सूर्याची मीन संक्रांती: ७ राशींना महिनाभर लाभच लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; ‘हे’ उपाय फलदायी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 12:28 IST2025-03-14T12:16:44+5:302025-03-14T12:28:39+5:30

sun transit in pisces march 2025: सूर्य पुढील महिनाभर मीन राशीत विराजमान असणार आहे. या काळात कोणत्या राशीच्या लोकांनी कोणते उपाय करणे अत्यंत उपयुक्त ठरू शकते? जाणून घ्या...

नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य प्रत्येक राशीत सुमारे एक महिना भ्रमण करतो. सूर्य ज्या राशीत असतो, त्या काळाला त्या राशीचा संक्रांत कालावधी म्हटले जाते. १४ मार्च २०२५ रोजी सूर्य गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे हा पुढील महिनाभराचा काळ मीन संक्रांती नावाने ओळखला जाईल.

सूर्याच्या मीन राशीतील प्रवेशाने अनेक अद्भूत योग, राजयोग, शुभ योग जुळून येत आहेत. मीन राशीत आताच्या घडीला बुध, शुक्र, राहु, नेपच्युन हे ग्रह विराजमान आहेत. या सर्व ग्रहांशी सूर्याचा युती योग जुळून येत आहे. तसेच सूर्य आणि बुधाचा बुधादित्य राजयोग जुळून येत आहे. शुक्रादित्य राजयोग जुळून येत आहे. राहु आणि सूर्याच्या युतीने ग्रहण योग जुळून येत आहे.

राहु-केतु एकमेकांपासून सातव्या स्थानी असतात. केतु कन्या राशीत विराजमान आहे. सूर्याच्या मीन राशीतील प्रवेशानंतर सूर्य आणि केतु यांचा समसप्तक योग जुळून येत आहे. सूर्याच्या मीन राशीतील प्रवेशानंतर मीन राशीत चतुर्ग्रही, पंचग्रही योग जुळून आलेला आहे. सूर्याचा मीन राशीतील प्रवेश आणि जुळून येत असलेले शुभ राजयोग कोणत्या राशींवर कसे प्रभावी ठरू शकतील? कोणत्या राशीच्या लोकांनी काय उपाय करणे अत्यंत उपयुक्त, फलदायी ठरू शकेल? जाणून घेऊया...

मेष: सूर्याचे मीन राशीतील गोचर भ्रमण चांगले आहे. असे असले तरी काही विपरीत स्थिती बघावयास मिळेल. कार्यक्षमतेत वृद्धी होईल. धाडसाच्या व पराक्रमाच्या जोरावर यशस्वी होऊ शकाल. खर्चात वाढ होईल. आर्थिक नुकसान होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. परदेशाशी संबंधित कार्यात यशस्वी होऊ शकता. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. उपाय:-रोज गायत्री मंत्राचा जप करणे हितावह होईल.

वृषभ: मीन संक्रांतीपासूनचा एक महिना अनुकूल आहे. प्राप्तीत वाढ होईल. सामाजिक कार्यात स्वारस्य असल्याचे दिसून येईल. विद्यार्थ्यांचे अध्ययन उत्तम होईल. कारकीर्द उंचावेल. अनेक लोकांचे सहकार्य मिळेल. उपाय :-आदित्य हृदय स्तोत्राचे पठण लाभदायी होईल.

मिथुन: सूर्याचे मीन राशीतील गोचर भ्रमण लाभदायी होईल. उन्नती होऊ शकते. नोकरी व व्यापारात यश प्राप्ती होईल. स्वतःच्या जोरावर यशस्वी होऊ शकता. माता-पित्याचे आशीर्वाद प्राप्त होतील. व्यापार करण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्ती एखादे काम सुरु करू शकतात. असे असले तरी वडिलांशी आपले संबंध बिघडू शकतात. कार्यक्षेत्री खोळंबा होऊ शकतो, तेव्हा सावध राहावे. उपाय:- सूर्यास कुंकू मिश्रित पाण्याचा अर्घ्य देणे हितावह होईल.

कर्क: सूर्य मीन राशीत आल्यापासूनचा एक महिना अत्यंत लाभदायी होईल. असे असले तरी कार्यांसह वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल. कार्य नियोजन योग्य प्रकारे केल्याने यशाची दालन उघडू शकतात. कुटुंबियांसह एखादा प्रवास करू शकता. आत्मविश्वास उत्तम असेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल राहील. उपाय:- रोज सूर्याष्टकाचे पठण करणे शुभ फलदायी होईल.

