Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 17:25 IST2025-12-23T17:02:42+5:302025-12-23T17:25:59+5:30
Palmistry: हस्तरेषा शास्त्रानुसार, अंगठ्याच्या खालच्या भागाला 'शुक्र पर्वत' असे म्हणतात. हा पर्वत जितका उठावदार आणि ठळक रेषांचा असेल, तितके त्या व्यक्तीचे आयुष्य सुख-सुविधांनी भरलेले असते. तुमच्या हातावरील शुक्र पर्वताची स्थिती तुमच्या वैवाहिक आयुष्याबद्दल काय संकेत देते, ते पाहू.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा आणि कलाटणी देणारा टप्पा. जोडीदाराची साथ चांगली लाभली तर आयुष्य समृद्ध होते आणि नाही लाभली तर सगळे काही मिळूनही खडतर जीवन वाट्याला येते. याबाबतीत आपल्या भाग्यात काय आहे हे हस्त रेषेवरून जाणून घेता येते. कसे ते पाहू.

१. उठावदार आणि गुलाबी शुक्र पर्वत
ज्या लोकांच्या हातावर शुक्र पर्वत चांगल्या स्थितीत (उठावदार) आणि गुलाबी रंगाचा असतो, ते लोक खूप आकर्षक आणि रोमँटिक स्वभावाचे असतात. अशा लोकांचे वैवाहिक आयुष्य खूप सुखद असते. त्यांना आयुष्यात सर्व प्रकारच्या भौतिक सुख-सोयी (लक्झरी लाईफ) मिळतात.

२. शुक्र पर्वतावर 'जाळे' असणे
जर शुक्र पर्वतावर अनेक रेषा एकमेकांना छेदून जाळ्यासारखी आकृती (Net pattern) तयार करत असतील, तर ते शुभ मानले जात नाही. असे लोक प्रेमाच्या बाबतीत थोडे गोंधळलेले असतात. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सतत काही ना काही तणाव राहू शकतो किंवा त्यांना जोडीदाराकडून अपेक्षित सुख मिळत नाही.

३. शुक्र पर्वतावर 'तिळ' असणे
शुक्र पर्वतावर काळा तिळ असणे हे प्रेमसंबंधांत अडथळे येण्याचे लक्षण मानले जाते. अशा व्यक्तींना बदनामीचा सामना करावा लागू शकतो किंवा त्यांच्या प्रेमविवाहात (Love Marriage) घरच्यांचा विरोध असू शकतो.

४. शुक्र पर्वतावर 'त्रिकोण' किंवा 'चौकोन'
जर शुक्र पर्वतावर त्रिकोणाचे (Triangle) चिन्ह असेल, तर ती व्यक्ती खूप चोखंदळ आणि कलेची आवड असणारी असते. तसेच, चौकोनाचे (Square) चिन्ह असणे खूप शुभ मानले जाते, कारण ते कोणत्याही मोठ्या संकटापासून किंवा बदनामीपासून तुमचे रक्षण करते.

५. शुक्र पर्वत दबलेला असणे
जर शुक्र पर्वत दबलेला किंवा सपाट असेल, तर अशा व्यक्तींच्या आयुष्यात उत्साहाची आणि ऊर्जेची कमतरता असते. त्यांना प्रेम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो आणि वैवाहिक जीवनातही निरुत्साह जाणवू शकतो.

















