Planetary Position July 2021: जुलै महिन्यात ‘हे’ ४ ग्रह करणार राशीपरिवर्तन; कसा होणार लाभ? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 09:50 PM2021-06-28T21:50:06+5:302021-06-28T21:55:59+5:30

Planetary Position July 2021: जुलै महिन्यात नवग्रहातील चार महत्त्वाचे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणार आहेत.

ज्योतिषशास्त्रात नवग्रहातील सगळे ग्रह नियमित कालांतराने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. काही वेळा हेच ग्रह वक्री चलनाने विद्यमान राशीतून मागच्या राशीत जातात. (Planetary Position July 2021)

नवग्रहांचा राजा सूर्य आणि मनकारक चंद्र हे दोन ग्रह कधीही वर्की होत नाहीत. तर, नवग्रहातील राहु आणि केतु हे दोन ग्रह कायम वर्की चलनानेच राशीपरिवर्तन करत असतात.

नवग्रहातील सर्व ग्रहांचा एखाद्या राशीत स्थानापन्न असण्याचा काळ निश्चित आहे. शनी हा ग्रह सर्वाधिक काळ, तर चंद्र हा सर्वांत कमी काळ एका राशीत विराजमान असतो.

जुलै महिन्यात नवग्रहातील चार महत्त्वाचे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणार आहेत. सर्वप्रथम नवग्रहांचा राजकुमार मानल्या गेलेला बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. (these 4 planets will change their position in july 2021)

यानंतर नवग्रहांचा राजा सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तसेच कर्क संक्रांतीच्या दुसऱ्याच दिवशी शुक्र सूर्याचे स्वामीत्व असलेल्या सिंह राशीत विराजमान होईल.

शुक्राच्या सिंह प्रवेशानंतर जुलै महिन्याच्या उत्तरार्धात मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या चारही ग्रह मार्गी चलनाने राशीपरिवर्तन करणार असून, सर्व राशींच्या व्यक्तींवर याचा प्रभाव पडेल, असे सांगितले जात आहे.

बुद्धिकारक आणि नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ७ जुलै २०२१ रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर २५ जुलै २०२१ रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत जाईल. या राशीपरिवर्तनाचा लाभ या दोन्ही राशीच्या व्यक्तींना होईल, असे सांगितले जात आहे.

नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १६ जुलै २०२१ रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या या राशी संक्रमाणाला कर्क संक्रांत असेही म्हटले जाते. कर्क ही चंद्राचे स्वामीत्व असलेली रास आहे. या राशीपरिवर्तनाचा करिअरच्या दृष्टीने लाभ होईल. नोकरदार वर्गाला फायदा मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.

कर्क संक्रांतीनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी १७ जुलै २०२१ रोजी शुक्र सूर्याचे स्वामीत्व असलेल्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी हा कालावधी उत्तम ठरू शकेल. तर काही राशीच्या व्यक्तींच्या पदरी निराशा पडू शकेल, असे सांगितले जात आहे.

जुलै महिन्याच्या उत्तरार्धात २० जुलै रोजी नवग्रहातील उग्र मानला गेलेला मंगळ ग्रह सूर्याचे स्वामीत्व असलेल्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ६ सप्टेंबरपर्यंत मंगळ सिंह राशीत विराजमान असेल.