सिंह: सूर्याचे मीन राशीतील भ्रमण काहीसे त्रासदायी होऊ शकते. एखाद्या गोष्टीमुळे काळजी वाटू शकते. असे असले तरी मनातील नैराश्य दूर होऊन आत्मविश्वासाचा संचार वाढेल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. वाणीतील कटुतेचा प्रभाव संबंधांवर होत असल्याचे दिसू शकते. कुटुंबीय किंवा सासुरवाडीशी संबंध बिघडू शकतात. प्रकृतीची काळजी घ्यावी. वाहन चालवताना दक्ष राहावे लागेल. उपाय:- रोज भगवान शंकराच्या पंचाक्षर मंत्रांचा जप करावा.

कन्या: मीन संक्रातीपासूनचा एक महिना काहीसा त्रासदायी असू शकतो. अहंकार वाढत असल्याचे दिसून येईल. वैवाहिक जोडीदार व व्यावसायिक भागीदार ह्यांच्याशी संबंध बिघडण्याची संभावना आहे. ज्येष्ठांचा सन्मान करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. निर्णय क्षमता उत्तम असेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. असे असले तरी वैवाहिक जोडीदाराशी असलेल्या संबंधांची काळजी घ्यावी, अन्यथा कार्यक्षेत्री त्याचा विपरीत प्रभाव होत असल्याचे दिसू शकते. उपाय:- वडिलांचे आशीर्वाद घेऊन कार्यास सुरवात करावी. लाभ होईल.

तूळ: सूर्याचे मीन राशीतील भ्रमण चांगले आहे. शत्रू बलहीन होतील. नोकरी बदलण्यास किंवा व्यापारात नवीन काही करण्यास इच्छुक होऊ शकता. बेफिकीर राहू नये, अन्यथा त्रास होऊ शकतो. अर्थात सामंजस्याने काम केल्यास लाभ होईल. देवाण-घेवाणीच्या कामात दक्ष राहावे. उपाय:- गायत्री मंत्राचे पठण करणे आपल्या हिताचे होईल.

वृश्चिक: सूर्याच्या मीन राशीतील भ्रमणामुळे आयुष्यात आव्हाने येऊ शकतात. मुलांशी संबंधित काळजी निर्माण होऊ शकते. धर्म-कर्म कार्यात स्वारस्य असल्याचे दिसू शकते. कामांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. कामावर लक्ष दिल्यास यशस्वी होऊ शकाल. आजचे काम उद्यावर ढकलू नये. सामाजिक कामात सहभागी होऊ शकता. उपाय:- भगवान शंकरास जलाभिषेक करणे लाभदायी होईल.

धनु: सूर्याचे मीन राशीतील भ्रमण काहीसे चिंताजनक असू शकते. जमीन-जुमल्याशी संबंधित कामात अत्यंत सावध राहावे लागेल. कामात भरपूर मेहनत कराल व त्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच योग्य निर्णय घेऊन वाटचाल करावी लागेल. उपाय:-रोज गायत्री मंत्राचा एक माळ जप करावा. लाभ होईल.

मकर: सूर्याच्या मीन राशीतील गोचराच्या प्रभावामुळे आत्मविश्वासात वाढ झाल्याचे दिसू शकते. नवनवीन कामे हाती घेण्याचे धाडस कराल. नशिबाची साथ मिळेल. कामात पूर्वीपेक्षा जास्त लाभ होईल. कोणी टीका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. लहान भावंडांशी संबंध सलोख्याचे राहतील. असे असले तरी हे गोचर भ्रमण काहीसे त्रासदायी होऊ शकते. प्रवासादरम्यान बेफिकीर राहू नये, आर्थिक नुकसान होण्याची संभावना आहे. उपाय:-गरजवंतास गव्हाचे दान देणे फलदायी होईल.

कुंभ: मीन संक्रांतीपासूनचा एक महिना मध्यम फलदायी आहे. जीवनात स्थैर्य येण्याची संभावना आहे. व्यवहारावर सुद्धा लक्ष द्यावे लागेल. असे केल्याने लाभच होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबियांशी वाद घालणे टाळा. आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करावा. कोणालाही पैसे उसने देऊ नये, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. उपाय:-रोज सूर्याष्टकाचे पठण करणे लाभदायी होईल.

मीन: सूर्य आता याच राशीतूनच भ्रमण करणार आहे. अहंकारी झाल्याचे दिसू शकते. उच्च दर्जाची ऊर्जा पाहावयास दिसू शकेल. क्रोधाचे प्रमाण वाढू शकते. असे असले तरी मान-सन्मानात वृद्धी होईल. मानसिक अशांततेचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जोडीदाराशी वाद टाळा. त्यांच्याशी समन्वय राखावा. सूर्याच्या गोचर भ्रमणामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ शकतात. खर्चात वाढ संभवते. उपाय:-रोज गायत्री मंत्राचा एक माळ जप करणे हितावह होईल.