Surya Grahan 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 16:31 IST2025-09-17T16:26:49+5:302025-09-17T16:31:35+5:30

Surya Grahan 2025: Solar Eclipse 2025: वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण(Solar Eclipse 2025) २१ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता सुरु होणार असून पहाटे ३.२३ मिनिटांनी संपणार आहे. त्या दिवशी सर्वपित्री अमावस्या आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नसले तरी त्याचा प्रभाव ६ राशींवर होईल असे ज्योतिषांचे म्हणणे आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, हे सूर्यग्रहण बुध राशीच्या कन्या आणि पूर्वभाद्रपद नक्षत्रात होत आहे. सूर्यग्रहणाचा परिणाम थेट देश, जग आणि मानवी जीवनावर पडतो. ज्योतिषांच्या मते, २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाचा परिणाम पुढील काही महिने दिसून येईल. त्यामुळे अनेक राशींनाही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याबद्दल जाणून घेऊ.

वृषभ : या सूर्यग्रहणाच्या परिणामामुळे वृषभ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात सावधगिरी बाळगावी लागेल. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. अनोळखी लोकांकडून धोका संभवतो. अनावश्यक खर्चामुळे आर्थिक गणिते बिघडतील. काही काळ मानसिक आणि शारीरिक ताण जाणवू शकेल.

कर्क : या ग्रहणाचा परिणाम कर्क राशीवर होणार असल्याने, त्यांनी कोणत्याही कामात जोखीम घेणे टाळावे. तूर्तास काही काळ गुंतवणूक थांबवावी, अन्यथा वित्तहानी होऊ शकते. यावेळी नवीन वाहन खरेदी करणे टाळावे. तसेच मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये काळजी घ्यावी.

कन्या : हे सूर्यग्रहण कन्या राशीत होणार आहे, त्यामुळे या दिवशी कोणतेही काम सुरू करू नका. तसेच, अनोळखी लोकांपासून सावध रहा. तुम्हाला पैशांशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते ज्यामुळे पैशाचे नुकसान होऊ शकते.

धनु: आगामी काळ तुम्हाला आर्थिक, मानसिक नुकसान देणारा ठरू शकतो. आरोग्याची काळजी घेतली नाही तर मोठी दुखणी मान वर काढू शकतील. व्यवसायात मोठे नुकसान होऊ शकते. तसेच कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्या अन्यथा सहकाऱ्यांसोबत तणाव निर्माण होऊ शकतो.

मकर : सूर्यग्रहणाचा नकारात्मक परिणाम मकर राशीच्या लोकांवरही होऊ शकेल. या काळात अचानक मोठे निर्णय घेणे टाळा. नातेसंबंधांशी संबंधित गोष्टी घाईघाईने करू नका. कारण लहान वादांमुळे नातेसंबंध बिघडू शकतात. तसेच, आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. पैशाचा खर्च खूप वाढू शकतो.

कुंभ : सूर्यग्रहणाचा परिणाम कुंभ राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर दिसून येईल. पैशांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आरोग्य बिघडू शकते. आयुष्यात थकवा आणि ताणतणाव वाढू शकतो. अचानक पैशांशी संबंधित नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. तसेच, कुंभ राशीच्या लोकांनी रस्ते अपघातांपासून सावधगिरी बाळगली पाहिजे.