बुधचा कर्क प्रवेश: पुढील १५ दिवस ‘या’ ८ राशींना लाभदायी; करिअर, नोकरीत भरभराट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 04:34 AM2022-07-18T04:34:25+5:302022-07-18T04:41:22+5:30

Mercury Transit Cancer 2022: जुलै महिन्यात बुध दुसऱ्यांना रास बदलणार असून, याचा तुमच्यावर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

जुलै महिना बुध ग्रहासाठी विशेष मानला जात आहे. याचे कारण या एकाच महिन्यात बुध तीन राशी बदलणार आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला २ जुलै रोजी बुध वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश केला होता. (mercury transit cancer 2022)

बुध मिथुन राशीत विराजमान असताना, बुधादित्य योगासह लक्ष्मी-नारायणासारखे अद्भूत शुभ योग जुळून आले होते. यानंतर आता बुध मिथुन राशीतून कर्क राशीत गेला आहे. ३१ जुलै रोजीपर्यंत बुध कर्क राशीत विराजमान असेल आणि त्यानंतर बुध पुढच्या सिंह राशीत प्रवेश करेल. (budha gochar in karka rashi 2022)

बुधचा कर्क प्रवेश महत्त्वाचा मानला जातो. बुध हा नवग्रहांमधील राजकुमार मानला जातो. बुध हा माल आणि व्यापार्‍यांचा रक्षक मानला जातो. बुध हा सर्वांत लहान ग्रह असला तरी तो सर्वांत प्रभावशाली मानला जातो. बुधच्या कर्क प्रवेशाचा नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकेल? जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना या काळात नवीन रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला आहे, त्यांनी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी. विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत चांगली वाढ होईल आणि अभ्यासावरही लक्ष केंद्रित केले जाईल.

वृषभ राशीच्या व्यक्ती ज्या विक्री आणि विपणनाशी संबंधित आहेत, त्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. सरकारी सेवेत नोकरी करत आहेत, त्यांच्या करिअरसाठी खूप फायदेशीर काळ ठरू शकेल. या काळात भावंडांशी चांगले संबंध राहतील आणि प्रत्येक कामात पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

मिथुन राशीच्या व्यवसाय करणाऱ्यांच्या योजना फलद्रूप होऊ शकतील. चांगल्या व्यावसायिकांशी ओळखही वाढेल. नशीबाची उत्तम साथ लाभू शकेल. पैसे कमावण्याच्या संधी उपलब्ध होतील. तुमचे कुटुंबाकडे अधिक लक्ष असेल आणि कुटुंबातील सदस्यांसाठी खर्च कराल. पालकांशी तुमचे नाते घट्ट होईल.

बुधचा कर्क राशीत प्रवेश होत असून, या राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. परदेशात जाण्याची संधी मिळू शकेल. अति व्यस्ततेमुळे थकवा जाणवेल. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास प्राधान्य द्यावे. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल आणि नातेही मजबूत होईल.

सिंह राशीच्या नोकरदारांना कमाईच्या चांगल्या संधी मिळतील. मात्र, अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. या काळात तुमच्या आरोग्याची तसेच तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. परदेशात जाण्याची इच्छा असलेल्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचाही बेत आखू शकता.

कन्या राशीच्या व्यक्तींना या काळात व्यवसाय विस्तारण्याची चांगली संधी मिळू शकेल. बाजारात तुमची वेगळी ओळख निर्माण करता येईल. नोकरदारांना सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. त्यांच्याकडून चांगले प्रोत्साहन मिळेल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही सामाजिक कार्यात भाग घ्याल आणि काही नवीन मित्र बनवू शकता.

तूळ राशीच्या व्यक्तींना बुध गोचराचा काळ सकारात्मक ठरू शकेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या आणि लांबच्या प्रवासाला जाण्याची योजनाही बनू शकते. बुधाचे संक्रमण करिअरच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरेल आणि गुंतवणुकीसाठीही वेळ अनुकूल आहे.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आगामी काळ संमिश्र ठरू शकतो. नोकरदार लोकांना चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. वडिलोपार्जित संपत्ती किंवा अन्य स्त्रोतांकडून अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांसोबतच्या गैरसमजामुळे संबंध थोडे बिघडू शकतात. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल परिणाम प्राप्त होऊ शकतात.

धनु राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर आव्हानात्मक ठरू शकेल. या काळात तुम्हाला खूप सावध राहावे लागेल. वादविवादापासून दूर राहावे लागेल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ संमिश्र ठरू शकेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना चांगली बातमी मिळू शकेल. संक्रमण काळात पती-पत्नीमध्ये काही गैरसमज होऊ शकतात, ज्यामुळे संबंध बिघडू शकतात.

मकर राशीच्या व्यक्तींना आगामी काळ संमिश्र ठरू शकेल. या काळात सासरच्या लोकांशी संबंध फारसे चांगले राहणार नाहीत. काही समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. व्यावसायिकांनी सावधगिरीने काम करणे आवश्यक आहे. काही समस्या उद्भवू शकतात. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुम्ही चिंतेत असाल.

कुंभ राशीच्या व्यक्तींना बुध गोचर अनुकूल ठरू शकेल. तुमचे कौशल्य सुधारेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना काही चांगल्या संधी मिळू शकतात. काही गैरसमजामुळे जोडीदाराशी मतभेद वाढू शकतात. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ फारसा अनुकूल नाही.

मीन राशीच्या व्यक्तींना बुधचा कर्क प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळू शकतील. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. जे स्वत:चा व्यवसाय करत आहेत, त्यांना नफा शक्यता निर्माण झाली आहे. जोडीदाराशी संबंध दृढ होतील. पालकांशी चांगले संबंध निर्माण होतील आणि पैशाचे व्यवहार टाळा.