मकर संक्रांती २०२६ Marathi Ukhane: नव्या नवरीची पहिली संक्रांत? 'हे' घ्या सोपे उखाणे, जे सगळ्यांचे मन जिंकून घेतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 12:09 IST2026-01-17T11:04:15+5:302026-01-17T12:09:48+5:30

Makar Sankranti 2026 Marathi Ukhane: लग्नानंतर सगळ्याच सण वारीला सुनेचं, जावयाचं, पुढे नातवंडांचं कौतुक होतं. पहिल्या वाहिल्या प्रत्येक गोष्टी अविस्मरणीय ठराव्यात, म्हणून त्यांचा समारंभ केला जातो. चार चौघांना बोलावून आनंद द्विगुणित केला जातो. अशा वेळी नव्या नवरीला उखाणा घेण्याचा प्रेमळ आग्रह केला जातो, त्यासाठी हे सोपे उखाणे.

काळ्या साडीवर शोभतो हलव्याचा साज, ...रावांचे नाव घेते संक्रांतीचा सण आहे आज

मकर संक्रांतीच्या सणाला महत्त्व आहे तिळाचे, ...रावांच्या संसारात सुख लाभो आम्हाला मोलाचे

तीळ-गुळाच्या लाडूला आहे साखरेचा पाक, ...चे नाव घ्यायला मला कसली हो धाक

संक्रांतीच्या सणाला गुळाची पोळी आहे साजूक तुपातली, ...चे नाव घ्यायची हौस आहे मनातली

पहिलीच संक्रांत लग्नानंतरची, हौस मजला दागिन्यांची, ...रावांचे नाव घेते, जोडणी झाली दोन घरांची

हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात जमल्या साऱ्या जणी, ...रावांच्या घराची झाले मी राणी

पतंगाच्या दोरीला मांज्याचा आधार, ...रावांच्या संसारात मी आहे भाग्यवान फार.

आकाशात रंगीबेरंगी पतंग दिसतात छान, ...रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान