By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:59 IST
1 / 5शनी हा परीक्षा बघणारा तर सूर्य हा भाग्याला लकाकी देणारा ग्रह. जेव्हा या दोघांचा संयोग होतो, तेव्हा निश्चितच शुभ फळ मिळते. या संयोगाचा बाराही राशींवर प्रभाव पडणार आहे. म्हणून ज्योतिष अभ्यासकांनी एक साधा सोपा उपाय दिला आहे, जेणेकरून या दुर्लभ संयोगाचे शुभ फळ जातकांना मिळू शकेल. त्याबद्दल अधिक जाणून घेऊ. 2 / 5२९ मार्च रोजी शनिवार आहे आणि त्याच दिवशी शनी अमावस्या (Shani Amavasya 2025) आणि सूर्य ग्रहण(Solar eclipse 2025)आहे. यादिवशी शनी देव स्वतःच्याच कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. स्वराशीतच हे स्थलांतर असले तरी त्यामुळे इतर राशींच्या जीवनात अनेक बदल घडणार आहे. मुख्यत्त्वे मकर राशीची साडेसाती संपून मेष राशीची साडेसाती सुरु होणार आहे. 3 / 5शनी आणि सूर्य यांच्या एकत्रित प्रभावासाठी २९ मार्च ची सायंकाळ अतिशय महत्त्वाची आहे. त्यादिवशी ठीक ८. १८ मिनिटांनी पुढील उपाय करायचा आहे. शनी अमावस्यां असल्याने हा उपाय सायंकाळीच करायचा आहे. त्यासाठी ८.१८ मिनिटांची वेळ निवडण्याचे कारण म्हणजे ८ हा शनी देवाचा अंक आहे ता १ हा सूर्यदेवाचा. त्यामुळे ही वेळ चुकवू नका आणि पुढील उपाय करा. 4 / 5या दुर्लभ संयोगावर रात्री ठीक ८.१८ मिनिटांनी आपल्या घराच्या प्रवेश द्वारावर अर्थात उंबरठ्याजवळ एक कणकेचा दिवा लावा आणि त्यात चार दिशेला चार वाती लावा. तो दिवा प्रज्वलित करा आणि शनी देवाची पूजा करा. येत असल्यास शनी स्तोत्र म्हणा, रवीस्तुती म्हणा किंवा ऐका. 5 / 5घरात मंगलमयी गोष्टी घडाव्यात यासाठी ज्योतिष अभ्यासकांनी हा उपाय सुचवला आहे. चार दिशेला चार वाती लावल्यामुळे चारही दिशांनी येणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शुभ वार्ता घडण्यास सुरुवात होईल. शनिदेवाची आणि सूर्यदेवाची कृपा होऊन तुमचे आयुष्य बदलून जाईल आणि मंगलमयी गोष्टींची सुरुवात होईल. त्यासाठी दिलेला उपाय नक्की करून बघा.