कुंभ संक्रांत शनि प्रदोष २०२६: ८ राशींचा भाग्योदय, पदोन्नती-पगारवाढ; लक्षणीय लाभ, भरघोस नफा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 10:26 IST2026-02-13T10:01:59+5:302026-02-13T10:26:20+5:30
Surya Gochar Kumbh Sankranti February 2026: सूर्याची कुंभ संक्रांत आणि शनि प्रदोषाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव असेल? कोणते उपाय केल्यास सूर्य, शनि आणि महादेव यांची अखंड कृपा लाभू शकेल? जाणून घ्या...

Surya Gochar Kumbh Sankranti February 2026: नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य शनिचे स्वामित्व असलेल्या मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करत आहे. सूर्याचे हे राशी संक्रमण कुंभ संक्रांत म्हणून ओळखले जाणार आहे. पुढील सुमारे महिनाभर सूर्य हा कुंभ राशीत असणार आहे.

Magh Shani Pradosh February 2026: १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सूर्याने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. यानंतर शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी शनि प्रदोष आहे. काही मान्यतांनुसार, सूर्य आणि शनि हे पिता-पुत्र आहेत. असे असले तरी ते एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जातात. त्यातच शनिचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत सूर्याने प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी महिनाभराचा काळ काही राशींना विशेष महत्त्वाचा मानला गेला आहे.

Sun Transit In Aquarius February 2026: प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. शनिवारी प्रदोष आला की, त्याला शनि प्रदोष म्हटले जाते. या दिवशी महादेव आणि शनि देव यांची उपासना करणे शुभ मानले गेले आहे. तुमच्यासाठी कसा असेल हा काळ? जाणून घेऊया...

मेष: सूर्य संक्रांतीपासूनचा एक महिन्याचा काळ खूप चांगला असेल. नातेसंबंध सुधारतील. प्रेमसंबंधांचे रूपांतर विवाहात होऊ शकते. या काळात नशिबाची साथ मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. सरकारी क्षेत्राशी संबंधित कामातही लाभ होईल. व्यवसायासाठी हा काळ उत्तम राहील. मात्र, केवळ नशिबावर अवलंबून राहू नका; कठोर परिश्रम करा, यश नक्की मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. उपाय: पाण्यात कुंकू मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे, लाभ होईल.

वृषभ: सूर्याचे कुंभ राशीतील गोचर अत्यंत सकारात्मक ठरेल. जोडीदारासोबतचे संबंध सामान्य राहतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नोकरीत नवीन संधी मिळतील आणि पदोन्नतीचे योग येतील. कामात मन लागेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना विशेष लाभ होईल. सरकार आणि घरातील मोठ्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल. उपाय: आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे फायदेशीर ठरेल.

मिथुन: कुंभ संक्रांतीपासूनचा एक महिना सामान्यापेक्षा चांगला असेल. नातेसंबंधांमध्ये गोडवा राहील. करिअरमध्ये यश मिळेल. परदेशाशी संबंधित व्यापार करणाऱ्यांना नफा होईल. व्यवसायानिमित्त प्रवास घडू शकतो. गोचराच्या प्रभावामुळे आत्मविश्वास वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नोकरीपेशा असलेल्या व्यक्तींना पगारवाढ आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. उपाय: गायत्री मंत्राचा जप करणे फलदायी ठरेल.

कर्क: सूर्याचे कुंभ राशीतील संक्रमण थोडे त्रासदायक ठरू शकते. नातेसंबंधांची काळजी घ्यावी लागेल, जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. परस्पर सामंजस्य राखल्यास परिस्थिती सुधारेल. या काळात कष्टाला घाबरू नका; मेहनत केल्यास नशिबाची साथ मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन नोकरी मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेचे वाद सुटतील. व्यावसायिक भागीदाराशी मतभेद वाढू शकतात. सावध राहा. उपाय: भगवान शिवाचा अभिषेक करावा, लाभ होईल.

