गणपतीपूर्वी बुध मार्गी: ८ राशींवर बाप्पाची कृपा, शेअर बाजारात नफा; लॉटरी लागेल, धनलाभ काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 07:07 AM2023-09-16T07:07:07+5:302023-09-16T07:07:07+5:30

आर्थिक आघाडी आणि करिअरमध्ये सर्वोत्तम लाभ होऊ शकतो. बाप्पासह बुधाचे शुभाशिर्वाद मिळू शकतात, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत असून, नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध हाही सिंह आहे. मात्र, बुध वक्री चलनाने मार्गक्रमण करत होता. आता बुध सिंह राशीत मार्गी होत आहे. अगदी अलीकडे बुध सिंह राशीत उदय झाला होता.

सिंह राशीत बुधाचा उदय होतानाच सूर्याने उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश केला आहे. या नक्षत्राचा सूर्यच स्वामी आहे. मात्र, यातच गणेश चतुर्थीच्या आधी बुध सिंह राशीत मार्गी होत आहे. गणेशोत्सवापूर्वी मार्गी होत असलेला बुध काही राशींसाठी अतिशय शुभ मानला गेला आहे.

१६ सप्टेंबर रोजी बुध मार्गी होत आहे. धन आणि समृद्धी वृद्धीसाठी हा काळ शुभ ठरू शकेल. तसेच गणपती बाप्पाचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतील. बुध आणि गणपती कृपेने काही राशींना आगामी कालावधी लाभदायक, फायदेशीर आणि यश-प्रगतीकारक ठरू शकतो. जाणून घेऊया...

मेष: शुभ परिणाम मिळू शकतील. आर्थिक लाभाच्या रूपात बाप्पाचा आशीर्वाद मिळेल. लोक आदर करतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. करिअरमध्येही काही उत्तम संधी मिळू शकतात. अध्यात्मिक बाबींमध्ये रस असेल. करिअरमध्ये संघर्ष करणाऱ्या लोकांसाठी मार्ग सोपा होईल. पगारही वाढण्याची अपेक्षा आहे. कौटुंबिक सदस्यांसोबत चांगले सामंजस्य प्रस्थापित होईल. आर्थिक लाभ अपेक्षित आहे. ज्यांना कामानिमित्त परदेशात जायचे आहे त्यांना यश मिळण्याची अपेक्षा आहे.

वृषभ: वैयक्तिक, करिअर आणि व्यावसायिक जीवनात आनंददायक घटना घडू शकतील. वैयक्तिक जीवनात जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. करिअरमध्येही चांगली प्रगती होईल. व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. नशीब साथ देईल. व्यवसायात नफा वाढेल. बाप्पाच्या कृपेने आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. अनेक रखडलेल्या योजना मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्यावी.

मिथुन: शुभ परिणाम दिसून येतील. पैशाच्या बाबतीत खूप फायदा होऊ शकेल. लॉटरी लागू शकते किंवा कुठूनतरी भरपूर पैसे मिळू शकतात. करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली पेमेंट किंवा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर उत्कृष्ट परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळू शकतील. नोकरी करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकते. कोणत्याही कामात घाई करणे महागात पडू शकते. प्रत्येक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या.

कर्क: खर्चात लक्षणीय वाढ होईल. परंतु, उत्पन्नही वाढेल. ऑफिसच्या कामात जास्त मेहनत करावी लागेल. अधिकाऱ्यांना प्रभावित करण्यासाठी काही अतिरिक्त काम करावे लागेल. या काळात व्यावसायिकांनी कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा. अन्यथा नुकसान होऊ शकते. कोणतेही काम विचारपूर्वक करा.

सिंह: उत्तम संधी प्राप्त होतील. करिअरवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकाल. काम तन्मयतेने करू शकाल. अचानक पैसेही मिळू शकतात. ऑफिसमध्ये चांगले वातावरण असेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना संधी मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. कामाची प्रशंसा होऊ शकेल. व्यवसाय करत असाल तर नवीन व्यवसायिक योजना बनवू शकाल. त्यात नफा मिळेल. विरोधकांना कडवी टक्कर देऊ शकाल. गुंतवणुकीसाठी ही चांगली वेळ आहे, चांगला परतावा मिळेल.

कन्या: करिअरमध्ये शुभ प्रभाव वाढू शकेल. बाप्पाच्या कृपेने कारकिर्दीत अनेक उत्तम संधी मिळू शकतात. व्यवसायात नवीन भागीदार मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत वाढतील. संपत्ती वाढेल. प्रेमसंबंधांबाबत थोडे सावध राहा. तुमच्यातील अंतर वाढू शकते. आरोग्य उत्तम राहील.

तूळ: करिअरबाबत चांगली बातमी मिळण्याची आशा आहे. जे लोक बर्‍याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना त्यांच्या आवडीची नोकरी मिळू शकते. व्यवसायात काही नवीन संधी मिळतील. वैयक्तिक जीवनात सर्व काही संतुलित राहील. करिअर यशस्वी करण्यासाठी नवीन संधी मिळतील. मित्र उपयुक्त ठरतील. कार्यालयातील सहकाऱ्यांसोबतचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. कल्पना यशस्वी होतील.

वृश्चिक: काही विपरीत परिणामांना सामोरे जावे लागेल. कुटुंबातील सदस्यांसोबत काही मुद्द्यांवर मतभेद होऊ शकतात. करिअरमध्ये सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत नसल्याने अस्वस्थ वाटेल. काही कारणामुळे मनात निराशेची भावना निर्माण होईल. खर्च वाढतील. कमावलेले पैसे कमी होतील. आरोग्य सामान्य राहील.

धनु: करिअरमध्ये अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. नोकरी बदलण्याची प्रतिक्षा संपुष्टात येऊ शकते. व्यवसायात नवीन कामात नशीब आजमावू शकता. त्यात फायदा होईल. जीवनात प्रगती आणि यशाच्या मार्गावर पुढे जाल. कुटुंबात सर्व काही ठीक राहील आणि तुमचे आरोग्यही सामान्य राहील.

मकर: करिअरचा हा टप्पा थोडा कठीण असू शकतो. वैयक्तिक व्यस्ततेमुळे कामावर जास्त लक्ष केंद्रित करू शकणार नाही. अधिकारी नाराज होऊ शकतात. वैवाहिक जीवनात थोडी कटुता निर्माण होऊ शकते. पैशाच्या बाबतीत खर्च लक्षणीय वाढू शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी.

कुंभ: आगामी काळ भाग्याचा ठरू शकतो. बाप्पाच्या कृपेने आयुष्यात अनेक मोठ्या संधी येऊ शकतात. शेअर मार्केटमधील गुंतवणूक लाभदायक ठरू शकेल. भविष्यात नफा मिळू शकेल. चांगला परतावा मिळेल. पैसे वाचवू शकाल आणि काही नवीन गुंतवणूक करू शकाल.

मीन: या काळात चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. करिअर क्षेत्रात क्षमता दाखवू शकाल. पगारात वाढ होऊ शकते. शेअर बाजारात लाभ होऊ शकतो. एकापेक्षा जास्त व्यवसाय सुरू करू शकता. आर्थिक स्थिती सुधारेल. परदेशातून काही काम मिळू शकते. चांगले उत्पन्न मिळू शकते. प्रेम संबंधांत नात्यात गोडवा येईल. शक्य असेल तर बुध मंत्राचा जप करावा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.