गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 07:07 IST2025-08-08T07:07:07+5:302025-08-08T07:07:07+5:30
Raksha Bandhan 2025 Gaj Laxmi Saubhagya Yoga Numerology: रक्षाबंधनाला अतिशय शुभ योग जुळून येत असून, याचा अनेक मूलांकाना सर्वोत्तम लाभ, भरघोस भरभराट आणि सुख-सुबत्ता-समृद्धीची संधी प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जात आहे. तुमचा मूलांक कोणता?

Raksha Bandhan 2025 Gaj Laxmi Saubhagya Yoga Numerology: ऑगस्ट महिन्यात अनेक शुभ योग, राजयोग जुळून येत आहेत. मराठी वर्षातील चातुर्मास काळ सुरू असून, अनन्य साधारण महत्त्व असलेला श्रावण मास सुरू आहे. आताच्या घडीला गजलक्ष्मी राजयोग जुळून आलेला आहे. या योगाचा अनेक मूलांकांना चांगला लाभ, नफा, फायदा होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते.
शनिवार, ०९ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनाचा मोठा सण आहे. संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा सण अगदी उत्साहात साजरा केला जातो. ग्रहमानाची अनुकूलता लाभली, तर हाच उत्साह, आनंद द्विगुणित होऊ शकतो. गजलक्ष्मी राजयोग आणि सौभाग्य योगात रक्षाबंधन सण साजरा होत आहे. या दिवशी श्रवण नक्षत्रही असणार आहे. या सर्वांचा कोणत्या मूलांकावर कसा प्रभाव असू शकतो, ते जाणून घेऊया...
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. काही समस्या, आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. गैरसमज टाळा. कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे. जुने रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करू शकाल. जीवनात यशाच्या मार्गावर पुढे जाल. आर्थिक बाबतीतही शुभ प्रगती होण्याची शक्यता आहे. धनलाभाचे योग आहेत.
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. नोकरी, व्यवसायात यश प्रगतीची संधी मिळू शकेल. समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. अचानक खर्च वाढू शकेल. संयम राखावा. व्यवहारी राहून कठीण परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकाल. कालांतराने जीवनात आनंद, समृद्धी येऊ शकेल. नवीन संधी मिळतील.
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. दीर्घकालापासून अडकलेले काम मार्गी लागू शकेल. समस्येतून दिलासा मिळू शकेल. कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल. धनवृद्धी होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन गुंतवणूक झाल्यामुळे मन उत्साही राहू शकते. पैशाची आवक होण्याची चांगली शक्यता निर्माण होत आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. महत्त्वाचे प्रकल्प वेळेवर पूर्ण होऊ शकतील.
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. आश्चर्यकारक घटना घडू शकतात. सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतात. विवाहेच्छुकांना चांगले स्थळ येऊ शकते. कामाच्या ठिकाणी काही समस्या येऊ शकतात. कौशल्याने परिस्थिती हाताळणे फायदेशीर ठरेल. व्यवसायाच्या बाबतीत संयमाने निर्णय घेणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीची विशेष मदत मिळू शकेल.
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. अत्यंत अनुकूल काळ आणि सर्वोत्तम संधींचे सोने केले तर अनेकविध लाभ प्राप्त करू शकाल. जुना मित्र मदतीला धावून येऊ शकेल. परंतु, अतिपरिचयात अवज्ञा होणार नाही, याची काळजी घ्यावी. धनवृद्धीचे शुभ योग असतील. पैशाची आवक वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सुधारेल. प्रकल्प वेळेवर पूर्ण होऊ शकतील.
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. ग्रहमानाचा प्रतिकूल परिणाम प्राप्त होऊ शकेल. आता आव्हाने वाटत असली तरी कालांतराने काळ अनुकूल होऊ शकेल. कुटुंबातील सदस्यांचे संपूर्ण समर्थन प्राप्त होऊ शकेल. कामाच्या बाबतीत काळजीपूर्वक विचार करून कोणताही निर्णय घ्यावा. योग्य दिशा मिळविण्यासाठी संयम ठेवावा. व्यवहारी राहिल्याने परिस्थिती सुधारेल.
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी तुमच्या मताचा विचार केला जाऊ शकतो. कामाशी संबंधित वरिष्ठांची चर्चा करू शकता. अतिरिक्त खर्च होऊ शकतात. आर्थिक बाबींमध्येही हळूहळू प्रगती होऊ शकते. आर्थिक लाभ होण्याची चांगली शक्यता आहे.
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. अप्रत्यक्षपणे अतिशय महत्त्वाचा सल्ला मिळू शकतो. जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतो. बदलांकडे सकारात्मकतेने पाहणे हिताचे ठरू शकेल. आर्थिक बाबतीत नफा मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. तरच आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन आनंदी राहील. उत्साह वाढेल.
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. जोखीम पत्करून कामे करणे किंवा निर्णय घेणे टाळावे. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्यावा. प्रवास लाभदायक ठरू शकतील. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. आर्थिक बाबींमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. पैशाशी संबंधित प्रवास आर्थिक लाभ मिळवू शकतात. व्यवसायात पैसे गुंतवून तुम्हाला नफा मिळविण्याच्या नवीन संधी मिळू शकतात.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.