साप्ताहिक राशीभविष्य: प्रलंबित कामे होतील, पैसे वाचवू शकाल; दिनचर्येत बदल करा, लाभ मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 07:07 IST2024-01-08T07:07:07+5:302024-01-08T07:07:07+5:30
Weekly Horoscope: ०७ जानेवारी ते १३ जानेवारी २०२४ चा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

मार्गशीर्ष महिन्याचा शेवट आणि पौष महिन्याची सुरुवात असलेल्या या सप्ताहात बुध धनू राशीत प्रवेश करत आहे. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी गुरू आणि हर्षल मेषेत, केतु कन्येत, शुक्र वृश्चिक राशीत, रवी, मंगळ आणि बुध धनु राशीत, प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.
चंद्राचे भ्रमण तूळ, वृश्चिक, धनू, मकर आणि कुंभ राशीतून राहील. सोमवारी स्वामी स्वरुपानंद जयंती, मंगळवारी प्रदोष, गुरुवारी दर्श वेळा अमावास्या आहे. शुक्रवारी स्वामी विवेकानंद जयंती, शनिवारी श्रीनृसिंह सरस्वती जयंती आहे.
एकंदरीत आगामी काळ आणि ग्रहस्थिती पाहता कोणत्या राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकेल. कोणत्या राशींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल, ते जाणून घेऊया...
मेष: मित्रांच्या सहवासात काही वेळ घालवून सुख-दुःख वाटत असल्याचे दिसून येईल. मित्रांसह व कुटुंबियांसह धार्मिक यात्रा करण्याचा एखादा बेत आखाल, ज्यामुळे सर्वजण अत्यंत खुश होताना दिसतील. मनास शांती लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल. मंगल कार्याचे आयोजन होईल. नातेवाईकांची ये-जा चालू राहील. आपण घर सजावटीत मग्न राहाल. कुटुंबातील विसंवाद दूर होतील. आवडीनुसार काम करत असल्याचे दिसून येईल. बरेच काही शिकाल, जे भविष्यात आपल्या खूप कामी येतील.
वृषभ: वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. प्रेमीजन प्रेमिकेसह प्रेमळ क्षण घालवतील. प्राप्तीचे नवीन स्रोत प्राप्त होतील. मोठा लाभ मिळवून आर्थिक स्थिती मजबूत कराल. भविष्यात फायदा होईल. एखादी गुंतवणूक कराल. व्यापारवृद्धी करण्यात यशस्वी व्हाल. मित्र आपणास मदत करतील. विद्यार्थी भरपूर अभ्यास करून चांगले परिणाम मिळवू शकतील. प्रकृतीत सुधारणा होईल. दिनचर्येत बदल कराल, जी हितावह असेल. कुटुंबियांसह खरेदीस जाल. तेथे मौज-मजा करताना दिसतील.
मिथुन: वैवाहिक जीवनात सुख-शांती असल्याचे दिसून येईल. जोडीदार एखादे कार्य सुरु करू शकेल, ज्यात सहकार्य कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती नोकरीतील बढतीमुळे खुश होतील. आत्मविश्वास उंचावेल. व्यापारी व्यापारात काही नवीन योजना अंमलात आणतील. विद्यार्थी एखाद्या स्पर्धेची तयारी करताना दिसतील. त्यात यशस्वी होतील. ऋतू बदलामुळे त्रस्त व्हाल. दिनचर्येत बदल केलात तर ते हितावह होईल.
कर्क: आगामी काळ अत्यंत चांगला आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती नोकरीतील प्रगतीने खुश होतील. कुटूंबियांच्या सहवासात थोडा वेळ घालवाल. मनास शांती मिळेल. व्यापारात चढ-उतार होताना दिसू लागल्याने त्रस्त व्हाल. असे असले तरी वरिष्ठ सदस्य व्यापारात काही पैसा गुंतवतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. कलात्मक व रचनात्मक क्षेत्रात वृद्धी होत असल्याचे दिसून येईल. संततीकडून सुखद बातमी मिळाल्याने मन प्रसन्न होईल. कारकिर्दीच्या बाबतीत युवक खूपच उत्साहित होतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगला रोजगार मिळू शकतो.
सिंह: आगामी काळ आनंदाने भरलेला असू शकेल. विवाहित व्यक्ती जोडीदाराच्या सहकार्याने एखादे नवीन काम करतील. आत्मविश्वास उंचावेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. व्यापार करणाऱ्या व्यक्ती व्यापार वृद्धीसाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येईल. धन प्राप्तीची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत कराल. एखादे घर, दुकान किंवा वास्तू खरेदी करण्याचा बेत ठरवाल. दिनचर्येत योगासन व ध्यान-धारणेस समाविष्ट कराल. आहारावर नियंत्रण ठेवाल. थोडा वेळ मुलांच्या सहवासात घालवाल.
