पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 10:01 IST2025-08-04T09:45:25+5:302025-08-04T10:01:30+5:30

Weekly Horoscope: तुमच्यासाठी कसा असेल श्रावण नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनापर्यंतचा काळ? जाणून घ्या…

Weekly Horoscope: या काळात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- हर्षल वृषभ राशीत, गुरू आणि शुक्र मिथुन राशीत, रवि आणि बुध कर्क राशीत, केतु सिंह राशीत, मंगळ कन्या राशीत, प्लूटो मकर राशीत, राहु कुंभ राशीत, तर शनी आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.

चंद्राचे भ्रमण वृश्चिक, धनु, मकर आणि कुंभ या राशींमधून राहील. मंगळवारी पुत्रदा एकादशी आहे. बुधवारी प्रदोष आहे. शुक्रवारी नारळी पौर्णिमा, शनिवारी रक्षाबंधन आहे.

या कालावधीत अनेक शुभ योग, राजयोग जुळून येत आहेत. शनि वक्री असून, गुरु-मंगळ ग्रहांशी काही विशेष योगांमुळे अनेक राशींना उत्तम लाभ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: रागाच्या भरात वाहन चालवू नये. प्रेमिकेसाठी जास्त पैसे खर्च करू शकता. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटू शकते. विवाहितांनी थोडे सावध राहावे. हा काळ आर्थिकदृष्ट्या त्रासदायी होऊ शकतो. व्यापाऱ्यांची बुद्धी तीव्र गतीने काम करेल. एखादा मोठा प्रकल्प हाती लागल्याने त्यांना जास्त मेहनत करावी लागू शकते. नोकरी करणाऱ्यांनी नोकरी विषयक कोणताही निर्णय न घेणे हितकारक ठरेल.

वृषभ: व्यापाऱ्यांना जास्त मेहनत करावी लागू शकते. मात्र त्याचे फळ लवकर मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांच्या मनात नोकरी बदलण्याचे विचार येत असल्यास त्यांनी सध्या नोकरीत बदल करू नये. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. जर ते एखाद्या स्पर्धेसाठी तयारी करत असतील तर त्यांना जास्त मेहनत करावी लागू शकते. विद्यार्थ्यांनी मित्रांपासून थोडे दूर राहावे, अन्यथा परीक्षेत यश प्राप्त होण्याची शक्यता मावळू शकते.

मिथुन: व्यापाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. व्यापारास पोषक ठरतील असे काही नवीन संपर्क ते बनवू शकतात. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी संबंध दृढ करावेत. प्रेमीजन प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकतील. विवाहितांना एखादी चांगली बातमी मिळाल्याने घरातील वातावरण आनंददायी होऊ शकते. घराचे सुशोभीकरण व आजारपण ह्यात जास्त पैसा खर्च होऊ शकतो. उच्च शिक्षण किंवा एखादी नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करत असाल तर आपण त्यात यशस्वी होऊ शकता.

कर्क: व्यापारी व्यापार वृद्धीसाठी आर्थिक गुंतवणूक करू शकतात. त्याचा फायदा त्यांना भविष्यात होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती वरिष्ठांना खुश करण्यासाठी जास्त मेहनत करतील. प्रेमीजन प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवून एकमेकांशी जवळीक साधू शकतील. वैवाहिक संबंधात काही कारणाने त्रास होऊ शकतो. त्रास दूर करण्यासाठी जोडीदारास जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करावा. एखादे वाहन खरेदी करण्यासाठी पैसे वापरू शकता. एखादा प्रकल्प किंवा असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी बराचसा पैसा खर्च होऊ शकतो.

सिंह: व्यापाऱ्यांना एखादी मोठी ऑर्डर प्राप्त होऊ शकते. त्यात त्यांना जास्त लाभ प्राप्ती होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्ती काहीसे त्रासलेले असू शकतात. वरिष्ठांशी त्यांचा एखादा वाद होऊ शकतो. अहंकारामुळे प्रेमीजनांच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. तेव्हा त्यांनी नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. विवाहितांनी जोडीदाराशी समन्वय साधावा. एखादी प्रॉपर्टी खरेदी करावयाची असेल तर ती खरेदी करू शकता. भविष्यात त्याचा चांगला लाभ होऊ शकतो. शेअर्स बाजारात कोणतीही आर्थिक गुंतवणूक करू नये. विद्यार्थ्यांनी मित्रांपासून थोडे दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास ते यशस्वी होऊ शकतील.

कन्या: व्यापाऱ्यांना काही कारणाने मानसिक तणावास सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्री काही शिकावयास मिळू शकते. ज्याचा प्रयोग ते वरिष्ठांना प्रसन्न करण्यासाठी करू शकतील. प्रेमीजनांचे संबंध जर बिघडले असतील तर त्यात सुधारणा होऊ शकते. विवाहितांनी संबंध दृढ करण्यासाठी काही जुन्या गोष्टी विसरून जाण्याचा प्रयत्न करावा. वायफळ खर्चांमुळे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आर्थिक बाजू डळमळीत होऊ शकते. विद्यार्थ्यांना एखादा विषय बदलावयाचा असेल तर त्यात विलंब होऊ शकतो. एखादे संशोधन कार्य करत असाल तर जास्त मेहनत करावी लागेल.

