समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:21 IST2025-07-29T15:06:31+5:302025-07-29T15:21:15+5:30
जुलै महिन्याची सांगता होताना काही शुभ योग जुळून आले असून, त्याचा अनेक राशींना सर्वोत्तम लाभ, फायदा होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

जुलै महिन्याची सांगता होत आहे. ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. जुलै महिन्याची सांगता होताना काही शुभ योग जुळून आलेले आहेत. मंगळ ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केला आहे. सिंह राशीतील केतुशी युती योग आणि कुंभ राशीतील राहु यांच्याशी असलेला मंगळ ग्रहाचा समसप्तक योग यामुळे समाप्त झाला आहे. तसेच शनि ग्रहाशी असलेला षडाष्टक योगही संपला आहे.
मंगळ, राहु-केतु आणि शनि यांच्या या अशुभ योगांची सांगता झाली असली, तरी मंगळ ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केल्यावर मीन राशीतील शनिशी समसप्तक योग जुळून आलेला आहे. तसेच सूर्य आणि वरुण यांचा नवमपंचम योग सुरू असल्याचे म्हटले जात आहे.
शुक्र ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केल्यावर, याच राशीत असलेल्या गुरु ग्रहाशी गजलक्ष्मी योग जुळून आलेला आहे. गुरु आणि शुक्र एकमेकांचे शत्रू ग्रह मानले गेले असले, तरी शुभ राजयोगाचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जाते.
मेष: दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पुन्हा एकदा सुरू होऊ शकते. जमीन, इमारत, वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कुटुंबातील वाद संपू शकतात. समस्या संपू शकते. रिअल इस्टेटमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आहे त्यांना खूप फायदे मिळू शकतात. परदेशात सुरू असलेल्या व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आयात-निर्यात व्यवसायात खूप चांगले परिणाम दिसणार आहेत.
मिथुन: आत्मविश्वास वाढेल. संपत्तीचा लाभ मिळू शकेल. नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकता. समाजात प्रतिष्ठा वाढेल. काम आणि व्यवसायात प्रगती मिळू शकेल. जे नवीन नोकरी शोधत आहेत त्यांना नोकरी मिळू शकते. सुखसोयी आणि सुविधा वाढतील. कोणतेही प्रलंबित पेमेंट मिळू शकते किंवा पैशाचा नवीन स्रोत निर्माण होऊ शकतो.
कर्क: ज्ञान वाढेल. कारकिर्दीत अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतील. कारकिर्दीत याचे फायदे दिसतील. या काळात नियोजित योजना यशस्वी होऊ शकतील. आदर आणि मान-सन्मान मिळेल. प्रतिष्ठा वाढू शकेल. अचानक आर्थिक लाभ होईल. सहकार्य मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक स्थिती सुधारू शकेल.
सिंह: भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकेल. मानसिक शांतता लाभू शकेल. धैर्य आणि शौर्य वाढेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगले प्रदर्शन करू शकाल आणि लोकांकडून प्रशंसा मिळेल. काही महत्त्वाच्या लोकांशी भेट होऊ शकते. संवाद शैली अधिक प्रभावी होऊ शकेल. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुमची छाप सोडू शकाल. सर्जनशीलता आणि बौद्धिक क्षमतेचा वापर करून नवीन संधी मिळू शकतात.
तूळ: कष्टाचे फळ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी कष्टाचे कौतुक होईल. सरकार आणि प्रशासनाच्या कामात चांगले परिणाम दिसू शकतात. मुलांकडून काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. विविध पातळ्यांवर यश मिळू शकेल. समाजात आदर आणि सन्मान वेगाने वाढू शकतो. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. प्रवास, पर्यटन किंवा परदेशी व्यापारातून चांगले उत्पन्न मिळवू शकता. परदेशात काम करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
वृश्चिक: शुभ काळ ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. आर्थिक स्थिती चांगली होऊ शकेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. नफा मिळण्यासोबतच तुम्हाला मुलांकडूनही चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिक मोठे व्यवसाय करार करू शकतात. भविष्यात फायदा होऊ शकेल.
धनु: वैवाहिक जीवन उत्तम राहू शकेल. अविवाहित लोकांना या वेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. जोडीदाराला पदोन्नती मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. कारकिर्दीत फायदे मिळू शकतील. अधिकाऱ्यांशी ओळख वाढेल.
मकर: जमीन, घर, प्रवास किंवा रिअल इस्टेटमधून नफा मिळू शकतो. परदेशात आयात-निर्यात व्यवसायात नफा मिळू शकतो. खर्च वाढू शकतात. परंतु हा खर्च चांगल्या कामासाठी होऊ शकेल. मालमत्ता खरेदी करू शकता. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात कोणत्याही प्रकारचा वाद टाळावा.
कुंभ: अनेक समस्या संपू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप भाग्यवान ठरू शकतो. नवीन नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो. पगारवाढीसोबतच चांगली बढती मिळू शकते. सहकाऱ्यांसोबत संबंध चांगले राहतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.