कन्या: आगामी काळ विशेष असणार आहे. वैवाहिक जीवन सुखद असल्याचे दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचे भरपूर सहकार्य मिळेल. व्यापारात काही नवीन योजना प्राप्त होतील, ज्याचा लाभ घेण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवास होतील, जे फायदेशीर ठरतील. विद्यार्थी स्पर्धेची तयारी करत असल्याचे दिसून येईल. विद्यार्थ्यांचे मन विचलित झाल्याने अभ्यासातील लक्ष कमी होईल. मुलांच्या भविष्याबद्धल माता-पिता चिंतीत होतील. घरात पूजा - पाठ, होम - हवन इत्यादींचे आयोजन होईल. सर्व कुटुंबीय सहभागी होतील. स्वतःसाठी व कुटुंबियांसाठी काही खरेदी कराल.
तूळ: नोकरी करणाऱ्या व्यक्ती प्रगतीने अत्यंत खुश झाल्याचे दिसून येईल. शैक्षणिक जीवनात प्रगती बघावयास मिळेल. व्यापार वृद्धीसाठी जो प्रयत्न करत होता, त्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. वडील मंडळींचे आशीर्वाद प्राप्त होतील. वडिलांना मनातील विचार सांगू शकता. आईबरोबर एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. तेथे थोडा वेळ घालविल्याने आपल्या मनास शांती मिळेल. आवडीची कामे करण्यासाठी वेळ द्याल. मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्याल.
वृश्चिक: आगामी कालावधी अत्यंत चांगला आहे. वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण घालवाल. वडील मंडळींच्या आशीर्वादाने एखादे नवीन कार्य सुरु करू शकाल. वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य असेल. कारकिर्दीच्या बाबतीत खूपच उत्साहित असाल. नोकरीत देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थी अभ्यासातील काही विषयातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी गुरुजनांची मदत घेतील. आवडीच्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. व्यापारी स्थगित झालेल्या योजना पुन्हा सुरु करण्यात यशस्वी होतील.
धनु: अत्यंत सुखद काळ ठरू शकेल. शैक्षणिक जीवनात प्रगती होत असल्याचे दिसून येईल. कुटुंबियातील वातावरण सुख-शांती देणारे असेल. मंगल कार्याचे आयोजन होईल. कुटुंबियांसह एखादी धार्मिक यात्रा करण्याचा बेत ठरवाल. वैवाहिक जोडीदाराकडून एखादी भेटवस्तू मिळण्याची संभावना असून त्यामुळे खूपच आनंदित व्हाल. मातेस आपल्या मनातील विचार सांगू शकता. मित्राच्या मदतीने आर्थिक प्राप्तीची संधी मिळेल.
मकर: संमिश्र कालावधी ठरू शकेल. प्रकृतीत चढ-उतार होत असल्याचे जाणवेल. मन त्रस्त होईल. एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे हिताचे होईल. वैवाहिक जीवनात सुख-शांती असल्याचे दिसून येईल. वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण व्यतीत करत असल्याचे दिसेल. वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद पाठीशी राहतील. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल. मित्रांच्या सहकार्याने व्यापारात नवीन नीती स्वीकाराल. अनिच्छेने काही खर्च करावा लागेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. घराच्या सजावटीसाठी काही खरेदी कराल.
कुंभ: आगामी कालावधी अत्यंत चांगला आहे. कौटुंबिक जीवनात व्यस्त असल्याचे दिसून येईल. वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील. एखादे स्वप्न पूर्ण कराल. मन प्रसन्न होईल. नवीन वाहन सौख्य मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मदतीने स्थगित झालेली कामे पूर्ण कराल. नोकरीत उत्तमोत्तम संधी प्राप्त होतील. व्यापारात काही बदल केलेत तर प्रगती होताना दिसेल. दिनचर्येत योगासन व ध्यान-धारणेस समाविष्ट करावे. एखादी गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्याल, ज्याचा फायदा भविष्यात होईल.
मीन: प्राप्तीच्या नवनवीन संधी प्राप्त होतील. ज्याचा फायदा घेऊन आर्थिक स्थिती मजबूत कराल. पैश्यांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. बचतीवर लक्ष द्याल. घर खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होताना दिसून येईल. वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन वैवाहिक जोडीदारास एखादे नवीन कार्य करावयास लावू शकता. विद्यार्थी स्पर्धेची तयारी करत असल्याचे दिसून येईल. गुरुजनांच्या मदतीने आवडते विषय शिकण्याची संधी मिळेल. कौटुंबिक वातावरण शांततामय असेल. पूजा-पाठ, भजन-कीर्तन इत्यादींचे आयोजन होईल. नातेवाईकांची ये-जा राहील. व्यस्ततेतून थोडा वेळ स्वतःसाठी काढाल. आवडीची कामे कराल. मित्रांसह सुख-दुःखाच्या गोष्टी करत असल्याचे दिसून येईल.