शुक्र-शनीचा अर्धकेंद्र योग: ५ राशींचा सुवर्ण काळ, ऐश्वर्य-वैभवाचा अपार लाभ; सुख-सौभाग्य वाढ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:17 IST2024-12-05T13:06:34+5:302024-12-05T13:17:54+5:30
हा योग अत्यंत शुभ मानला जातो. भाग्यवान राशी कोणत्या? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, अनुकूल ग्रह शनी आणि शुक्र ठराविक कालावधीनंतर राशीपरिवर्तन करत असतात. शनी हा सर्वांत मंदगतीचा ग्रह मानला जातो. शुक्र सुमारे २६ दिवसांनी राशीगोचर करतो. अशा स्थितीत अनेक वेळा या ग्रहांचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होऊन दृष्टी किंवा राजयोग तयार होतो.
शुक्र मकर राशीत विराजमान झाला असून, या महिन्याच्या अखेरीस कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी मकर राशीत असलेला शुक्र आणि कुंभ राशीतील शनी यांचा अर्धकेंद्र दृष्टी योग तयार होत आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो.
या योगाचा अनेक राशींना लाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. तसेच शुक्राचा गुरु ग्रहासोबत नवमपंचम योग, तर मंगळ ग्रहासोबत समसप्तक योग जुळून येत आहे. शुक्र आणि शनीचा अर्धकेंद्र दृष्टी योग कोणत्या राशींना अनुकूल सकारात्मकता देणारा ठरू शकेल? जाणून घेऊया...
मेष: शुभ सिद्ध होऊ शकेल. आर्थिकदृष्ट्या मजबूत स्थितीत असाल. प्रलंबित पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये फायदा मिळू शकेल. व्यावसायिकांना नफा मिळेल. नवीन संपर्क निर्माण होतील. सामाजिक वर्तुळ वाढेल. प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. प्रगती आणि आर्थिक लाभ होऊ शकतील.
वृषभ: अध्यात्माकडे जास्त कल असेल. तीर्थक्षेत्रांना भेट देऊ शकता. नोकरीच्या अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे. आनंदी आणि समाधानी दिसू शकता. व्यवसायात फायदा होऊ शकतो. प्रवासातून यश आणि आर्थिक लाभ मिळू शकतात. जास्त खर्च होऊ शकतो.
कन्या: हा योग फलदायी ठरू शकतो. दीर्घकाळ प्रलंबित असलेले काम पुन्हा एकदा सुरू होऊ शकते. एखाद्या कामात खूप दिवस मेहनत करत असाल तर यश मिळू शकते. नोकरीत भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून भरपूर नफा कमावू शकता. शनिदेवाच्या कृपेने यशासोबतच आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल.
कुंभ: शुक्र-शनीचा योग फायदेशीर ठरू शकतो. कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकतात. कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. करिअरवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. व्यवसायात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजी घ्यावी. आर्थिक स्थिती चांगली राहील.
मीन: मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतील. कामाच्या ठिकाणी मेहनतीचा आणि क्षमतेचा पुरेपूर फायदा मिळेल. भागीदारीत काम करणाऱ्या लोकांना भागीदारांशी चांगले संबंध राखण्यात यश मिळेल. व्यवसायात योजना यशस्वी होतील. आयुष्यात एकटेपणा कमी होईल.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.