शुक्र-शनीचा युती योग: ७ राशींना लाभच लाभ, शेअर बाजार-लॉटरीत फायदा; धनप्राप्तीची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 07:07 AM2024-02-27T07:07:07+5:302024-02-27T07:07:07+5:30

कुंभ राशीत होणारी शुक्र आणि शनीची युती महत्त्वाची मानली जाते. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह ठराविक वेळेच्या अंतराने राशी परिवर्तन करतात. ग्रहांच्या राशी बदलामुळे सर्व राशींवर शुभ आणि अशुभ दोन्ही प्रभाव दिसून येतात. कला, संस्कृती, आनंद, वैभव आणि समृद्धीकारक शुक्र ग्रह मार्च महिन्यात राशीपरिवर्तन करणार आहे. मकर राशीत असलेला शुक्र ७ मार्च रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. मकर आणि कुंभ या दोन्ही शनीचे स्वामित्व असलेल्या राशी आहेत.

कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर शुक्र आणि नवग्रहांचा न्यायधीश मानला गेलेला शनी यांचा युती योग जुळून येणार आहे. शुक्र आणि शनी यांचे मित्रत्वाचे संबंध असल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे मार्च महिन्यात शुक्र ग्रह दोनदा राशीपरिवर्तन करणार आहे. ०७ मार्चला कुंभ राशीत विराजमान होणारा शुक्र ३१ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन रास ही शुक्राची उच्च रास मानली जाते.

कुंभ राशीतील शुक्राचा प्रवेश आणि शनीसोबत जुळून येणार युती योग काही राशींना अतिशय लाभदायक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशींना शुक्राचे गोचर शुभ ठरू शकेल? जाणून घ्या...

मेष: शुक्र ग्रहाचे गोचर शुभफलदायक ठरू शकेल. उत्पन्नात लक्षणीय वाढ दिसू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नोकरदारांना आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजार, लॉटरीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर वेळ अनुकूल आहे.

वृषभ: शुभ परिणाम मिळतील. व्यवसाय चमकेल. नोकरीत सुवर्ण संधी मिळतील. संपत्ती वाढेल. पैशांची चांगली बचत करू शकाल. देवी लक्ष्मी आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. नशिबाची उत्तम साथ मिळू शकेल. प्रेमसंबंधात शांततेचे क्षण घालवाल.

सिंह: व्यवसायात भरपूर पैसे कमावण्याची संधी मिळेल. शेअर बाजार किंवा इतर कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल तर चांगला परतावा मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ खूप चांगला आहे. शुक्र प्रभावामुळे प्रेमसंबंध दृढ होतील. जोडीदारासोबत सहलीसाठी छान योजना बनवता येईल. कुटुंबात हुशारीने काम करा.

कन्या: धनप्राप्तीचे शुभ संकेत आहेत. सर्व प्रकारच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी चांगले काम कराल. अपूर्ण कामे लवकरच पूर्ण होतील. मान-सन्मानात वाढ होईल. एकंदरीत शुक्राचे गोचर लाभदायक ठरेल.

तूळ: भौतिक सुख मिळेल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात चांगला नफा मिळेल. व्यवसायिक योजना पूर्ण होतील. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी चांगले यश मिळू शकते. नोकरीच्या बाबतीत काही चांगली बातमी मिळू शकते. बढती मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ होईल. नवीन कामात यश मिळेल. सन्मान वाढेल.

धनु: जीवनात आनंद मिळेल. प्रेम जीवनात काही सकारात्मक बदल होऊ शकतात. पैशाची कमतरता भासणार नाही. नवीन कार किंवा घर खरेदी करू शकता. घरामध्ये आनंद राहील. ऑफिसमध्ये काम करण्यासाठी चांगले वातावरण मिळेल. चांगल्या कामगिरीसाठी बढती मिळू शकते.

कुंभ: नोकरदारांच्या करिअरमध्ये चांगली वाढ होईल. उत्पन्नासोबतच प्रभाव चांगला वाढेल. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. मनोकामना पूर्ण होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जमीन किंवा वाहन खरेदी करायचे असेल तर तुमची इच्छा या महिन्यात पूर्ण होऊ शकते. आर्थिक लाभाच्या खूप चांगल्या संधी मिळतील. चांगली बातमी मिळू शकते. आवडीचे काम मिळाल्यानंतर मूड चांगला राहील.

मार्च महिन्यात ५ ग्रहांचे गोचर होणार आहे. नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रहही मार्च महिन्यात दोनवेळा राशीपरिवर्तन करणार आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.