येत्या शनिवारी शनी अमावस्येला आठवणीने करा 'हा' एक उपाय; दूर होतील अशुभ प्रभाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 07:10 IST
1 / 7यंदा श्रावण अमावस्येची तिथी २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.५५ ते २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३५ पर्यंत असेल. उदय तिथीनुसार अमावस्या २३ ऑगस्ट गृहीत धरली जाईल. ज्यामुळे तिला शनी अमावस्याही(Shani Amavasya 2025) म्हटले जाईल. त्यादिवशी विशिष्ट उपाय केले असता पितृदोष, वास्तू दोष, ग्रह दोषातून सुटका होते. 2 / 7शनी अमावस्या: सनातन धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक गंगेसह पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि ध्यान करतात. अमावस्या ही तिथी पूर्वजांना समर्पित आहे. या तिथीला पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान केल्याने पितृदोषातून मुक्तता मिळते आणि कुटुंबात सुख आणि समृद्धी येते. त्याबरोबरच आणखीही काही उपाय आहेत, जे केले असता अनेक प्रकारचे लाभ होतात. 3 / 7शनी अमावस्येला शनि शी संबंधित उपाय केल्याने शनि दोष, साडेसती आणि धैय्या यांच्या अशुभ प्रभावांपासून मुक्तता मिळू शकते. याबरोबरच शनिकृपा होऊन अडलेली कामे मार्गी लागतात आणि आयुष्यातील कठीण काळात मार्ग मिळणे सोपे जाते.त्यासाठी पुढील उपाय न विसरता करा. 4 / 7शनीच्या अमावस्येच्या दिवशी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली राईच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. जीवनात सुख आणि संपत्ती वास करते असे मानले जाते. पिंपळाच्या झाडावर ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे वास्तव असते असे मानले जाते. त्यामुळे या त्रयींची पूजा त्या निमित्ताने केली जाते. 5 / 7शनि अमावस्येला शनि देवाला राईचे तेल अर्पण करा. जर शनि देवाची मूर्तीच्या रूपात पूजा केली जात असेल तर फक्त त्यांच्या पायाच्या अंगठ्यावर तेल अर्पण करा आणि जर शनि देव शनी शिंगणापुरासारखे शिळेच्या रूपात स्थापन केले असतील तर संपूर्ण शिळेवर तेल अर्पण करता येते.6 / 7या तिथीला मोहरीचे तेल, काळे तीळ, उडीद डाळ आणि लोखंडी वस्तू दान करा. तसेच गरिबांना खाऊ घाला आणि त्यांना कपडे, बूट, छत्री, पैसे इत्यादी दान करा. शनी देव त्यांच्यावर कृपा करतात, जे स्वार्थ दूर ठेवून सर्वांना यथाशक्ती मदत करतात. सेवा, दानधर्म, कर्तव्यपूर्ती हे शनी महाराजांचे आवडते गुण आहेत. 7 / 7शनीच्या त्रासांपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बजरंगबलीची पूजा करणे. असे मानले जाते की शनिदेव हनुमान भक्तांना कधीही त्रास देत नाहीत. कारण ते दोघेही मित्र आहे. एका कथेनुसार शनी देव स्वतः म्हणाले होते, जे कोणी हनुमानाची पूजा करतील ते माझ्या अर्थात शनी कोपापासून दूर राहतील. त्यांच्यावर सदैव शनिकृपा होईल.