Shani Gochar 2025: शनी गोचर देत आहे मोठ्या संकटाचे संकेत; जगभरात अनेक बाबतीत होऊ शकते उलथापालथ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:36 IST2025-01-08T16:16:23+5:302025-01-08T16:36:50+5:30
Shani Gochar 2025: शनि हा न्यायाची देवता आहे. मात्र शनी दृष्टी वक्र असेल तर अनेक बाबतीत उलथा पालथ होऊ शकते, तेही स्थानिक पातळीवर नाही तर जागतिक पातळीवर. २९ मार्च रोजी होणारे संक्रमण नक्की कोणते संकेत दर्शवत आहे ते पाहू.

भौगोलिक परिणाम :
शनीच्या संक्रमणामुळे भारतातील उत्तरेकडील प्रांत (जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड इ.) तर जगाच्या उत्तर गोलार्धातील उत्तर अमेरिका आणि उत्तर-युरोपीय देश (ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, इ. बेल्जियम, इटली, स्पेन इत्यादी देश आणि उत्तर भागात वसलेल्या रशिया, युक्रेन, इस्रायल, पॅलेस्टाईन इत्यादी देशांमध्ये राजकीय गोंधळ, सत्तापरिवर्तन, आंदोलने आणि हिंसक घटना घडण्याची शक्यता आहे.
२९ मार्च रोजी शनी मीन राशीत स्थलांतर करणार आहे. मीन राशीत शनीच्या संक्रमणाचा प्रभाव फक्त राशींवरच नाही तर देशावर आणि जगावरही दिसून येईल. भारतातील अनेक राज्यांवर शनीच्या दृष्टीचा परिणाम होऊ शकतो. शनीच्या संक्रमणामुळे नैसर्गिक आपत्ती, राजकीय गोंधळ आणि महामारी येण्याची शक्यता असते. यंदा होणारे शनी गोचर अशुभ संकेत देणार आहे का की आणखी काही बदल घडणार, ते जाणून घेऊ.
शनी गोचरचा परिणाम :
२९ मार्च रोजी शनिदेव मीन राशीत प्रवेश करतील. मीन राशीच्या संक्रमण काळात शनि वृषभ, कन्या, धनु, कुंभ, मीन आणि मेष राशीच्या लोकांवर प्रभाव टाकतील. तो प्रभाव संमिश्र स्वरूपाचा असेल. मीन राशीत होणारे स्थलांतर उत्तरेकडे सूचक आहे. पूर, भूस्खलन, महामारी, भूकंप, दुष्काळ, अन्नटंचाई, आग आणि इतर नैसर्गिक आपत्तीचे संकेत दिसत आहेत.
भारतातील राज्य तसेच परदेशात उमटणार पडसाद :
विशेषत: भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये शेती, संपत्ती आणि जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय वृषभ, कन्या आणि धनु राशीवरील प्रभावामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये (बिहार, सिक्कीम, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश) आणि (पंजाब राज्याचे प्रमुख राशिचक्र मीन आहे) मध्ये दुष्काळाजन्य परिस्थिती उद्भवू शकते. राजकीय क्षेत्रात अशांतता निर्माण होऊ शकते. अलीकडेच नवीन विषाणू जगभर डोकं वर काढत आहे. यापूर्वी शनी कुंभ राशीत असताना कोरोना विषाणूने जगभर कहर केला होता. आता शनि कुंभ राशीतून मीन राशीत गेल्याने एक नवीन विषाणू दार ठोठावत आहे. त्यामुळे सतर्क राहणे केव्हाही चांगले!
मकर राशीवर प्रभाव :
शनीची साडे साती मकर राशीच्या लोकांसाठी अंतिम टप्प्यात असल्यामुळे ही अडीच वर्षं आनंदायी ठरतील. या टप्प्यात आर्थिक भरभराट होईल. सुख, समृद्धी, कीर्ती मिळेल. अडलेली कामे मार्गी लागतील. हा काळ आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल.
कुंभ राशीवर प्रभाव :
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीच्या साडे सातीचा सातीचा तिसरा चरण सुरू होईल. अडलेली कामे मार्गी लागतील, तसेच आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांमुळे काही संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल. मन अशांत, अस्थिर राहील. अध्यात्माची कास धरणे सोयीचे ठरेल. मनशांती मिळेल. दान धर्मामुळे शनी पीडा कमी होईल.
मीन राशीवर प्रभाव :
मीन राशीच्या लोकांसाठी तिसरा टप्पा सुरु होईल. हा काळ संमिश्र घटनांचा असेल. आर्थिक लाभ होतील तर काही बाबतीत आर्थिक नुकसानही झेलावे लागेल. यशप्राप्तीसाठी संघर्ष करावा लागेल. नात्यांमध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. भविष्यात चांगल्या संधी तुमचे दार ठोठावतील.
मेष राशीवरील प्रभाव :
२०२५ मध्ये मेष राशीच्या लोकांना या वर्षी शनिची साडेसाती सुरू होणार आहे. मेष राशीच्या लोकांवर शनि द्वादशस्थानी असल्यामुळे शनि साडेसातीचा काही प्रमाणात प्रतिकूल घटनांचा सामना करावा लागेल. या काळात मेष राशीच्या लोकांना उत्पन्नाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागेल. मानसिकदृष्ट्याही अस्वस्थता जाणवेल. याशिवाय शारीरिक कष्ट आणि खर्चात अचानक वाढ होईल.
शनी पीडा टाळण्याचे उपाय :
शनी देव एखाद्या कडक शिस्तीच्या शिक्षकाप्रमाणे वाटत असले तरी, ते अल्प सेवेने प्रसन्न होतात. ही सेवा त्यांची नाही, तर वयाने, अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या व्यक्तींची तसेच गोरगरिबांची! शनी देव शिस्तप्रिय असल्याने प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेले काम निगुतीने करावे असा त्यांचा आग्रह असतो आणि जो ते करत नाही त्याला ते पीडा देतात. त्यामुळे देवाचे नामस्मरण, सेवा, दान धर्म ही त्रिसूत्री आपण आचरणात आणायला हवी.