Numerology: ‘या’ ४ मूलांकांना लाभच लाभ, धनलक्ष्मीची कृपा; वरदान काळ, पद-पैसा वाढेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 12:30 IST2024-12-09T12:17:33+5:302024-12-09T12:30:43+5:30
गजकेसरी योगाचा कोणत्या मूलांकांना लाभ मिळू शकेल? जाणून घ्या...

Numerology: ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते.
डिसेंबर महिन्याचा आगामी काळ अतिशय उत्तम, शुभ आणि वैविध्याने नटलेला आहे. मोक्षदा एकादशी, गीता जयंती, प्रदोष आणि दत्त जयंती आहे. शुभ संयोगांमुळे याचे महत्त्व वाढले असून, याचा केवळ राशी नाही तर मूलांकांवरही प्रभाव पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
या काळात गजकेसरी योग जुळून येत आहे. गजकेसरी योगाचा काही मूलांकांना उत्तम लाभ मिळू शकेल. कार्यक्षेत्र, कुटुंब, गुंतवणूक, आर्थिक आघाडी यामध्ये सकारात्मक अनुकूलता प्राप्त होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. भाग्य साथ देईल. आर्थिक बाबतीत सतर्क राहणे हितावह ठरेल. मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. बोलण्यामुळे एखाद्याचे मन दुखावले जाऊ शकते. परंतु, कार्यक्षेत्रात उत्तम यश मिळवू शकाल. हाती घेतलेली कामे पूर्ण होऊ शकतील.
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. आर्थिक लाभासाठी अनुकूल कालावधी आहे.संपत्तीत वाढ होण्याच्या शुभ संधी निर्माण होऊ शकतील. संयमाने गुंतवणूक केल्यास यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नेटवर्किंगच्या माध्यमातून प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतील. कुठेतरी अडकलेले पैसेही मिळू शकतात.
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. एक नवीन सुरुवात जीवनात आनंद आणि समृद्धीचा एक शुभ संयोग घेऊन येऊ शकेल. आर्थिक आघाडीवर त्रास आणि चिंता वाढू शकेल. कामाच्या ठिकाणी भावनिक कारणांमुळे अडचणी वाढू शकतात. आळशीपणामुळे आयुष्यात अडचणी वाढू शकतात.
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. मान-सन्मान वाढेल. नवीन काम दीर्घकाळ लाभ देऊ शकतात. आर्थिक दृष्टिकोनातून वेळ अनुकूल होईल. जितके जास्त लक्ष केंद्रित कराल तितके जास्त पैसे मिळतील. जीवनात आनंद आणि समृद्धी मिळविण्याच्या अनेक संधी मिळतील.
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. आर्थिक दृष्टिकोनातून काळ अनुकूल राहील. आर्थिक लाभासाठी मजबूत परिस्थिती निर्माण होऊ शकेल. गुंतवणुकीबाबत खूप व्यस्त असाल. कामाच्या ठिकाणी अहंकाराचा संघर्ष टाळल्यास चांगले परिणाम दिसून येतील. काही सकारात्मक बातम्या मिळू शकतात.
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. शांत एकांत वेळ घालवायला आवडेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होऊ शकेल. पंरतु, अपेक्षेपेक्षा कमी होईल. आर्थिक बाबतीत खर्च जास्त होऊ शकतो. भावनिक कारणांमुळे खर्च जास्त होईल. जीवनात आनंद आणि समृद्धीचे योग जुळून येऊ शकतील. चर्चेद्वारे प्रश्न सोडवल्यामुळे शांततेचा लाभ घेऊ शकाल.
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. यश मिळाल्याचा आनंद वाटेल. समाधानी राहू शकाल. आर्थिक बाबतीत खर्च जास्त होऊ शकतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. निष्काळजीपणा तुम्हाला अधिक त्रास देऊ शकतो.
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा होऊ शकेल. गुंतवणुकीकडे लक्ष देण्याची गरज आहे. यश मिळेल. कामाच्या ठिकाणी अहंकाराचा संघर्ष वाढू शकतो. शांतपणे कोणताही निर्णय घेतल्यास चांगले होईल. नवीन टप्प्याकडे जाल.
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. कामाच्या ठिकाणी दिलेली आश्वासने पूर्ण होऊ शकतात. या संदर्भात बॅकअप प्लॅन घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल राहील. धनलाभ होऊ शकेल. मेहनतीच्या जोरावर सुख आणि समृद्धी प्राप्त करू शकाल. जीवनात आनंद आणि शांती अनुभवाल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.