५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 13:27 IST2025-09-12T13:16:10+5:302025-09-12T13:27:57+5:30

Shani Dev Priya 5 Rashi: अत्यंत प्रिय मानल्या गेलेल्या ५ राशींवर शनि आयुष्यभर वरदहस्त ठेवतो. शनि नेहमी प्रसन्न असतो. भरघोस भरभराट करतो, लाभच लाभ देतो.

Shani Dev Priya 5 Rashi: २९ मार्च २०२५ रोजी नवग्रहांचा न्यायाधीश मानल्या गेलेल्या शनि ग्रहाने आपले स्वामित्व असलेल्या कुंभ राशीतून गुरु ग्रहाचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश केला. आता जून २०२७ पर्यंत शनि मीन राशीत विराजमान असणार आहे. एका राशीत शनि ग्रह सुमारे अडीच वर्ष विराजमान असतो.

शनिचे मीन राशीत गोचर झाल्यानंतर साडेसाती आणि ढिय्या प्रभावाचे चक्र बदलले. आताच्या घडीला कुंभ, मीन आणि मेष राशीची साडेसाती सुरू आहे. कुंभ राशीचा साडेसातीचा तिसरा म्हणजेच शेवटचा टप्पा, मीन राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा आणि मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे.

सिंह आणि धनु या राशींवर आता शनिचा ढिय्या प्रभाव सुरू झाला आहे. शनि कर्मकारक ग्रह मानला गेला आहे. शनिची फळे उशिराने मिळतात, परंतु, भरभरून मिळतात, असे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार शनिच्या ५ अत्यंत प्रिय राशी आहेत. ज्या राशींवर शनिचा आयुष्यभर वरदहस्त असतो. शनि नेहमी प्रसन्न असतो. भरघोस भरभराट करतो, लाभच लाभ देतो. कोणत्या ५ राशी अत्यंत लकी आहेत, ज्या शनिच्या कायम कृपाशील असतात, ते जाणून घेऊया...

वृषभ: या राशीचा स्वामी शुक्र असून, शनिचा मित्र ग्रह मानला जातो. या राशीच्या लोकांवर शनिचा विशेष आशीर्वाद असतो. शनिच्या स्थानातील बदलाचा परिणाम या राशीच्या लोकांच्या जीवनात दिसून येतो. या राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येतात, परंतु ते त्यावर सहजपणे मात करण्यात यशस्वी होऊ शकतात. सुख आणि समृद्धी मिळते. कठोर परिश्रमाने भरपूर यश मिळते. उच्च पदांवर विराजमान होतात. या राशीच्या लोकांना वाहने आणि मालमत्ता यांचे सुख प्राप्त होते. या राशीच्या लोकांना शनि यश, समृद्धी आणि करिअरमध्ये संतुलन प्रदान करतात.

तूळ: तूळ रास शनिची उच्च रास मानली जाते. या राशीच्या लोकांवर शनिचा नेहमीच विशेष आशीर्वाद असतो. तूळ राशीचे लोक स्वभावाने मेहनती, शिस्त प्रिय आणि प्रामाणिक असतात. त्यामुळे शनि या राशीच्या लोकांवर प्रसन्न असतात. शनि कृपेने विविध क्षेत्रात यश मिळते. जीवनात सतत प्रगती होते. सुख, समृद्धी आणि मानसिक शांतता मिळते. जीवनात आनंदाची कमतरता राहत नाही. सर्व संकटे दूर होऊन सौभाग्य प्राप्त होते. प्रबळ इच्छाशक्ती आणि एकाग्रता शक्ती असते. या राशीच्या लोकांना जीवनात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही.

धनु: या राशीचा स्वामी गुरू आहे. शनि आणि गुरू यांच्यात मैत्री आहे. धनु राशीच्या लोकांना शनि नेहमीच आशीर्वाद देतात. शनि धनु राशीच्या लोकांवर कृपा करतो. सुख, समृद्धी, संपत्ती आणि विलासिता मिळते. कठोर परिश्रम करून लोक जीवनात यशस्वी होतात. शनि नेहमीच या राशीच्या लोकांचे रक्षण करतात. या राशीचे लोक त्यांच्या मार्गात येणारी कोणतीही समस्या टाळण्यास सक्षम असतात. या लोकांना धन प्राप्त होते आणि शनि कृपेने कधीही पैशाची कमतरता भासत नाही. करिअर आणि व्यवसायात यश मिळते. शनि कृपेने विशेष लाभ मिळतात.

मकर: या राशीचा स्वामी शनि आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अडचणी आणि संघर्ष येत राहिले तरी त्यांना शेवटी यश निश्चितच मिळते. हे लोक प्रतिकूल परिस्थितीत संयम राखतात. ध्येयांकडे सतत पुढे जातात. या राशीचे लोक शिस्तबद्ध, जबाबदार आणि दूरदृष्टी असलेले असतात. महत्त्वाकांक्षी असतात. कठोर परिश्रम करू शकतात. मोठी ध्येये साध्य करू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत राहते. कालांतराने स्थिरता आणि समृद्धी मिळते. शनि आशीर्वादाने जीवनातील त्रास, मानसिक ताण आणि दुःखांपासून मुक्तता मिळते. आत्मविश्वास वाढतो.

कुंभ: या राशीचा स्वामी शनि आहे. या राशीच्या लोकांचे भाग्य जागृत होते. शनि कृपेने हे लोक त्यांच्या प्रयत्नांमध्ये सतत यश मिळवतात. विविध क्षेत्रात प्रगतीच्या मार्गावर पुढे जातात. या राशीच्या लोकांचे जीवन आनंद, संतुलन आणि सकारात्मक उर्जेने भरलेले असते. मानसिकदृष्ट्या मजबूत राहतात. कठीण काळात परिस्थिती सुधारण्याची क्षमता त्यांच्यात असते. शनि आशीर्वादामुळे त्यांना कायमस्वरूपी यश, आर्थिक संतुलन आणि जीवनात नवीन यश मिळते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.