लक्ष्मी नारायण योगात फेब्रुवारीची सांगता: ८ राशींना लाभच लाभ; धनलक्ष्मी कृपेने पद-पैसा वाढ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 14:38 IST2026-02-26T14:18:49+5:302026-02-26T14:38:34+5:30
पंचग्रही योग आणि चार राजयोगात फेब्रुवारी महिन्याची सांगता होत आहे. तुमच्यासाठी हा कालावधी कसा असेल? कोणत्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...

२०२६ मधील फेब्रुवारी महिन्याची सांगता होत आहे. मार्च महिना अनेकार्थाने शुभ आणि विशेष ठरणार आहे. ०१ मार्च रोजी प्रदोष आहे. तर ०२ मार्च रोजी होळी आहे. ०३ मार्च रोजी धुलिवंदन आहे. याच दिवशी २०२६ चे पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार असून, याचे वेधादि नियम पाळावेत, असे सांगितले जात आहे.

तसेच शुक्र आपल्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर सूर्याने मीन राशीत प्रवेश केल्यावर मीन संक्रांत सुरू होणार आहे. मार्च महिन्यात मराठी नववर्ष सुरू होणार आहे. १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा आहे. याच दिवसापासून मराठी नववर्षातील पहिले चैत्र नवरात्र सुरू होणार आहे.

फेब्रुवारी महिन्याची सांगता होताना कुंभ राशीत पंचग्रही योग जुळून येत आहे. तसेच लक्ष्मी नारायण यासह ४ राजयोग जुळून येत आहेत. या सर्व ग्रहांचा सिंह राशीत असलेल्या केतुशी समसप्तक योग जुळून येणार आहे. अनेक राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा राहू शकेल. फेब्रुवारी महिन्याची सांगता शुभ ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: धनलक्ष्मीची कृपा राहील. अनेक अडचणी सुटतील. अनुकूल वातावरण जाणवेल. म्हणणे लोकांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. थोरामोठ्यांच्या ओळखीतून फायदे होतील. वडीलधाऱ्या मंडळींची मदत मिळेल. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. भावंडांशी मधुर संबंध राहतील. व्यवसायात तेजीचा काळ अनुभवायला मिळेल, गुंतवणूक करताना मात्र थोडे सावध राहा. नोकरीत पदोन्नती मिळू शकते.

वृषभ: भेटवस्तू मिळतील. अत्यंत चांगला काळ राहील. संयमाने वागण्याची गरज आहे. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. वाहन जपून चालवा. परिस्थिती आटोक्यात येईल. मनात प्रसन्न विचार राहतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. धनलक्ष्मीची कृपा राहील. जवळच्या लोकांच्या सहवासात मजेत वेळ जाईल.

मिथुन: अधिक चांगले यश देणारा कालावधी ठरेल. हाती पैसा येईल. पैशाचे नियोजन नीट कराल तर काळ सत्कारणी लागेल. प्रवासाचे नियोजन नीट करा. ऐनवेळी नियोजित कार्यक्रमात बदल झाल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागू शकतो. अनुकूल वातावरण राहील. अडचणी दूर होतील. मन आनंदी राहील. जीवनसाथीशी सूर जुळतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल.

कर्क: तब्येतीला थोडे जपले तर एकंदरीत काळ चांगला जाईल. नोकरीतील बदल फायदेशीर ठरतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. व्यय स्थानातील गुरू चंद्र युतीमुळे धार्मिक प्रवास घडून येईल. मनात आध्यात्मिक विचार राहतील. मात्र, प्रवासाचे नियोजन नीट करा. अधिक अनुकूलता जाणवेल. एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल.

सिंह: प्रसिद्धी, मान-सन्मान मिळेल. प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. मात्र थोडे क्रोधावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. नाही तर जवळचे लोक नाराज होतील. काहींना पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. कलागुणांचे लोकांकडून कौतुक केले जाईल. नवीन ओळखी होतील, थोरामोठ्यांच्या सहवासात याल, नोकरीत पदोन्नती मिळू शकते. त्यातून आर्थिक स्तर उंचावेल, उत्तरार्धात धनलाभ व भेटवस्तू मिळतील. प्रवासात सतर्क राहा.

कन्या: थोडी दगदग करावी लागेल. नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. त्यातून प्रगतीला चालना मिळेल. मात्र, घाईघाईत कामे करू नका, परिस्थिती अधिक अनुकूल होईल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल, आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. नोकरीत महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. कलाकारांना प्रोत्साहन मिळेल.

तूळ: अचानक धनलाभ होईल. मोठ्या योजना हाती घेतल्या जातील. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. मुलांशी संवाद ठेवा. त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे वाढवू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. अनुकूल वातावरण राहील. कामे झटपट होतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. सामाजिक मान-सन्मान मिळेल. काहींना पुरस्कार जाहीर होईल.

वृश्चिक: संमिश्र ग्रहमान राहील. योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता पाळली पाहिजे. कुणी चुकीचा सल्ला देईल. जमिनीच्या व्यवहारात सावधगिरी बाळगली पाहिजे. शेजार पाजाऱ्यांशी वाद टाळा. घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा. व्यवसायात भरभराट होऊ शकते. विवाहेच्छूना चांगली स्थळे सांगून येतील. नीट माहिती घेऊन निर्णय घ्या. शेवटच्या टप्प्यात अचानक धनलाभ होऊ शकतो.

धनु: बाजारपेठेचे अंदाज बरोबर ठरतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मनात उत्साह राहील. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. चांगले अनुभव येतील. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. आवडत्या लोकांच्या सहवासात मन रमेल.

मकर: थोडी दगदग करावी लागेल. एखाद्या नवीन जबाबदारीत गुंतलेले राहाल. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा, चमचमीत पदार्थ खाण्यास मिळतील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. नातेवाईकात मान वाढेल. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. एखादी सुवार्ता कळेल. नोकरीत बढतीसह बदलीची शक्यता आहे. त्यामुळे उत्साह वाढेल. जीवनसाथीची चांगली साथ राहील.

कुंभ: गुंतवणूक जपून करा. क्रोधाला आवर घातला पाहिजे, नाही तर जवळचे लोक नाराज होतील. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. इझटपट निर्णय घेण्याकडे कल राहील. गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्या. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. घरातील सदस्यांच्या मतांचा आदर राखा. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. गुरु चंद्र युतीची शुभ फळे मिळतील. अनेक दिवसांपासून पाहत असलेले स्वप्न पूर्ण होईल.

मीन: नोकरीत पदोन्नती, पगारवाढ मिळेल. अधिक अनुकूलता जाणवेल. जवळच्या सहलीला जाऊन याल, मौजमजा कराल. भावंडांच्या व जवळच्या लोकांच्या सहवासात याल. व्यवसायात भरभराट होईल. मात्र, मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. घरात आनंदी वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

















