शुक्र गोचर २०२५ : नवीन वर्षातील पहिला मालव्य राजयोग; ५ राशींना धनलाभ होण्याची संधी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 15:38 IST2025-01-21T15:33:23+5:302025-01-21T15:38:25+5:30
Shukra Gochar 2025: २०२५ वर्ष सुरु होता होता अनेक ग्रहांचे स्थलांतर, ज्याला गोचर असेही म्हटले जाते, ते झाल्यामुळे ग्रहांचा राशींवर आणि राशींचा मनुष्याच्या व्यक्तिगत जीवनावर परिणाम होत आहे आणि पुढेही होणार आहे. २८ जानेवारी रोजी होणारे शुक्र गोचर (Shukra Gochar 2025) पाच राशींना धन, संपत्ती, प्रसिद्धी, पैसा मिळवून देण्याचे संकेत देत आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

वृषभ :
वृषभ राशीच्या अकराव्या घरात शुक्राचे संक्रमण होणार आहे. कुंडलीतील ११ वे घरइच्छापूर्तीचे स्थान मानले जाते. अशा स्थितीत शुक्राचे हे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. हा प्रवास तुमच्यासाठी खूपच छान आहे असे म्हणता येईल. तुमच्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी मालव्य राजयोग सहकार्य करेल. हा काळ तुमच्यासाठी सर्वार्थाने विशेषतः फलदायी ठरणार आहे. आईच्या माहेरील लोकांशी तुमचे संबंध चांगले होतील. तसेच त्यातून आर्थिक लाभदेखील होईल. हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे, त्यामुळे तुम्ही शत्रूंचे मित्रांमध्ये रूपांतर करू शकता. शुक्राचे हे संक्रमण तुमच्या जीवनात आनंद आणेल. मात्र हा आनंद उपभोगण्यासाठी तुम्ही शारीरिक दृष्ट्या सक्षम असले पाहिजे.
इंग्रजी नवीन वर्ष २०२५ मध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरीस अर्थात २८ जानेवारीला शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. त्यामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. या वर्षातील हा पहिला मालव्य राजयोग असेल. या राजयोगात वृषभ आणि मिथुन राशीसह ५ राशींना अपार संपत्ती, प्रसिद्धी आणि भौतिक सुखाची प्राप्ती होईल. तसेच करिअरमध्येही नवी उंची गाठता येईल.
शुक्र हा ग्रह सौंदर्य, संपत्ती, श्रीमंती, प्रसिद्धी असे भौतिक सुख देणारा ग्रह आहे. त्यामुळे ज्यांचा शुक्र उच्चीचा असतो त्यांना संसार सुख पुरेपूर उपभोगता येते. मीन हे जल तत्वाचे लक्षण आहे आणि चंचलता हा या राशीचा स्वभाव आहे. मीनमध्ये काही गुण आहेत जे शुक्राच्या सारखेच आहेत. त्यामुळे मीन राशीमध्ये शुक्र उच्च स्थानावर जात आहे. शुक्राच्या संक्रमणामुळे निर्माण होणारा मालव्य राजयोग हा पंचमहापुरुष राजयोगांपैकी एक आहे. ज्यामुळे पुढील राशींना त्याचा लाभ होणार आहे.
मिथुन :
मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण दहाव्या घरात होणार आहे. हे संक्रमण तुमच्या करिअरमध्ये तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. वरिष्ठांकडूनही तुमचे कौतुक होईल. एवढेच नाही तर कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले नसतील तर या काळात संबंध सुधारतील. या संक्रमणामुळे तुम्हाला परदेशातून करिअरसाठी चांगल्या संधी मिळू शकतील. परदेश प्रवासाची इच्छापूर्ती होईल. व्यावसायिकांना हा कालावधी चांगला नफा देईल. एवढेच नाही तर, हे संक्रमण तुमच्या करिअरसाठी खूप चांगले ठरणार आहे. ज्याचा भविष्यात उपयोग होईल.
कर्क :
कर्क राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण ९व्या घरात होणार आहे. कुंडलीतील चौथे घर भावना, कौटुंबिक आनंद, आई आणि मातृभूमीशी संबंधित असते. त्यातच ९ व्या घरात होणारे संक्रमण आणि चौथ्या घराचा भाव यांचा संयोग होऊन हे संक्रमण विशेष फलदायी ठरेल. या काळात तुम्हाला मालव्य राजयोगाचा पुरेपूर लाभ झाल्याचे जाणवेल. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यांमध्ये रस वाढेल. तीर्थक्षेत्री जाण्याची संधी मिळेल. तसेच कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जावे लागेल. नशिबाची साथ लाभून,नोकरी व्यवसायात भरभराट होईल. या काळात तुम्हाला तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होताना दिसतील. या काळात वाहन खरेदीचेही योग आहेत.
सिंह :
सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण त्यांच्या ८व्या घरात होणार आहे. या काळात तुम्हाला तुमचे खरे प्रेम मिळेल. तुम्ही विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता. हे संक्रमण तुमच्यासाठी करिअरच्या दृष्टीने प्रगती घडवून आणणार आहे. गुंतवणुकीतून लाभाच्या संधी आहेत. या काळात तुमच्या बोलण्यावर प्रभावित होऊन तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. बढती मिळण्याचा संभव आहे. विवाहित लोकांचे त्यांच्या सासरच्या लोकांशी संबंध सुधारतील. मालमत्तेचे सुखही मिळेल. जोडीदारासोबत तुमची संयुक्त मालमत्ता वाढेल. आळस सोडणे हितावह ठरेल.
धनु :
धनु राशीच्या लोकांसाठी चौथ्या भावात शुक्राचे संक्रमण होणार आहे. कुंडलीतील अकरावे घर इच्छा, नफा आणि सामाजिक जीवन दर्शवते. या दोन्हीच्या संयोगाने शुक्राचे मीन राशीत प्रवेश करणे आणि मालव्य राजयोग तयार होणे विशेष फलदायी ठरेल. या काळात तुम्ही वाहन खरेदी करू शकता. रिअल इस्टेट, विक्री, वास्तुविशारद, इंटिरिअर डिझायनिंग या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा ठरेल. तसेच, या काळात तुम्ही कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल. आर्थिक लाभाच्या नवनव्या संधी नशिबाचे दार ठोठावतील. थोडक्यात हा काळ वेगवान आणि सकारात्मक घडामोडींचा ठरेल.