२९ जानेवारीपासून 'या' राशीच्या लोकांना येणार 'अच्छे दिन'; देवी लक्ष्मीची होणार कृपा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 06:07 PM2022-01-23T18:07:36+5:302022-01-23T18:12:18+5:30

२९ जानेवारी रोजी भौतिक सुख, वैवाहिक सुख, विलास, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य इत्यादींचा कारक शुक्र ग्रह वक्री अवस्थेतून मार्गस्थ होईल. शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे आणि मीन ही शुक्राची उच्च रास आहे, तर कन्या ही शुक्राची नीच राशी मानली जाते.

शुक्र मार्गस्थ झाल्यामुळे काही राशींवर त्याचा अनुकूल परिणाम दिसून येणार आहे. शुक्र शुभ असेल तेव्हा देवी लक्ष्मीचाही विशेष आशीर्वाद मिळतो. चला जाणून घेऊया शुक्र मार्गस्थ झाल्यामुळे कोणत्या राशीच्या लोकांचा भाग्योदय होणार आहे.

मिथुन रास - शुक्र मार्गी झाल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना ते लाभदायक ठरणार आहे. यादरम्यान, मान-सन्मानात वृद्धी होईल, तसंच कुटुंबीयांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल. याशिवाय तुमच्या जोडीदारासोबतही तुमचे संबंध अधिक चांगले होती. गोचर काळात तुमच्या समस्यांचं निराकरणही होईल. आरोग्याशी संबंधित समस्या कमी होतील आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.

सिंह रास - शुक्र मार्गस्थ होण्याचा काळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. यादरम्यान तुम्हाला भूमी किंवा वाहन खरेदीचाही योग संभवतो. जमिनीचा व्यवहार केल्यास त्याचा चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कामांचाही तुम्ही भाग बनाल. जोडीदाराच्या मदतीनं तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. वैवाहिक जीवनही सुखद होईल.

कन्या रास - शुक्र मार्गस्थ झाल्यानं तुमच्या आयुष्यात आनंदाचं वातावर येईल. यादरम्यान, भाऊ-बहिणीचं नातं अधिक दृढ होईल. येणाऱ्या समस्यांचा सामनाही अतिशय चांगल्या रितीनं कराल. धन संबंधी समस्यांपासून मुक्ती मिळेल. कुटुंबियांसोबतही चांगला वेळ घालवाल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठीही हा उत्तम काळ ठरू शकतो.

धनू रास - हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. यादरम्यान, तुम्हाला गुप्त शत्रूंपासून मुक्ती मिळेल.याशिवाय तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक कष्ट करावे लागतील. परंतु त्याचंही फळही तुम्हाला चांगलं मिळेल. जोडीदाराचा सोबत चांगला वेळ घालवाल. धनलाभाचेही योग संभवतात. याशिवाय कुटुंबियांचीही मदत मिळेल.