Navratri 2021 Astrology: नवरात्रोत्सवात ‘या’ ९ राशीच्या व्यक्तींवर राहील देवीची विशेष कृपा; शुभलाभदायक काळ, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 05:36 PM2021-10-07T17:36:14+5:302021-10-07T17:41:57+5:30

Navratri 2021 Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्या राशीच्या व्यक्तींना नवरात्रोत्सव उत्तम लाभदायक आणि देवीची विशेष कृपा असणारा ठरेल, ते जाणून घेऊया...

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी या कालावधीत साजरा केला जाणारा नवरात्रोत्सवाला ७ ऑक्टोबरपासून अगदी उत्साहात सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणच्या मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. देवीच्या उपासनेसाठी हा काळ उत्तम मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्या राशीच्या व्यक्तींना नवरात्रोत्सव उत्तम लाभदायक आणि देवीची विशेष कृपा असणारा ठरेल, ते जाणून घेऊया... (Shardiya Navratri 2021 Astrology)

मेष राशीच्या व्यक्तींना नवरात्राचा कालावधी उत्तम ठरू शकेल. देवीची विशेष कृपा लाभू शकते. विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांचा फायदा होईल. संयम राखणे आणि ध्यानधारणा करणे उपयुक्त ठरू शकेल. विवाहेच्छुकांनी देवीला लाल फूल अर्पण करणे लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

वृषभ राशीच्या व्यक्तींना मनोवांच्छित इच्छांची पूर्तता होऊ शकणारा हा कालावधी ठरू शकेल. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतील. करिअरच्या बाबतीत नवीन संधी उपलब्ध होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नवरात्रीचा काळ शुभ, मंगलकारक ठरू शकेल. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. घरातील ज्येष्ठांच्या सानिध्यात उत्तम वेळ जाईल. देवीच्या कृपेमुळे वाहन खरेदी शक्य होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.

कर्क राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक जीवन सुधारण्यासाठी नवरात्र कालावधीत प्रयत्न करावे लागतील. याचे चांगले फळ आगामी काळात मिळू शकेल. या काळात प्रियकरासोबत फिरायला जाण्याची संधी मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.

सिंह राशीच्या व्यक्तींना या कालावधीत आर्थिक बाजूकडे लक्ष द्यावे लागेल, असे सांगितले जात आहे. तसेच देवीच्या कृपेमुळे आपल्या कार्यक्षेत्रात प्रमोशनचे योग जुळून येऊ शकतील. लव लाइफमध्ये सकारात्मक बदल घडू शकतील.

कन्या राशीच्या व्यक्तींना सतावत असलेली भविष्याची चिंता या नवरात्र कालावधीत दूर होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. आगामी काळात आपल्याला आई किंवा मावशीकडून मिळालेला एखादा मोलाचा सल्ला जीवनासाठी टर्निंग पॉइंट किंवा दृष्टिकोन बदलणारा ठरू शकतो.

तूळ राशीच्या व्यक्तींच्या आरोग्यात सुधारणा होईल. या कालावधीत उपास केल्यास चांगला लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. देवीच्या कृपेमुळे अनामिक भीतीपासून मुक्तता मिळेल. तसेच भाग्याची, नशिबाची साथ मिळू शकेल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना समस्येतून या आगामी नवरात्र काळात मुक्तता मिळू शकते, असे सांगितले जात आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. प्रसन्नता लाभेल. सकारात्मकतेमुळे करिअरमध्ये नवीन संधीचे सोने करू शकाल.

धनु राशीच्या व्यक्तींना नवरात्राचा कालावधी नवीन यशोशिखर गाठणार ठरू शकतो. नोकरीच्या उत्तमोत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. शुभवार्ता आगामी काळात मिळू शकतील. धार्मिक कार्यात सक्रीय सहभाग नोंदवाल, असे सांगितले जात आहे.

मकर राशीच्या व्यक्तींना सर्व क्षेत्रात प्रगतीकारक आगामी काळ ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. धार्मिक कार्ये, पूजा-अर्चा यांमुळे सकारात्मकता मिळू शकते. देवीच्या कृपेमुळे नवरात्रात चांगले परिणाम दिसू येऊ शकतील.

कुंभ राशीच्या व्यक्तींना नवरात्रीचा कालावधीत मान-सन्मान प्राप्त करणारा ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. समाजातील मान वाढेल. व्यवसाय, व्यापार यात यश मिळू शकेल. कुटुंबात धार्मिक कार्याचे आयोजन केले जाऊ शकेल. प्रवासाचे योग संभवतात.

मीन राशीच्या व्यक्तींना नवरात्रात काळात सकारात्मक बदल दिसू शकतील, असे सांगितले जात आहे. आपल्याला इच्छित आणि अपेक्षित बदल घडू शकतील. देवीच्या कृपेमुळे आर्थिक लाभ प्राप्त होऊ शकतील.