सिंह: हे गोचर चांगले राहील. जोडीदारासोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा. अविवाहित व्यक्तींच्या विवाहाचे योग जुळून येतील. या काळात मालमत्ता, विशेषतः जमीन किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. वरिष्ठांशी संबंध दृढ होतील. व्यवसायानिमित्त नवीन लोकांशी गाठीभेटी होतील. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केल्यास लाभ होऊ शकतो. उपाय: सूर्याष्टकाचे पठण करणे शुभ ठरेल.

कन्या: सूर्य संक्रांतीचा हा महिना खूप चांगला असेल. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. व्यापारात नफा होईल. शत्रू किंवा विरोधक टिकू शकणार नाहीत. नोकरी करणाऱ्यांच्या कामात बदल होऊ शकतो. पगारवाढीसह पदोन्नती मिळण्याचे संकेत आहेत. परदेशवारीची संधी मिळू शकते. कोणतीही मोठी समस्या जाणवणार नाही. उपाय: गायत्री चालीसा पठण केल्यास लाभ होईल.

तूळ: सूर्याचे कुंभ राशीतील गोचर आव्हानात्मक ठरेल. नातेसंबंध जपावे लागतील, जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मात्र, आर्थिक स्थिती चांगली राहील. लॉटरीसारख्या क्षेत्रातून लाभ होऊ शकतो. अनपेक्षित मार्गांनी धनप्राप्ती होईल. परदेशातील व्यापारात फायदा होईल. नोकरीत स्थिती समाधानकारक राहील. नशिबाची साथ मिळेल. उपाय: सूर्यदेवाला दररोज अर्घ्य द्यावे, लाभ होईल.

वृश्चिक: हे गोचर संमिश्र फळ देणारे असेल. नातेसंबंधांवर विशेष लक्ष द्यावे लागेल; जोडीदाराशी वाद टाळा. कामाच्या ठिकाणी सावध राहा, नोकरी बदलण्याचे योग येऊ शकतात. भागीदारासोबत वाद घालणे टाळावे. कामासाठी प्रवास करावा लागेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील, त्यामुळे विचारपूर्वक खर्च करा. उपाय: दररोज गाईला गूळ खाऊ घालणे शुभ ठरेल.

धनु: सूर्याचे हे गोचर अत्यंत लाभदायक असेल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील आणि जोडीदाराशी ताळमेळ बसेल. आर्थिक बाजू भक्कम असेल. नशिबाच्या जोरावर धनलाभ होईल आणि अचानक विविध स्रोतांतून पैसा मिळेल. व्यापारात वृद्धी होईल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. उपाय: सूर्य गायत्री मंत्राचा जप करणे फलदायी ठरेल.

मकर: सूर्य या राशीतून निघून कुंभ राशीत प्रवेश करत आहे. हे गोचर चांगले असले तरी नातेसंबंधांत ताळमेळ राखणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत थोडी चिंता वाटू शकते. अपेक्षित लाभ मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. मात्र, पैशांशी संबंधित व्यवहारांत यश मिळेल. उपाय: आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे उत्तम राहील.

कुंभ: सूर्य आता याच राशीत प्रवेश करत आहे. हे गोचर शुभ फलदायी ठरेल. मात्र, नातेसंबंधात थोडा तणाव किंवा समन्वयाचा अभाव जाणवू शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि कर्जातून सुटका मिळेल. नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो किंवा बदलाची स्थिती निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी वर्तन सौम्य ठेवा. उपाय: भगवान शिवाला जलाभिषेक करणे शुभ ठरेल.

मीन: सूर्याचे हे गोचर एकंदरीत चांगले असेल. परंतु, वैयक्तिक नात्यात समस्या येऊ शकतात, त्यामुळे सामंजस्य ठेवावे. व्यापाऱ्यांना नफा मिळेल, मात्र निष्काळजीपणामुळे नुकसानही होऊ शकते. आर्थिक स्थिती सामान्य राहील. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. अवाजवी खर्चावर नियंत्रण ठेवा. उपाय: गाईला गूळ खाऊ घालणे हितकारक ठरेल.

