तूळ: व्यापाऱ्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरीत बदल करण्यासाठी काळ प्रतिकूल आहे. प्रेमीजन प्रेमिकेशी असलेल्या संबंधांचा विचार करून एखादा मोठा निर्णय घेऊ शकतात. विवाहितांच्या नात्यात एखाद्या गैरसमजामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. शेअर्स बाजारात आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे उचित ठरेल. विद्यार्थ्यांनी इतरत्र लक्ष न घालता जर अभ्यासावर लक्ष केंद्रित केले तर ते त्यांच्या हिताचे होईल.

वृश्चिक: व्यापाऱ्यांना व्यवसायात प्रगती करण्यासाठी मेहनत वाढवावी लागू शकते. त्यातून त्यांना लाभ सुद्धा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या नोकरीत बदल करू नये. ते जेथे कार्यरत आहेत तेथेच त्यांनी सध्या राहावे. आपल्या अहंकारामुळे प्रेमिकेशी असलेल्या संबंधात तणाव येऊ शकतो. वैवाहिक संबंध अधिक दृढ होतील. आपण आपल्या जोडीदाराच्या सहकार्याने एखादे नवीन कार्य सुरु करण्याचा विचार करू शकता. जमीन - जुमल्यात आर्थिक गुंतवणूक केल्याने आपणास लाभ होऊ शकतो. आपणास जर कर्ज घ्यावयाचे असेल तर त्यास हा आठवडा अनुकूल आहे. आपण जर शासकीय नोकरीसाठी तयारी करत असाल तर आपणास जास्त मेहनत केल्यासच यश प्राप्ती होऊ शकते.

धनु: तणावापासून दूर राहण्यासाठी योगासन व ध्यान-धारणेचा आधार घेऊ शकता. काही गैरसमज झाल्यामुळे प्रेमीजनांच्या नात्यात तणाव येऊ शकतो. विवाहितांसाठी काळ प्रेमाने परिपूर्ण असेल. एकमेकांसह बाहेर फिरावयास जाऊन एकांतात वेळ घालवू शकता. व्यापाऱ्यांना सावध राहावे लागेल. घाई गडबडीत कोणतेही पाऊल उचलू नये. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना जर नोकरी बदलावयाची असेल तर त्यासाठी कालावधी अनुकूल आहे. आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. जमीन-जुमल्यात आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर ती थोडे सावध राहून करावी. उच्च शिक्षणासाठी एखाद्या परीक्षेची तयारी करत असाल तर अतिआत्मविश्वासामुळे नुकसान सोसावे लागू शकते.

मकर: या आगामी कालावधीत आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कपड्यांशी संबंधित व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी ह्या काळात थोडे सावध राहावे. एखाद्या चांगल्या बातमीमुळे मन आनंदून जाईल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. मात्र, हाती आलेला पैसा खर्च करण्याकडे कल राहील. नको त्या भानगडीत पडू नका. कायद्याची बंधने पाळा. कुणाला न मागता मदत किंवा सल्ला देऊ नका.

कुंभ: व्यापारी एखादा मोठा प्रकल्प प्राप्त करू शकतील. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी अनुकूल काळ आहे. एखाद्या प्रिय मित्राच्या भेटीस जाऊ शकता. ह्या भेटीने त्यांचे मन अत्यंत प्रसन्न होईल. प्रेमीजनांचे संबंध अधिक दृढ होतील. त्यांच्या नात्यात काही नावीन्य दिसू शकते. विवाहितांसाठी कालावधी अनुकूल असला तरी अहंकारामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. मन त्रासून जाऊ शकते. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास संबंधात सुधारणा होऊ शकेल. शैक्षणिक वस्तूंच्या खरेदीत जास्त पैसा खर्च होऊ शकतो.

मीन: वाहन सावध राहून चालवावे. व्यापाऱ्यांना जास्त सावध राहावे लागेल. व्यापार पुढे नेण्यासाठी मेहनत करावी लागू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी काळ प्रतिकूल असल्याने ते जेथे कार्यरत आहेत तेथेच त्यांनी सध्या राहावे. प्रेमीजनांसाठी कालावधी अनुकूल आहे. वैवाहिक संबंध ठीक राहतील. कोणत्याही प्रकारे गैरसमज झाला असेल तर तो दूर होऊ शकतो. गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करण्याची संभावना आहे. विद्यार्थी जर एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांनी अति आत्मविश्वास न बाळगल्यास ते यशस्वी होऊ शकतील.