शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 13:31 IST

1 / 6
७ मूलांक असलेल्या व्यक्ती अंकशास्त्राच्या दृष्टीने दिव्य दृष्टी प्राप्त झालेले असतात. त्यांनी स्वतःच्या अंतर्भूत शक्तीचा वापर केला तर त्यांना भविष्यात घडणाऱ्या अशा गोष्टी ज्ञात होऊ शकतात ज्या सर्वसामान्यांना लवकर उमगत नाहीत. ज्याला आपण सिक्स्थ सेन्स म्हणतो, तो या लोकांचा पॉवरफुल असतो.
2 / 6
हे लोक आध्यात्मिक असतात, सश्रद्ध असतात आणि त्यांची विचार करण्याची व चिंतन करण्याची क्षमता खूप तीव्र असते. तसेच, त्यांची देवावर अपार श्रद्धा असते. हे लोक दिवसभरात न विसरता आपल्या आराध्य देवतेची आवर्जून उपासना करतात.
3 / 6
या लोकांची नजर तीक्ष्ण असते आणि ते कायम सावध असतात. सहसा त्यांची कोणीही फसवणूक करू शकत नाही.लोकांना ओळखण्यात ते चुकत नाहीत. भविष्यात होऊ शकणाऱ्या गोष्टींचा त्यांना आधीच अंदाज येतो त्यामुळे ते कायम सतर्क असतात.
4 / 6
या लोकांना एक सवय असते आणि ती म्हणजे माहितीची भूक. त्यांना अर्धवट माहिती देणारे व अर्धवट ज्ञान असणारे लोक आवडत नाहीत. त्यांचा भर पूर्णत्त्वावर असतो. एखादी गोष्ट शिकायची ठरवली तर ते अथ पासून इति पर्यंत शिकतात आणि विषयाचा छडा लावतात. त्यामुळे ते कोणत्याही विषयात तरबेज होतात.
5 / 6
७ क्रमांकाच्या लोकांच्या आयुष्यात एक गोष्ट कमी असते ती म्हणजे ते नातेसंबंधांमध्ये अडकत नाहीत, रमत नाहीत. कुटुंब, मित्र परिवार असूनही त्यांना कोणावरही विश्वास ठेवणे आवडत नाही, त्यामुळे ही मंडळी अलिप्त स्वभावाची असतात.
6 / 6
मात्र, या लोकांनी एखाद्याशी मैत्री केली तर ते ती शेवट्पर्यंत निभावतात. सहसा कोणाला धोका देत नाहीत आणि कोणाकडून धोका मिळालेला सहनही करत नाहीत. त्यामुळे त्यांनी केलेली नात्यांची निवड अचूक ठरते.
टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष