२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 20:08 IST2025-12-12T19:56:06+5:302025-12-12T20:08:48+5:30

Auspicious Vastu Tips For New Year 2026: आतापासूनच तयारी सुरू करा आणि न विसरता सन २०२६ या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काही उपाय आवर्जून करा. सविस्तर जाणून घ्या...

Auspicious Vastu Tips For New Year 2026: २०२५ या वर्षाची अवघ्या काही दिवसांनी सांगता होईल. त्यानंतर इंग्रजी नववर्ष २०२६ सुरू होऊ शकेल. २०२५ हे वर्ष अनेकार्थाने विशेष ठरले. शुभ आणि अशुभ असे अनेक अनुभव अनेकांनी घेतले. २०२६ या नववर्षाच्या निमित्ताने संकटे, समस्या, अडचणी टळून सगळे कल्याणाचे मंगलमय होवो, अशी अनेकांची इच्छा असेल.

Tulsi 5 upay on First Day New Year 2026: आपल्या घरावर अशुभाची नजर नसावी, असे प्रत्येकाला वाटत असते. घरात शुभ घडावे, सकारात्मकता राहावी, यासाठी अनेक उपायही केले जातात. अनेक जण अगदी संकल्प करून नित्य नियमाने अनेक गोष्टी करत असतात. वास्तुशास्त्रातही घराच्या सुख-समृद्धीसाठी अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये तुळशीला अत्यंत पूजनीय आणि पवित्र मानले जाते. असे म्हटले जाते की, दररोज तुळशीची पूजा केल्याने जीवनातील सर्व त्रास दूर होतात. तुळशीचे आशीर्वाद मिळतात. पौराणिक मान्यतेनुसार, तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप आणि भगवान विष्णूंचे प्रिय मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात तुळशीचे रोप लावल्याने वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक होते.

नवीन वर्ष सुरू होण्यास आता काही दिवसच शिल्लक आहेत. २०२६ नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीचे पूजन करणे किंवा तिच्याशी संबंधित काही गोष्टी करणे, उपाय करणे अत्यंत शुभ, लाभदायक, पुण्य फलदायी आणि फायदेशीर मानले जाते. सन २०२६ या नवववर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीशी संबंधित नेमके काय उपाय करावेत, ते जाणून घेऊया...

पिवळा धागा बांधावा: कोणत्याही नववर्षाचा पहिला दिवस खूप शुभ मानला जातो. म्हणून या दिवशी तुळशीच्या रोपाला पिवळा धागा बांधावा. असे म्हटले जाते की, पिवळा धागा बांधल्याने जीवनातील त्रास दूर होऊ शकतो. धागा बांधताना शक्य असेल तर तुळसी चालीसा म्हणावी किंवा श्रवण करावी. हा उपाय केल्यास देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आशीर्वाद वर्षभर घरावर, घरातील व्यक्तींवर राहू शकतात, असे म्हटले जात आहे.

पंचामृत अर्पण करावे: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीला पंचामृत अर्पण करावे. पंचामृत शक्य नसेल, तर दूध आवर्जून अर्पण करावे. हा उपाय करताना, तुळशीला समर्पित मंत्रांचा जप करा. तसेच इच्छा पूर्ण करण्यासाठी देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीविष्णूंची प्रार्थना करा.

लाल धागा बांधा: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीच्या रोपाभोवती लाल धागा बांधणे आवश्यक आहे. शास्त्रांनुसार, तुळशीच्या रोपाभोवती लाल धागा बांधणे खूप महत्त्वाचे मानले जाते. याव्यतिरिक्त, तुळशीच्या रोपाला पवित्र धागा किंवा पवित्र रक्षासूत्र अर्पण करणे अत्यंत फलदायी मानले जाते.

सौभाग्याचे वाण अर्पण करा: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीला सौभाग्य वाण अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की, तुळशीला बांगड्या, सिंदूर किंवा सौभाग्याच्या इतर वस्तू अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम, सुसंवाद आणि स्थिरता येते. हा उपाय केल्यास वैवाहिक नात्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत मिळू शकते.

तुपाचा दिवा आवर्जून लावावा: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. तुळशीजवळ दिवा लावल्याने कुटुंबात सुख आणि समृद्धी येते, असे म्हटले जाते.

तुळशीच्या रोपाला धार्मिक, वैज्ञानिक आणि शास्त्रीयदृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. घरात तुळशीचे रोप ठेवणे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात खूप फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. या सर्व कारणांमुळे बहुतेक घरांमध्ये तुळशीचे रोप असते. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीची पाने अर्पण केली जातात. भगवान विष्णूंची पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही. त्यात लक्ष्मी देवी वास करते असे मानले जाते.

बहरलेली तुळस आपल्या दारात, अंगणात, खिडकीत, गॅलरीत असणे हे भरभराटीचे लक्षण मानले जाते. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सदर उपाय करावेत. उलटपक्षी जर शक्य झाले, तर सदर उपाय केवळ एक दिवस न करता नियमितपणे करावे. अगदी काहीच जमले नाही, तर सकाळी आणि तिन्हीसांजेला दिवेलागणीवेळी तुळशीपाशी दिवा अवश्य लावावा आणि लक्ष्मी देवीचे स्मरण करावे.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.