मंगल गोचराने चतुर्ग्रही योग: ७ राशींना मंगलमय काळ, धनलाभाचे योग; नशिबाची साथ, शुभच होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 09:09 AM2024-04-17T09:09:09+5:302024-04-17T09:09:09+5:30

मंगळवारी होत असलेले मंगळ ग्रहाचे गोचर काही राशींना अनुकूल, सकारात्मक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

मराठी नववर्षाची सुरुवात झाली आहे. चैत्र नवरात्र, राम नवरात्र यांनंतर हनुमान जयंतीच्या दिवशी २३ एप्रिल रोजी नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मीन राशीत चतुर्ग्रही योग जुळून येणार आहे.

मीन राशीत बुध, शुक्र आणि राहु ग्रह विराजमान आहेत. मंगळ ग्रहाच्या प्रवेशानंतर मीन राशीत चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. याशिवाय धन योगही जुळून येत आहे. कुंडलीत मंगळाच्या शुभ स्थितीमुळे व्यक्तीला सर्व प्रकारच्या सुख-सुविधा मिळतात आणि समाजात मान-सन्मान मिळतो, अशी मान्यता आहे.

मंगळाच्या मीन प्रवेशामुळे ७ राशींना उत्तम फायदा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. आर्थिक आघाडी, करिअर, कुटुंब, शिक्षण, व्यवसाय या आघाडीवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

मेष: मंगल ग्रह चतुर्ग्रही योगाने ध्येय पूर्ण करू शकाल. आर्थिक दृष्टिकोनातूनही मंगल गोचर फायदेशीर ठरू शकेल. चांगले आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आरोग्याची काळजी घ्यावी.

वृषभ: आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ शकेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढू शकतील.सर्व गरजा पूर्ण होऊ शकेल. नशिबाची साथ मिळू शकेल. करिअर आणि नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. शुभ परिणाम मिळू शकतील. परदेशातून लाभ मिळू शकतो. नफा कमावण्याची संधी मिळेल. कामात यश मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी मिळू शकतील.

मिथुन: नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असेल तर वेळ अनुकूल राहील. कामात यश मिळेल. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळू शकतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळेल. धैर्य आणि आत्मविश्वास वाढलेला दिसेल.

कर्क: मंगल गोचर आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकेल. उत्पन्नात वाढ झालेली दिसेल. विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्याचा विचार करत असतील, या दिशेने यश मिळू शकते. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. नोकरदारांना पगारवाढ आणि बढती मिळण्याची शक्यता आहे. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

तूळ: विशेष लाभ होतील. व्यवसाय किंवा करिअरमध्ये जोखीम घेण्याचा विचार करत असाल तर घेऊ शकता. नवीन नोकरीच्या शोधात असतील, त्यांना हा काळ खूप अनुकूल आहे. प्रगतीची शक्यता आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

वृश्चिक: प्रभाव वाढवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल. काही मोठे काम मिळू शकते. आव्हानांवर मात कराल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. प्रतिभा आणि क्षमता जगाला दाखवण्याची संधी मिळू शकेल. नवीन प्रकल्पाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते.

धनु: सुखद बदल घडू शकतील. व्यवहार किंवा व्यवसाय इत्यादींशी संबंधित लोकांना फायदा होईल. कमाईच्या नवीन संधी मिळतील. शिक्षण आणि स्पर्धांशी संबंधित लोकांना नवे अनुभव मिळतील. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळू शकतील. वडिलोपार्जित संपत्तीचा फायदा होऊ शकेल. उच्च शिक्षण आणि अध्यात्मिक कार्यातून नवीन अनुभव प्राप्त होतील. नफा होऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.