेवायला शिकावे लागेल. असे केल्यानेच आपणास चांगले परिणाम मिळू शकतील. काही महत्वाच्या कामात आपणास भागीदाराची साथ मिळाल्याने आत्मविश्वास उंचावेल. आर्थिक बाबतीत चढ-उतार आले तरी चांगली प्राप्ती होऊ शकते. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या व्यवसायास वेगळ्या दिशेत प्रगती करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळविण्यात यश प्राप्त होऊ शकते. विद्यार्थ्यांनी एखादे ध्येय समोर ठेवून अभ्यास केल्यास त्यांना चांगले परिणाम मिळू शकतील.

कन्या: वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. काही सुखद क्षण घालवू शकाल. मुलांचे सहकार्य मिळेल. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील. पैतृक संपत्तीतून धनलाभ संभवतो. आर्थिक स्थिती ठीक राहील. खर्चात वाढ होईल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापारात यशस्वी व्हाल. नवीन संधी मिळेल. स्पर्धेत यश प्राप्त होईल. विवाहेच्छुकांच्या विवाहाची बोलणी संभवतात. कुटुंबीय एकत्रितपणे एखाद्या तीर्थयात्रेस जाण्याचे आयोजन करतील.

तूळ: नाते दृढ होईल. कुटुंबियांना आपल्या प्रेमिकेची ओळख करून देऊ शकाल. वैवाहिक जीवनात सुख-शांतता नांदेल. जोडीदाराच्या सहवासात आनंदाचे काही क्षण व्यतीत कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती नोकरी व्यतिरिक्त एखादा जोड व्यवसाय करू शकतील. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. व्यापारी व्यवसाय पुढे नेण्याचा जो प्रयत्न करत आहेत, त्यात यशस्वी होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. थकबाकी मिळेल. राजकारणात यश प्राप्त होईल. घरात होम-हवन, पूजा-पाठ, भजन, कीर्तन इत्यादींचे आयोजन होईल. सर्वजण एकत्रितपणे काम करताना दिसतील.

वृश्चिक: प्रेमिकेस मनातील विचार सांगू शकाल. एखादी भेटवस्तू देऊ शकता. नवीन वाहनाचे सौख्य प्राप्त होईल. पैतृक संपत्तीतून धनलाभ संभवतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. खर्चात वाढ झाली तरी प्राप्तीत वृद्धी होईल. सरकारी क्षेत्राकडून लाभ होईल. नोकरीत प्रगती होईल. व्यापारात नवीन कंत्राट मिळतील. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल. घरात मंगल कार्याचे आयोजन होईल.

धनु: कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. सुख-दुःख एकमेकांना सांगाल. भविष्यात काही त्रास होऊ नये म्हणून धनसंचय कसा करावा हे आपण वडिलधाऱ्यांकडून शिकून घ्याल. वैवाहिक जीवनात चढ-उतार येतील. कामाच्या ठिकाणी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. धनलाभ संभवतो. एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकता. व्यापाऱ्यांना सावध राहावे लागेल. नोकरी करणाऱ्यांना मेहनतीमुळे व इमानदारीमुळे यश प्राप्त होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे.

मकर: विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा आनंद घेतील. जोडीदारासह एखादे नवीन कार्य सुरु करू शकतील. प्राप्तीची नवीन संधी मिळेल. लाभ मिळवून आर्थिक स्थिती मजबूत करू शकाल. घरगुती कार्यात भरपूर पैसा खर्च कराल. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकाच्या विवाहात सहभागी व्हाल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. परदेशातून शिक्षणाची संधी मिळेल. व्यापारास पुढे घेऊन जाण्यात आपण यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी आपणास देण्यात आलेली सर्व कामे आपण मन लावून कराल. वरिष्ठांचे व कनिष्ठांचे सहकार्य मिळेल. वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतल्यास आपली सर्व कामे पूर्ण होतील.

कुंभ: प्रेम संबंध दृढ होतील. प्रेमिकेची ओळख आपल्या कुटुंबियांना करून देऊ शकाल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात आनंद अनुभवतील. जोडीदारासह कुटुंबाच्या कल्याणासाठी कार्य कराल. आर्थिक स्थिती ठीक राहील. पूर्वी जी गुंतवणूक केली होती त्याचा पूर्ण लाभ मिळेल. मित्र व नातेवाईक आर्थिक स्थिती मजबूत करण्यास मदत करतील. जे भागीदारीत व्यवसाय करत आहेत, त्यांना खूप मोठा लाभ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. उच्च शिक्षणासाठी आठवडा प्रतिकूल आहे. अभ्यासात लक्ष लागणार नाही. वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन लाभेल. विवाहेच्छुकांच्या विवाहाची बोलणी संभवतात.

मीन: विवाहित व्यक्ती आनंदात राहतील. कुटुंबियांसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत आखतील. प्रेम विवाहाची संभावना आहे. विवाहेच्छुकांसाठी त्यांच्या पसंतीस उतरेल असे चांगले स्थळ येईल. आठवडा खर्चिक आहे. रोजची प्राप्ती चांगली झाल्याने त्याचा काही त्रास होणार नाही. व्यापाऱ्यांना चांगला लाभ प्राप्त होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल. वडीलधाऱ्यांचा वरदहस्त राहील. घर, दुकान, प्लॉट खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांना यश प्राप्त होईल. कौटुंबिक समस्या आपले लक्ष वेधून घेतील.