मार्गशीर्ष गुरुवारी एकादशी: ५ मूलांकांना कार्यात सफलता; बक्कळ लाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 08:13 IST2024-12-24T07:59:40+5:302024-12-24T08:13:00+5:30
Numerology: शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आणि सन २०२४ मधील शेवटची एकादशी कोणत्या मूलांकांसाठी अतिशय शुभ, लाभदायी आणि सर्वोत्तम ठरू शकेल? जाणून घ्या...

Numerology: डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा विशेष ठरणार आहे. सन २०२४ या वर्षाची सांगता होत आहे. या अखेरच्या आठवड्यात मार्गशीर्ष गुरुवारी सफला एकादशी असून, हा अत्यंत शुभ, पुण्य फलदायी योग मानला गेला आहे. तसेच गुरुवार हा दत्तगुरुंना समर्पित असल्यामुळे या दिवशी दत्तगुरु, दत्तावतारांचे विशेष पूजन लाभदायी मानले गेले आहे. विशेष म्हणजे २६ डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे.
मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी देवीचे विशेष व्रतपूजन केले जाते. शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी देवीचे विशेष पूजन, नामस्मरण, स्तोत्र पठण करणे पुण्यदायी मानले गेले आहे. तसेच या गुरुवारी सफला एकादशीचे व्रताचरणही केले जाणार आहे. सन २०२४ मधील ही शेवटची एकादशी आहे. त्यामुळे एकाच दिवशी लक्ष्मी-नारायणासह दत्तगुरुंचे सर्वोत्तम शुभाशिर्वाद प्राप्त करण्याची सुवर्ण संधी आहे.
ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते. एकंदरीत ग्रहस्थिती पाहता कोणत्या मूलांकासाठी शेवटचा आठवडा आणि मार्गशीर्ष गुरुवारी सफला एकादशीचा आलेला योग कसा असू शकेल? आर्थिक आघाडी, गुंतवणूक, करिअर या क्षेत्रांवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. आर्थिक दृष्टिकोनातून काळ अनुकूल राहील. धनलाभाच्या शुभ संधी मिळतील. गुंतवणुकीतून नफा मिळेल. कार्यक्षेत्रात अचानक यश मिळण्याची शक्यता आहे. सुख-समृद्धीची शुभ शक्यता निर्माण होत आहे.
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. आर्थिक आघाडीवर लाभ होऊ शकेल. गुंतवणुकीबाबत चिंता कमी होईल. कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्पामुळे मन खिन्न होऊ शकेल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. भेटवस्तू मिळू शकते. प्रेमात मिळणारा आनंद कदाचित अपेक्षेपेक्षा कमी असेल, पण तरीही वेळ चांगला जाईल. आर्थिक स्थिती सुधारू शकेल.
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. कार्यक्षेत्र आणि आर्थिक आघाडीसाठी अनुकूल काळ राहू शकेल. गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घेतल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो. कार्यक्षेत्रात हळूहळू यश मिळेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकेल. प्रेमसंबंधांमध्ये ताकद आणि आनंद राहील.
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. कामात हळूहळू प्रगती होईल. यश मिळेल. पण खर्च वाढतील. खरेदीसाठी अधिक पैसे खर्च होतील. काही कारणास्तव मन प्रसन्न राहणार नाही. परस्पर समंजसपणा कमी होईल. प्रियकराशी मतभेद होऊ शकतात.
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. कामात यश मिळेल. ध्येय पूर्ण कराल. प्रेम जीवनात आनंद राहील. खर्च जास्त असू शकतो. गुंतवणुकीकडे लक्ष देण्याची गरज आहे. भेटवस्तू मिळू शकते. वेळ अनुकूल राहील. प्रगती होईल.
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. खर्च वाढू शकतो. त्यामुळे बजेटकडे लक्ष द्यावे लागले. संतुलन राखल्यास चांगले परिणाम मिळतील. जोडीदारामध्ये प्रेम वाढेल. नात्यात नवीन ताजेपणा अनुभवायला मिळेल.
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. विचारपूर्वक अन् शहाणपणाने निर्णय घ्यावे. प्रेमात पुढचा विचार केलात तर बरे होईल. नाते घट्ट होईल. निष्काळजीपणामुळे खर्च वाढू शकतो. कामाबाबत थोडी निराशा होऊ शकते. चर्चा करून वाद सोडवा. भविष्याचे नियोजन फायदेशीर ठरेल. आर्थिक बाबतीत सावध राहावे.
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल. सन्मान वाढेल. यश मिळण्याच्या अनेक संधी मिळतील. हुशारीने गुंतवणूक केली तर भविष्यात फायदा होईल. कामात प्रगती दिसून येऊ शकेल.
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. मोठे बदल होतील. आर्थिक आघाडीसाठी काळ अनुकूल आहे. भागीदारीत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. जीवनात सुख-शांती अनुभवाल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.