Mahashivratri 2026 Wishes: महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करुन साजरा करा शिव शंकराचा उत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 13:05 IST2026-02-14T13:01:01+5:302026-02-14T13:05:02+5:30
Mahashivratri 2026 wishes in Marathi: १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री(Mahashivratri 2026) म्हणजे शिवभक्तांसाठी आनंदाचा आणि भक्तीचा महासोहळा! 'हर हर महादेव'च्या जयघोषात न्हाऊन निघालेल्या या वातावरणात, आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना भक्तीमय शुभेच्छा देणे हा या उत्सवाचा एक अविभाज्य भाग आहे. सोशल मीडियाच्या युगात तुमचे स्टेटस आणि मेसेजेस हे तुमच्या श्रद्धेचे प्रतीक बनले आहेत. म्हणूनच, यंदाची महाशिवरात्री खास बनवण्यासाठी आम्ही काही खास मराठी शुभेच्छा संदेश, चारोळ्या आणि कोट्स या लेखात संकलित केले आहेत.

भक्ती ज्याची मोठी, त्याचे रक्षण करी त्रिनेत्री...! महाशिवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

नि:शब्द ही सृष्टी, अनंताची ही दृष्टी, शिवशंभूच्या चरणी नतमस्तक झाली ही सृष्टी! महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

हातात बेलपत्र, मुखी शिवाचे नाव, महादेवाच्या चरणी अर्पण करा आपला भाव. महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

जगाचा कणा, माझा शिव कैलासराणा! महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

कैलास राणा शिवचंद्र मोळी। फणींद्र माथा मुकुटी झळाळी ॥ कारूण्यसिंधु भव दुःख हारी। तुजविण शंभो मज कोण तारी॥ महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥ महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

















