शनी उदय: ६ राशींना शुभ फलदायी, नवीन नोकरीची ऑफर; समस्येतून दिलासा, धनलाभाचे योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 03:03 PM2024-02-23T15:03:03+5:302024-02-23T15:03:03+5:30

अस्तंगत अवस्थेत असलेल्या शनीचा मार्च महिन्यात उदय होणार आहे. शनी उदय म्हणजे काय? कोणत्या राशींसाठी फायदेशीर, लाभदायक ठरू शकेल, ते जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला विशेष महत्त्व आहे. शनी हा सर्वांत संथ गतीचा ग्रह आहे. त्याचा प्रभाव जीवनावर दीर्घकाळ असतो. शनीला न्यायदेवता आणि कर्मफलदाता मानले जाते. कुंडलीत शनी शुभ स्थानात असेल तर, अशा व्यक्तीच्या जीवनात सर्व प्रकारचे सुख-समाधान असते. कुंडलीत शनी प्रतिकूल स्थानी असेल तर अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात.

विद्यमान स्थितीत कुंभ राशीत शनी विराजमान आहे. कुंभ राशीचे स्वामित्व शनीकडे आहे. कुंभ राशीत सूर्य आणि शनी एकमेकांपासून अगदी जवळच्या अंशांवर असल्यामुळे सूर्य प्रभावामुळे शनी पृथ्वीवरून दिसणार नाही. यालाच शनी अस्त असे म्हटले जाते. मार्च महिन्यात सूर्य मीन राशीत गेल्यावर सूर्य आणि शनी एकमेकांपासून लांबच्या अंतरावर गेल्यामुळे शनीदर्शन होऊ शकेल, या अवस्थेला शनी उदय झाला असे म्हटले जाते. ०७ मार्च रोजी शनी उदय होणार आहे.

काही मान्यतांनुसार सूर्य आणि शनी पिता-पुत्र असून, ज्योतिषशास्त्रात ते एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जातात. शनीचा उदय होणे महत्त्वाचे मानले जाते. कारण उदय अवस्थेतील शनी अधिक प्रभावकारी मानला गेला आहे. कोणत्या राशींना शनी उदय शुफ फलदायी, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, करिअर यांमध्ये लाभदायी ठरू शकेल? जाणून घेऊया...

मेष: अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता. नोकरदारांना चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. करिअरमध्ये प्रगती शक्य. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली महत्त्वाची कामे पूर्ण होतील. व्यावसायिक जीवनात यश मिळेल. फायदा होईल. वरिष्ठांची मदत मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. बढती मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ: पद आणि प्रतिष्ठा वाढेल. पैशाशी संबंधित योजना यशस्वी होतील. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. प्रलंबित कामे पुन्हा पूर्ण होतील. मेहनतीला यश मिळेल. संपत्ती वाढेल. कामाच्या ठिकाणी प्रगती कराल. आवडीच्या कोणत्याही ठिकाणी बदली होऊ शकते. वैवाहिक जीवनातील तणाव टाळा. वादांपासून दूर राहा.

मिथुन: अत्यंत सिद्ध कारक योग ठरत आहे. त्रास कमी होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना इच्छित संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी अनुभवाचा तुम्हाला चांगला फायदा होईल. व्यवसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. कुटुंबातील सदस्यांचे चांगले सहकार्य मिळेल.

सिंह: व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. व्यवसायातील योजना यशस्वी होतील. आर्थिक लाभाची शक्यता आहे. नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. बँकेचे कर्ज मिळेल.

तूळ: नशिबाची आणि भाग्याची साथ लाभू शकेल. परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. प्रेमात असलेल्यांचे नाते मजबूत होऊ शकेल. कुटुंबातील सामंजस्य सुधारेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नही वाढेल. जोडीदारासोबत बराच वेळ घालवाल.

मीन: खूप दिवसांपासून परदेश दौऱ्यावर जायचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विश्रांतीसाठी थोडा वेळ काढावा.

मार्च महिन्यात शनीसह ५ ग्रहांचे गोचर होत आहे. १८ वर्षांनी बुध-राहु युती योग जुळून येणार आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.