शुक्रवारी अपरा एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, लाभच लाभ; भरभराट काळ, हाती पैसा राहील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 08:18 IST2025-05-22T07:57:12+5:302025-05-22T08:18:58+5:30

Vaishakh Apara Ekadashi May 2025: वैशाख महिन्यातील अपरा एकादशीला कोणत्या राशींवर धनलक्ष्मी प्रसन्न राहू शकेल? तुमच्या राशीवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

Vaishakh Apara Ekadashi May 2025: प्रत्येक मराठी महिन्यात दोन एकादशी येतात. प्रत्येक एकादशीचे नाव आणि तिचे महत्त्व वेगवेगळे आहे. प्रत्येक एकादशीला श्रीविष्णूंचे विशेष पूजन केले जाते. श्रीविष्णूंच्या पूजनाने, भजनाने आणि उपासनेने जीवनातील विघ्न दूर होतात. सुख, शांतता, समृद्धी येते, असेही सांगितले जाते.

शुक्रवार, २३ मे २०२५ रोजी वैशाख वद्य पक्षातील अपरा एकादशी आहे. शुक्रवारी एकादशी येत असल्यामुळे हा योग विशेष मानला जात आहे. या दिवशी श्रीविष्णूंसह लक्ष्मी देवीचीही विशेष पूजा केल्यास लक्ष्मी नारायणाचे अनंत आशीर्वाद प्राप्त होऊ शकतील, असे म्हटले जात आहे.

अपरा एकादशीला असलेल्या ग्रहस्थितीनुसार, कोणत्या राशींना उत्तम लाभ मिळू शकेल? शिक्षण, कुटुंब, व्यवसाय, व्यापार, नोकरी, आर्थिक आघाडीवर यश-प्रगती, मान-सन्मान, धनलाभाची संधी कोणत्या राशींना मिळू शकेल? जाणून घेऊया...

मेष: आपले विचारचक्र नकारात्मकतेकडे झुकले जाणार नाही याची काळजी घ्यावी. लवकरच परिस्थिती बदलेल. अनुकूल परिस्थिती राहील. धनलक्ष्मीची कृपा राहील. भेटवस्तू मिळेल. आवडत्या लोकांच्या सहवासात याल. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. त्यामुळे हाती आलेला पैसा शिल्लक उरणार नाही. नको त्या भानगडीत पडू नका.

वृषभ: अनेक अडचणी दूर होतील. एखादी चांगली बातमी कळेल. त्यामुळे मन आनंदून जाईल. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. जवळच्या लोकांच्या सहवासात मन रमेल. सामाजिक मान-सन्मान मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत नवीन संधी मिळेल. व्यावसायिक करारमदार होतील. ते फायदेशीर ठरतील. धनलक्ष्मीची कृपा राहील.

मिथुन: ग्रहमान अनुकूल राहील. महत्त्वाच्या कामात काही कारणाने विलंब होईल. शांत चित्ताने कामे करत राहिल्यास हळूहळू परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. एखादी शुभवार्ता कळेल. भव्यदिव्य यश मिळू शकते. मात्र, कुणालाही डोळे झाकून गृहीत धरून चालणार नाही. एखाद्या कामात व्यस्त राहाल. कागदोपत्री पूर्तता करताना खबरदारी घ्यावी.

कर्क: योजना राबविण्यात उत्साह राहील. मनात कल्पक विचार राहतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. एखाद्या बाबतीत धाडसीपणा दाखवाल. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. घाईघाईत कामे करू नका. शुक्रवार, शनिवार चांगले अनुभव येतील. मौजमजा करण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. सामाजिक मान-सन्मान मिळेल, जनसंपर्क चांगला राहील.

सिंह: बोलण्याचा वेगळाच अर्थ काढला जाऊ शकतो. त्यामुळे कितीही चांगले वाटले आणि बरोबर असले तरी लोकांना स्वतःहून सल्ला देण्याच्या फंदात पडू नका. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. योजना गुप्त ठेवा. अनुकूल परिस्थिती राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. नियमानुसार कामे करा. वाहन जपून चालवा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

कन्या: प्रगतीला पूरक वातावरण राहील. मनात कल्पक विचार राहतील. लोक मान देतील. सामाजिक स्थान उंचावेल. नोकरीत काही बदल होऊ शकतात. वरिष्ठांकडून मदत मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. सुस्थितीत याल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल.

तूळ: कार्यक्षेत्रात आघाडी घ्याल. अचानक मोठी संधी मिळेल. वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. जमिनीचे व्यवहार फलद्रूप होतील. मनात सकारात्मक विचार राहतील. त्या जोरावर अवघड कामे पूर्ण कराल. घरी पाहुणे मंडळी येतील. जुने वाद उकरून काढून वेळ वाया घालवू नका. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ. अति उत्साह नको. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो.

वृश्चिक: ग्रहमानाची अनुकूलता राहील. नोकरी, व्यवसायात व्यस्त राहाल. यश मिळत असल्याने कामाचा ताण जाणवणार नाही. वेळेचे व्यवस्थापन नीट कराल. त्यामुळे मोकळा वेळही मिळेल. गुंतवणूक करण्याची घाई करू नका. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी मिळेल. अधिकारात वाढ होईल. कलागुणांचे कौतुक केले जाईल. सामाजिक मान-सन्मान मिळेल, विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे.

धनु: अनेक आघाड्यांवर यश मिळू शकेल. मात्र, थोडे सावधपणे व्यवहार करण्याची गरज आहे. अडलेली कामे मार्गी लागतील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. व्यवसायात भरभराट होईल. जवळच्या प्रवासाचे योग येतील. घराशी संबंधित व्यवहार करताना खबरदारी घ्यावी. चार ठिकाणी चौकशी करा, नोकरीत नवीन प्रस्ताव येईल. विचारपूर्वक निर्णय घ्यावे. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल.

मकर: कामाचा ताण कमी झालेला असेल. त्यामुळे हलके वाटेल. आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. जवळच्या लोकांच्या सहवासात सहलीला जाऊन याल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगले दिवस आहेत. व्यवसायात एखाद्या प्रकल्पात थोडा वेळ द्यावा लागेल. मात्र, मोठी गुंतवणूक करताना सावध राहा.

कुंभ: थोडे सबुरीचे धोरण ठेवा. घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. कायद्याची बंधने पाळा. परिस्थिती आटोक्यात येईल. विवाहेच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. वडिलोपार्जित संपत्तीची कामे करताना सतर्क राहा.

मीन: मनात उत्साह राहील. एखाद्या कामात सोप्या पद्धतीने यश मिळेल. धनलाभ होईल. हाती आलेला पैसा खर्च करण्याकडे कल राहील. प्रवासात सतर्क राहा. मनात आध्यात्मिक विचार राहतील. नियमानुसार कामे करा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. सहकारी वर्गाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.