Sun Jupiter Conjunction 2022: सूर्य-गुरु युती: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना मिळतील अनेकविध फायदे; लाभच लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 03:19 PM2022-02-09T15:19:27+5:302022-02-09T15:24:00+5:30

Sun Jupiter Conjunction 2022: शनीच्या कुंभ राशीत होत असलेला सूर्य आणि गुरुचा संयोग शुभ मानला गेला आहे. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने फेब्रुवारी महिना अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. नवग्रहाचा राजा सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सूर्याच्या या राशी संक्रमणाला कुंभ संक्रांत म्हटले जाते. (sun jupiter conjunction 2022)

शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत आताच्या घडीला नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह विराजमान आहे. गुरु हा संपन्नता, विवाह, वैभव, विवेक, धार्मिक कार्य यांचा कारक ग्रह मानला गेला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात गुरु अस्त होणार आहे. (sun jupiter conjunction 2022 in aquarius)

यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी सूर्याने कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्य आणि गुरु यांची युती होत असल्याचे सांगितले जात आहे. या दोन अत्यंत महत्त्वाच्या ग्रहांचे एकाच राशीत असणे शुभ परिणामकारक मानले गेले आहे. ज्योतिषीय दृष्ट्या याला अधिक महत्त्व आहे. (surya guru yuti in kumbha rashi)

सूर्य हा करिअर, नेतृत्त्व यांचा कारक आहे. शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत सूर्य आणि गुरु दोन ग्रह एकत्र येण्याने बारा राशींपैकी ५ राशीच्या व्यक्तींना याचा उत्तम फायदा होणार असून, अनेकविध प्रकारचे लाभ, संधी प्राप्त होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. कोणत्या राशीच्या व्यक्तींना कुंभ राशीतील सूर्य आणि गुरु युती सकारात्मक ठरेल, ते जाणून घेऊया...

सूर्य-गुरु युती मेष राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकते. या कालावधीत लाभाच्या संधी प्राप्त होऊ शकतील. आर्थिक आघाडी उत्तम राहू शकेल. समाजातील मान-सन्मान, लोकप्रियता वृद्धिंगत होऊ शकते. मिळकतीचे नवे स्रोत मिळू शकतील. विद्यार्थ्यांना हा काळ चांगला ठरू शकेल. एखाद्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.

सूर्य-गुरु युती कर्क राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकते. करिअरमध्ये यश व प्रगतीचे मार्ग साध्य होऊ शकतील. जीवनात सुधारणा दिसून येऊ शकतात. कार्यक्षेत्रात चमक दाखवण्याची संधी मिळून मान, प्रतिष्ठा वृद्धिंगत होऊ शकते. मिळकत वाढीच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. गुरु आणि सूर्य यांच्या शुभ प्रभावामुळे कुटुंबातील आनंद द्विगुणित होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.

सूर्य-गुरु युती कन्या राशीच्या व्यक्तींना शुभ परिणामकारक ठरू शकेल. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यात प्रतिमा उंचावेल. व्यवसायातून लाभ मिळू शकतील. हितशत्रूंपासून सावध राहावे, असा सल्ला जात आहे. तसेच योजना यशस्वी होऊ शकतील. कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची उत्तम संधी मिळेल. नशीबाची साथ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.

सूर्य-गुरु युती धनु राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरू शकेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगले रिटर्न मिळू शकतील. करिअरमध्ये प्रगती साध्य होऊ शकेल. काही जणांना वेतनवृद्धी किंवा प्रमोशनचा लाभ प्राप्त होऊ शकेल. मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतील. मान, सन्मान वृद्धिंगत होऊ शकतील. समोरची व्यक्ती तुमचा सल्ला गंभीरतेने घेऊ शकतील, असे सांगितले जात आहे.

सूर्य-गुरु युती कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक ठरू शकेल. व्यापार, व्यवसाय, उद्योगातून चांगला लाभ प्राप्त होऊ शकतील. जनसंपर्क वाढून नव्या ओळखीचा फायदा होऊ शकेल. कौटुंबिक समस्यातून मुक्ती मिळू शकेल. अडकलेली कामे मार्गी लागू शकतील. आर्थिक आघाडी मजबूत राहू शकेल. जमा-पूंजी वृद्धिंगत होऊ शकेल.